जागतिक वसुंधरा दिन
जागतिक वसुंधरा दिन

हे पृष्ठ 22 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 22nd April. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

जागतिक वसुंधरा दिन

जागतिक वसुंधरा दिन World Earth Day

जागतिक वसुंधरा दिन

प्रत्येक वर्षी 22 एप्रिल रोजी लोक ग्रहाचे जंगलतोड आणि प्रदूषण यांसारख्या विरोधकांपासून संरक्षण करण्यासाठी जागतिक पृथ्वी दिन साजरा करतात.

महत्त्वाच्या घटना:

आचार्य विनोबा भावे यांनी संपूर्ण गोहत्या बंदीच्या मागणीसाठी उपोषण सुरु केले.
आचार्य विनोबा भावे यांनी संपूर्ण गोहत्या बंदीच्या मागणीसाठी उपोषण सुरु केले.

१९७९ : आचार्य विनोबा भावे यांनी संपूर्ण गोहत्या बंदीच्या मागणीसाठी उपोषण सुरु केले.

२००६ : प्रवीण महाजन यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातुन गोळ्या झाडल्या.

१९९७ : राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ’ओमप्रकाश भसीन पुरस्कार’ जाहीर

१९४८ : अरब-इस्त्रायल युद्ध – अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.

१०५६ : क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

व्लादिमीर लेनिन – रशियन क्रांतिकारक
व्लादिमीर लेनिन – रशियन क्रांतिकारक

१९२९ : साहित्य समीक्षक डॉ. अशोक रामचंद्र केळकर.

१९२९ : प्रा. अशोक केळकर – विख्यात भाषाशास्त्रज्ञ व साहित्य समीक्षक (मृत्यू:

१९२९ : उषा मराठे – खेर ऊर्फ ’उषा किरण’ – शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर अभिनेत्री, मुंबईच्या नगरपाल (मृत्यू: ९ मार्च २००० – नाशिक)

१९१६ : काननदेवी – अभिनेत्री व गायिका (मृत्यू: १७ जुलै १९९२)

१९१६ : यहुदी मेन्युहीन – व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक (मृत्यू: १२ मार्च १९९९)

१९०४ : जे. रॉबर्ट ओपेनहायमर – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९६७)

१८७० : व्लादिमीर लेनिन – रशियन क्रांतिकारक (मृत्यू: २१ जानेवारी १९२४)

१८१२ : लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे – डलहौसी – भारताचा गव्हर्नर जनरल (१८४८-१८५६), त्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते स्थापन करुन सुमारे ३,४०० किमी लांबीचे रस्ते केले. टपाल व तार यांची सेवा सुरू केली. मुंबई ते ठाणे हा लोहमार्ग त्यांच्याच कारकीर्दीत सुरू झाला. (मृत्यू: १९ डिसेंबर १८६०)

१७२४ : एमॅन्युएल कांट – जर्मन तत्त्ववेत्ता (मृत्यू: १२ फेब्रुवारी १८०४)

१६९८ : [वैशाख व. ७, शके १६२०] शिवदिननाथ – नाथपरंपरेतील एका शाखेचे प्रमुख सत्पुरुष (मृत्यू: ? ? ????)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

लालगुडी जयरामन – व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक
लालगुडी जयरामन – व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक

२०१३ : लालगुडी जयरामन – व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक (जन्म: १७ सप्टेंबर १९३०)

२०१३ : जगदीश शरण वर्मा – भारताचे २७ वे सरन्यायाधीश (जन्म: १८ जानेवारी १९३३)

२००३ : बळवंत गार्गी – पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार, पंजाब विद्यापीठातील भारतीय रंगभूमी विभागाचे प्रमुख, ‘थिएटर ऑफ इंडिया’ आणि ’फोक थिएटर ऑफ इंडिया’ या पुस्तकांचे लेखक (जन्म: ४ डिसेंबर १९१६ – भटिंडा, पंजाब)

१९९४ : आचार्य सुशीलमुनी महाराज – थोर विचारवंत, द्रष्टे समाजसुधारक आणि पुरोगामी सेवाव्रती जैन आचार्य (जन्म: ? ? ????)

१९९४ : रिचर्ड निक्सन – अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ९ जानेवारी १९१३)

१९८० : फ्रिट्झ स्ट्रासमान – जर्मन भौतिकशात्रज्ञ (जन्म: २२ फेब्रुवारी १९०२)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.