हे पृष्ठ 11 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही ११ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 11 January. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- राष्ट्रीय सड़क सुरक्षा सप्ताहाला सुरुवात.
महत्त्वाच्या घटना:
१६१३: मुघल सम्राट जहागीर ने पहिल्यांदा इस्ट इंडिया कंपनी ला सुरत येथे कारखाना उभारण्यास परवानगी दिली.
१७८७: विल्यम हर्षेल याने ’टिटानिया’ या युरेनसच्या सर्वात मोठ्या चंद्राचा शोध लावला. त्याच दिवशी त्याने ’ओबेरॉन’ या युरेनसच्या दुसर्या मोठ्या चंद्राचाही शोध लावला.
१९२२: मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.
१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले
१९६६: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
१९७२: पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.
१९८०: बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.
१९९९: ’कमाल जमीनधारणा कायदा’ रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी
२०००: छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना
२००१: एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२००९: स्लमडॉग मिलियनर या चित्रपटाला ६६ वा. गोल्डन ग्लोब अवार्ड मिळाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८१५: जॉन ए. मॅकडोनाल्ड – कॅनडाचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: ६ जून १८९१)
१८५८: श्रीधर पाठक – हिन्दी कवी, लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू: १३ सप्टेंबर १९२६)
१८५९: लॉर्ड कर्झन – ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय (मृत्यू: २० मार्च १९२५)
१८९८: ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा जन्म.
१९२८: थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी (जन्म: २ जून १८४०)
१९४४: शिबू सोरेन – झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री आणि खासदार
१९५४: बाल मजुरांच्या विरुद्ध आवाज उचलणारे आणि नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांचा जन्म.
१९५५: आशा खाडिलकर – उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका
१९६६: स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले त्यांना मरणोत्तर ’भारतरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते. (जन्म: २ आक्टोबर १९०४)
१९७३: क्रिकेटपटू खेळाडू द. ग्रेट इंडियन वॉल राहुल द्रविड यांचा जन्म.
१९८३: घनश्यामदास बिर्ला – उद्योगपती व शिक्षण महर्षी (जन्म: १० एप्रिल १८९४)
१९९७: भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (जन्म: २१ फेब्रुवारी १९११)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन
१९२८: थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी (जन्म: २ जून १८४०)
१९५४: सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या ’सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष. क्लेमंट अॅटली हे देखील या आयोगाचे एक सदस्य होते, जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. (जन्म: २८ फेब्रुवारी १८७३)
१९६२: भारतीय कम्युनिस्ट पार्टी चे नेता अजय घोष यांचे निधन.
१९६६: स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते. (जन्म: २ आक्टोबर १९०४)
१९८३: घनश्यामदास बिर्ला – उद्योगपती व शिक्षण महर्षी (जन्म: १० एप्रिल १८९४)
१९९०: भारतीय संगीतकार राम चतुर मलिक यांचे निधन.
१९९७: भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (जन्म: २१ फेब्रुवारी १९११)
२००८: य. दि. फडके – लेखक व इतिहाससंशोधक (जन्म: ३ जानेवारी १९३१)
२००८: सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक (जन्म: २० जुलै १९१९)