हे पृष्ठ 19 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही १९ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 19 December. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
गोवा मुक्ती दिवस.
महत्त्वाच्या घटना:
१९१९: अमेरिकेमध्ये हवामान संस्थेची स्थापना करण्यात आली.
१९२४: जर्मनी चा सिरीयल किलर फ्रिट्ज हार्मेन याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली.
१९२७: राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.
१९४१: दुसरे महायुद्ध – अॅडॉल्फ हिटलर हा जर्मन सैन्याचा सरसेनापती बनला.
११५४: दुसरा राजा हेन्री यांचे इंग्लंड चे राजे म्हणून राज्याभिषेक झाला.
१९६१: भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय च्या माध्यमाने गोव्याच्या बोर्डर मध्ये प्रवेश केला होता.
१९६१: पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.
१९६३: झांजिबारला (युनायटेड किंगडमकडून) स्वातंत्र्य मिळाले आणि तेथे सुलतान जमशिद बिन अब्दूल्लाह यांची राजसत्ता अस्तित्त्वात आली.
१९८३: ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन ’फिफा वर्ल्ड कप’ चोरीस गेला.
१९९८: अमेरिकेच्या डेनवर मध्ये विश्व विकलांग स्कीइंग मध्ये शील कुमार यांना सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुरस्कार वितरीत.
२००२: व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२००६: शैलजा आचार्य ह्या भारतासाठी नेपाळ च्या पहिल्या राजदूत बनल्या होत्या.
२००७: ब्लादीमर पुतीन यांना टाईम्स मग्झीन ने पर्सन ऑफ़ द ईयर ने पुरस्कृत केले.
२०१२: ज्यून-हाय पार्क ह्या दक्षिण कोरिया च्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८५२: अल्बर्ट मायकेलसन – वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक (१९०७) मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: ९ मे १९३१)
१८९४: कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण (१९६९), रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक (१९३७ – १९४९). अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले. आपल्या गिरण्य़ांत त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या. (मृत्यू: २० जानेवारी १९८०)
१८९७: अमेरिकेचे मुख्य धर्मोपदेशक मार्टिन लूथर किंग सीनियर यांचा जन्म.
१८९९: मार्टिन ल्यूथर किंग – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते (मृत्यू: ११ नोव्हेंबर १९८४)
१९०६: लिओनिद ब्रेझनेव्ह – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस (मृत्यू: १० नोव्हेंबर १९८२)
१९१९: ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९१९)
१९३४: प्रतिभा पाटील – भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती
१९६६: भारतीय क्रिकेटपटू राजेश चौहान यांचा जन्म.
१९६९: भारतीय क्रिकेटपटू नयन मोंगिया यांचा जन्म.
१९७४: रिकी पॉन्टिंग –ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार व फलंदाज
१९८४: भारतीय चित्रपट अभिनेत्री अंकिता लोखंडे यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८४८: एमिली ब्राँट – इंग्लिश लेखिका (जन्म: ३० जुलै १८१८)
१८६०: लॉर्ड जेम्स अॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे – डलहौसी – भारताचा गव्हर्नर जनरल (१८४८-१८५६), त्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते स्थापन करुन सुमारे ३,४०० किमी लांबीचे रस्ते केले. टपाल व तार यांची सेवा सुरू केली. मुंबई ते ठाणे हा लोहमार्ग त्यांच्याच कारकीर्दीत सुरू झाला. (जन्म: २२ एप्रिल १८१२)
१९१५: अलॉइस अल्झायमर – जर्मन मेंदुविकारतज्ञ (जन्म: १४ जून १८६४)
१९२७: राम प्रसाद बिस्मिल – क्रांतिकारक (जन्म: ११ जून १८९७)
१९२७: क्रांतिकारक अश्फाक़ुला खान यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १९००)
१९८८: ज्ञानपीठ पुरस्कार पुरस्कार विजेते गुजराती साहित्यकार उमाशंकर जोशी यांचे निधन.
१९९७: सोनीचे सहसंस्थापक मासारू इबकू यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १९०८)
१९९७: डॉ. सुरेन्द्र बारलिंगे – स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष (जन्म: २० जुलै १९१९)
१९९८: जनार्दन विठ्ठल तथा जे. एल. रानडे – भावगीतगायक (जन्म: ? ? ????)
१९९९: हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक (जन्म: २४ मे १९३३)
२०१४: भारतीय पत्रकार आणि दिग्दर्शक एस. बालसुब्रमण्यम यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९३५)