हे पृष्ठ 9 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही ९ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that have occurred on 9 January. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
प्रवासी भारतीय दिवस
अनिवासी भारतीयांनी राष्ट्राच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी केलेले उपकार आणि योगदान लक्षात ठेवणे.
महत्त्वाच्या घटना:
१७६०: बरारीघाट येथे अफगाण्यांनी मराठ्यांचा पराभव केला.
१७८८: कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५ वे राज्य बनले.
१७९०: ला बरारी घाटाच्या झालेल्या लढाई मध्ये अहमद शाह दुर्रानी ने मराठ्यांचा पराभव केला.
१८८०: क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा
१९१५: महात्मा गांधींचे अफ्रिकेतुन भारतात आगमन
१९८२: ला भारताचा पहिला शास्त्रज्ञ वर्ग अंटार्क्टिकाला पोहचला.
२००१: नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.
२००१: नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.
२००२: भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड विरूद्ध एकदिवसीय मालिका जिंकली.
२००२: महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले.
२००७: स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला.
२०१२: ला लिओनेल मेस्सी ने सतत दुसऱ्या वर्षी सुद्धा “बैलोन डीओर” नावाचा पुरस्कार जिंकला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८३१: फातिमा शेख : भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका
१९१३: रिचर्ड निक्सन – अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २२ एप्रिल १९९४)
१९१८: मार्क्सवादी विचारवंत लेखक प्रभाकर उर्ध्वरेषे यांचा जन्म.
१९२२: हर गोविंद खुराना – जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०११)
१९२१: बिहार चे माजी मुख्यमंत्री राम सुंदर दास यांचा जन्म.
१९२६: कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार – चित्रपट अभिनेते (मृत्यू: २० सप्टेंबर १९९७ – मुंबई)
१९२७: सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक आणि समीक्षक रा. भा. पाटणकर यांचा जन्म.
१९३४: महेंद्र कपूर – पार्श्वगायक (मृत्यू: २७ सप्टेंबर २००८ – मुंबई)
१९३८: चक्रवर्ती रामानुजम – गणिती (मृत्यू: २७ आक्टोबर १९७४)
१९५१: पं. सत्यशील देशपांडे – ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य
१९६५: फराह खान – नृत्यदिग्दर्शक
१९७४: ला बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर यांचा जन्म.
१९८३: ला भारतीय अभिनेता शरद मल्होत्रा यांचा जन्म.
२०००: ला भारताची प्रसिद्ध धावपटू हिमा दास यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८४८: कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, ही प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेलची बहिण असून तिनेही ८ धुमकेतू व ३ तारकासमुह शोधले आहेत. (जन्म: १६ मार्च १७५०)
१८७३: तिसरा नेपोलियन बोनापार्ट यांचे निधन.
१९२३: सत्येंद्रनाथ टागोर – पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) (जन्म: १ जून १८४२)
१९४५: प्रसिद्ध राजनीती तज्ञ छोटू राम यांचे निधन.
१९७३: फ्रांसचे पहिले अध्यक्ष लुई-नेपोलियन बोनापार्ट उर्फ नेपोलियन ३रा यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८०८)
२००३: कमर जलालाबादी – गीतकार व कवी (जन्म: ? ? १९१९)
२००४: शंकरबापू आपेगावकर – पखवाजवादक (जन्म: ? ? १९११)
२०१३: जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ (जन्म: ३ आक्टोबर १९१९)
Nice history…I love very much….very interesting topics are in there… thank you