हे पृष्ठ 10 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही १० जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 10 January. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- जागतिक हिंदी दिवस.
महत्त्वाच्या घटना:
१६६६: सुरत लुटून शिवाजीमहाराज राजगडाकडे निघाले.
१७३०: पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.
१८०६: केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.
१८१०: नेपोलियन बोनापार्टने जोसेफाइन या आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला.
१८३९: पहिल्यांदा भारताचा चहा इंग्लंड ला पोहचला.
१८६३: चार्ल्स पिअर्सन याच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.
१८७०: जॉन डी. रॉकफेलर याने ’स्टँडर्ड ऑईल’ कंपनीची स्थापना केली.
१८७०: बॉम्बे, बडोदा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे (B. B. C. I. Railway) या ब्रिटिशकालीन रेल्वे कंपनीच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले. या स्थानकावर फक्त एक फलाट होता.
१८८४: ब्रिटन च्या रसायन शास्त्रज्ञ जोज़फ एस्पीडियन यांनी पहिल्यांदा सिमेंट बनविले.
१९२०: पहिले महायुद्ध – व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.
१९२६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
१९२९: जगात अमाप लोकप्रियता मिळालेले ’द अॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन’ हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.
१९६६: भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.
१९७२: पाकिस्तानमधील तुरुंगात ९ महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देश मधे परतले.
२००६: माजी प्रधान मंत्री मनमोहन सिंग यांनी १० जानेवारी ला जागतिक हिंदी दिवस म्हणनू साजरे करण्याची घोषणा केली.
२००८: टाटा कंपनी ने जगातील सर्वात स्वस्त कार नॅनो कार ला बाजारात आणण्यासाठी सुरुवात केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१७७५: बाजीराव पेशवे (दुसरे) (मृत्यू: २८ जानेवारी १८५१ – ब्रम्हावर्त)
१८९६: नरहर विष्णू तथा ’काकासाहेब’ गाडगीळ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (मृत्यू: १२ जानेवारी १९६६)
१९००: मारोतराव सांबशिव कन्नमवार – महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३) (मृत्यू: २४ नोव्हेंबर १९६३)
१९०१: इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा पनवेल येथे जन्म (मृत्यू: ? ? ????)
१९१९: संस्कुत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक श्री. र. भिडे यांचा जन्म.
१९२७: तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांचा जन्म.
१९३७: भातीय राजनीती तज्ञ मुरली देवड़ा यांचा जन्म.
१९४०: के. जे. येसूदास – पार्श्वगायक व संगीतकार
१९४९: प्रसिद्ध दक्षिणात्य चित्रपट निर्माते अल्लू अरविंद यांचा जन्म.
१९५०: आदिवासींसाठी आयुष्य वेचणारया नाजुबाई गावित यांचा जन्म.
१९७१: प्रसिद्ध बासरी वादक राकेश चौरसिया यांचा जन्म.
१९७४: हृतिक रोशन – सिनेकलाकार
१९८४: भारतीय अभिनेत्री कल्कि कोचेलिन यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१६९३: कोलकत्याचे निर्माते म्हणून ओळखले जाणारे जाब चारनाक यांचे निधन.
१७६०: दत्ताजी शिंदे – पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर (जन्म: ? ? १७२३)
१७७८: कार्ल लिनिअस – स्वीडीश वनस्पतीतज्ञ, वनस्पतींच्या दुहेरी नामकरणाची आंतरराष्ट्रीय पद्धत त्याने विकसित केली. ही पद्धत त्याला इतकी आवडली की त्याने स्वत:चेही नाव बदलून कॅरोलस लिनिअस असे केले. (जन्म: २३ मे १७०७)
१९६९: उत्तर प्रदेश चे माजी मुख्यमंत्री संपूर्णानंद यांचे निधन.
१९९४: ला प्रसिद्ध लेखक गिरिजाकुमार माथुर यांचे निधन.
१९९९: आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर – स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत (जन्म: ? ? ????)
२००२: पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास – ख्यालगायक, गुरु व बंदिशकार (जन्म: ९ नोव्हेंबर १९२४)
Give mi daily updates