हे पृष्ठ 22 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
On this page, we will list all historical events that occurred on 22nd April. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
जागतिक वसुंधरा दिन
जागतिक वसुंधरा दिन
प्रत्येक वर्षी 22 एप्रिल रोजी लोक ग्रहाचे जंगलतोड आणि प्रदूषण यांसारख्या विरोधकांपासून संरक्षण करण्यासाठी जागतिक पृथ्वी दिन साजरा करतात.
महत्त्वाच्या घटना:
१०५६: क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट
१५००: पोर्तुगाल नाविक पेड्रो अल्वेयेर कैब्राल यांनी ब्राझील देशाचा शोध लावला.
१९१५: पहिल्या विश्वयुद्धा दरम्यान जर्मन सेनांनी पहिल्याचा विषारी वायूचा वापर केला.
१९२१: नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी प्रशासकीय सेवेतून आपल्या पदाचा राजीनामा दिला.
१९४८: अरब-इस्त्रायल युद्ध – अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.
१९७०: पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
१९७७: टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी प्रथम ऑप्टिकल फाइबरचा वापर केला गेला.
१९७९: आचार्य विनोबा भावे यांनी संपूर्ण गोहत्या बंदीच्या मागणीसाठी उपोषण सुरु केले.
१९९७: राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ’ओमप्रकाश भसीन पुरस्कार’ जाहीर
२००६: प्रवीण महाजन यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातुन गोळ्या झाडल्या.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१६९८: [वैशाख व. ७, शके १६२०] शिवदिननाथ – नाथपरंपरेतील एका शाखेचे प्रमुख सत्पुरुष (मृत्यू: ? ? ????)
१७२४: एमॅन्युएल कांट – जर्मन तत्त्ववेत्ता (मृत्यू: १२ फेब्रुवारी १८०४)
१७६०: मुघल शासक शाहाआलम यांचे द्वितीय पुत्र व भारतातील शेवटचे मुघल शासक बहादूर शहा द्वितीय यांचा जन्मदिन.
१८१२: लॉर्ड जेम्स अॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे – डलहौसी – भारताचा गव्हर्नर जनरल (१८४८-१८५६), त्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते स्थापन करुन सुमारे ३,४०० किमी लांबीचे रस्ते केले. टपाल व तार यांची सेवा सुरू केली. मुंबई ते ठाणे हा लोहमार्ग त्यांच्याच कारकीर्दीत सुरू झाला. (मृत्यू: १९ डिसेंबर १८६०)
१८७०: व्लादिमीर लेनिन – रशियन क्रांतिकारक (मृत्यू: २१ जानेवारी १९२४)
१९०४: जे. रॉबर्ट ओपेनहायमर – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९६७)
१९१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता बलदेव राज चोपडा यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर २००८)
१९१६: यहुदी मेन्युहीन – व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक (मृत्यू: १२ मार्च १९९९)
१९१६: काननदेवी – अभिनेत्री व गायिका (मृत्यू: १७ जुलै १९९२)
१९२९: प्रा. अशोक केळकर – विख्यात भाषाशास्त्रज्ञ व साहित्य समीक्षक
१९२९: उषा मराठे – खेर ऊर्फ ’उषा किरण’ – शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर अभिनेत्री, मुंबईच्या नगरपाल (मृत्यू: ९ मार्च २००० – नाशिक)
१९३५: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक भामा श्रीनिवासन यांचा जन्म.
१९४५: भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी गोपाळकृष्ण गांधी यांचा जन्म.
१९७४: प्रख्यात इंग्रजी कादंबरीकार व लेखक चेतन भगत यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१९१६: भारतीय पंजाबी भाषेचे नाटककार, नाट्य दिग्दर्शक, कादंबरीकार आणि लघुकथा लेखक व शिक्षणतज्ञ बलवंत गार्गी यांचे निधन.
१९३३: रोल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक हेन्री रॉयस यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १८६३)
१९८०: फ्रिट्झ स्ट्रासमान – जर्मन भौतिकशात्रज्ञ (जन्म: २२ फेब्रुवारी १९०२)
१९९४: आचार्य सुशीलमुनी महाराज – थोर विचारवंत, द्रष्टे समाजसुधारक आणि पुरोगामी सेवाव्रती जैन आचार्य (जन्म: ? ? ????)
१९९४: रिचर्ड निक्सन – अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ९ जानेवारी १९१३)
२००३: बळवंत गार्गी – पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार, पंजाब विद्यापीठातील भारतीय रंगभूमी विभागाचे प्रमुख, ‘थिएटर ऑफ इंडिया’ आणि ’फोक थिएटर ऑफ इंडिया’ या पुस्तकांचे लेखक (जन्म: ४ डिसेंबर १९१६ – भटिंडा, पंजाब)
२०१३: लालगुडी जयरामन – व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक (जन्म: १७ सप्टेंबर १९३०)
२०१३: जगदीश शरण वर्मा – भारताचे २७ वे सरन्यायाधीश (जन्म: १८ जानेवारी १९३३)