२८ फेब्रुवारी दिनविशेष - 28 February in History
२८ फेब्रुवारी दिनविशेष - 28 February in History

हे पृष्ठ 28 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 28th February. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

राष्ट्रीय विज्ञान दिवस National Science Day

राष्ट्रीय विज्ञान दिवस

२८ फेब्रुवारी १९२८ रोजी सर सी.व्ही.रामन यांनी Raman Efect चा शोध लावल्याबद्दल हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस घोषित केला गेला.

महत्त्वाच्या घटना:

१८४७: अमेरिकेने सकरामेंटो च्या युद्धात मेक्सिको ला हरविले.

१८४९: अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू झाली. न्यूयॉर्कहुन निघालेले एस. एस. कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सॅनफ्रान्सिस्कोला पोहोचले.

१९२२: इजिप्तला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९२८: डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील एका परिणामाचा शोध लावला. त्याला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणुन साजरा करण्यात येतो.

१९३५: वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.

१९९५: आजच्या दिवशी अमेरिकेच्या कॉलरेडो येथील डेनवर आंतराष्ट्रीय विमानतळाची सुरुवात.

१९४०: बास्केटबॉल खेळ प्रथमच टेलेव्हिजन वर प्रक्षेपित झाला.

२०११: “द किंग्स स्पीच” या हॉलीवूड चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला.

लिनस कार्ल पॉलिंग
लिनस कार्ल पॉलिंग

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८७३: सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या ’सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष. क्लेमंट अ‍ॅटली हे देखील या आयोगाचे एक सदस्य होते, जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. (मृत्यू: ११ जानेवारी १९५४)

१८९७: डॉ. शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक. पंढरपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे (१९५५) ते अध्यक्ष होते. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७४)

कृष्णकांत
कृष्णकांत

१९०१: लिनस कार्ल पॉलिंग – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, नोबेल पारितोषिकाचे दोनदा विजेते [१९५४ – रसायनशास्त्र, १९६२ – शांतता] (मृत्यू: १९ ऑगस्ट१९९४)

१९१३: हिंदी भाषेचे प्रसिद्ध लेखक नरेंद्र शर्मा यांचा जन्म.

१९२७: कृष्णकांत – भारताचे १० वे उपराष्ट्रपती (मृत्यू: २७ जुलै २००२)

रविन्द्र जैन – संगीतकार व गीतकार
रविन्द्र जैन – संगीतकार व गीतकार

१९२९: भारतीय-अमेरिकन संशोधन रंगास्वामी श्रीनिवासन यांचा जन्म.

१९४२: ब्रायन जोन्स – ‘द रोलिंग स्टोन्स‘चे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक (मृत्यू: ३ जुलै १९६९)

१९४४: रविन्द्र जैन – संगीतकार व गीतकार

१९४७: मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचा जन्म.

विदुषी पद्मा तळवलकर
विदुषी पद्मा तळवलकर
करसन घावरी – भारतीय क्रिकेटपटू
करसन घावरी – भारतीय क्रिकेटपटू

१९४७: मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा जन्म.

१९४८: विदुषी पद्मा तळवलकर – ग्वाल्हेर/किराणा/जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका

१९५१: करसन घावरी – भारतीय क्रिकेटपटू

१९६८: मराठी चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा जन्म.

१९६८: प्रसिद्ध हिंदी लेखक हुसैन जैदी यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर
स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरे

१५७२: महाराणा प्रताप यांचे वडील राणा उदयसिंह यांचे निधन.

१९२६: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद  यांचे निधन – लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले, त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही. कविता मात्र बालपणापासून करीत होते.  स्वातंत्रवीर सावरकरांशी निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्याकांक्षेची दिशा गवसली. (जन्म: ९ फेब्रुवारी १८७४ – नाशिक)

कमला नेहरू
कमला नेहरू
राजेंद्रप्रसाद
राजेंद्रप्रसाद

१९३६: कमला नेहरू – पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी पुण्यतिथि (जन्म: १ ऑगस्ट १८९९)

१९६३: डॉ. राजेन्द्र प्रसाद – भारताचे पहिले राष्ट्रपती (जन्म: ३ डिसेंबर १८८४)

१९६६: उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार. त्यांनी पंजाब विद्यापीठातून’शास्त्री’ आणि कलकत्ता विद्यापीठातून ’काव्यतीर्थ’ या उपाध्या मिळवल्या.

उदयशंकर भट्ट
उदयशंकर भट्ट
कॄष्ण गंगाधर दिक्षीत
कॄष्ण गंगाधर दिक्षीत

१९६७: टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक हेन्री लूस यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १८९८)

१९८०: भारताचे राजनीति तज्ञ पंडित के. संतानम यांचे निधन.

१९८६: स्वीडनचे २६ वे पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांची हत्या. (जन्म: ३० जानेवारी १९२७)

राजा गोसावी
राजा गोसावी

१९९५: कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव – ’सासरमाहेर’, ’भाऊबीज’, ’चाळ माझ्या पायांत’ या चित्रपटांचे त्यांनी कथा, संवाद व गीतलेखन केले होते.

१९९८: राजा गोसावी – अभिनेता यांचे निधन

१९९९: भगवंतराव श्रीपतराव पंतप्रतिनिधी – औध संस्थानचे राजे )

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *