dinvishesh-mpsc-23-april
dinvishesh-mpsc-23-april

हे पृष्ठ 23 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 23rd April. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

जागतिक ग्रंथ तथा रचनास्वायत्त दिन

महत्त्वाच्या घटना:

१९९० : नामिबिया संयुक्त राष्ट्रांत प्रवेश होऊन तो १६० वा सदस्य देश बनला.

१८१८ : दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविले. [चैत्र व. ३]

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१५६४ (baptised) : विल्यम शेक्सपियर, इंग्लिश साहित्यिक.

१८७३ : विठ्ठल रामजी शिंदे, अस्पृश्यतानिवारण करण्यासाठी महत्त्वाचे काम करणारे थोर समाजसुधारक.

१९३८ : एस. जानकी – शास्त्रीय गायिका

१८९७ : लेस्टर बी. पिअर्सन – कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: २७ डिसेंबर १९७२)

१८७३ : महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक (मृत्यू: २ जानेवारी १९४४)

१८५८ : पंडिता रमाबाई – विधवा, परिक्त्यक्ता आणि स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारक आणि ’आर्य महिला समाज’ च्या संस्थापिका, संस्कृत पंडित (मृत्यू: ५ एप्रिल १९२२)

१८५८ : मॅक्स प्लँक – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ (मृत्यू: ४ आक्टोबर १९४७)

१७९१ : जेम्स बुकॅनन – अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १ जून १८६८)

१५६४ : विल्यम शेक्सपिअर – इंग्लिश नाटककार आणि अभिनेता. युनेस्कोने घेतलेल्या पुढाकारामुळे विल्यम शेक्सपिअर यांच्या सन्मानार्थ १९९५ पासून आजचा दिवस हा ’जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. (मृत्यू: २३ एप्रिल १६१६)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

सत्यजित रे, जगप्रसिद्ध सिने दिग्दर्शक

२०१३ : शमशाद बेगम – पार्श्वगायिका (जन्म: १४ एप्रिल १९१९)

२००७ : बोरिस येलत्सिन – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष (जन्म: १ फेब्रुवारी १९३१)

२००१ : जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते, गोवा मुक्ती संग्रामातील एक झुंजार सेनापती, लोकमान्य टिळकांचे नातू, राजकारण, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, तत्त्वज्ञान, विज्ञान, निसर्ग आणि शिकार इ. विविध क्षेत्रांमधे दीर्घकाळ सक्रिय असणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष व केसरीचे संपादक (जन्म: १२ आक्टोबर १९२१)

२००० : मराठी चित्रपटांना आधार मिळावा या ध्येयाने प्रेरित होऊन गेली ४० वर्षे लालबागमधील ’भारतमाता’ चित्रपटगृह चालवणारे यशवंत सदाशिव ऊर्फ बाबासाहेब भोपटकर यांचे निधन (जन्म: ? ? ????)

१९९७ : डेनिस कॉम्पटन – इंग्लिश क्रिकेटपटू, ’गोल्डन बॉय’ (जन्म: २३ मे १९१८)

१९९२ : सत्यजित रे – ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न. ’पथेर पांचाली’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला देशविदेशात अनेक गौरव मिळाले. त्यांना विशेष ऑस्कर पुरस्कारही देण्यात आला होता. (जन्म: २ मे १९२१)

१९२६ : हेन्‍री बी. गुप्पी – ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ (जन्म: २३ डिसेंबर १८५४)

१९८६ : जिम लेकर – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (जन्म: ९ फेब्रुवारी १९२२)

१९५८ : शंकर श्रीकृष्ण देव – निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक (जन्म: १० आक्टोबर १८७१)

१८५० : विल्यम वर्डस्वर्थ – काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी. त्यांची ’डॅफोडिल्स’ ही अतिशय गाजलेली कविता आहे. (जन्म: ७ एप्रिल १७७०)

१६१६ : विल्यम शेक्सपिअर – इंग्लिश नाटककार आणि अभिनेता. युनेस्कोने घेतलेल्या पुढाकारामुळे विल्यम शेक्सपिअर यांच्या सन्मानार्थ १९९५ पासून आजचा दिवस हा ’जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. (जन्म: २३ एप्रिल १५६४)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *