हे पृष्ठ 29 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
On this page, we will list all historical events that have occurred on 29th February. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.
ज्या वर्षाला ४ ने पूर्ण भाग जातो अशा वर्षात लीप दिवस येतो. उदा: २०१२
जागतिक दिवस:
महत्त्वाच्या घटना:
१९९६: क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणार्या केनियाच्या संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडीज संघाला ७३ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला.
२०००: शशिकिरण भारताचा ५ वा ग्रँडमास्टर बनला.
२०१२: ६३४ मीटर उंचीच्या ‘टोकियो स्काय ट्री‘ या जगातील सर्वात उंच मनोऱ्याचे (इमारत नव्हे) बांधकाम पूर्ण झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८९६: मोरारजी देसाई – भारताचे ४ थे पंतप्रधान, स्वातंत्र्यसेनानी व गांधीवादी नेते, ’भारतरत्न’ (मृत्यू: १० एप्रिल १९९५)
१९०४: रुक्मिणीदेवी अरुंडेल – भरतनाट्यम नर्तिका (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९८६)
१९४०: गोपीचंद हिंदुजा – उद्योगपती
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१५९२ – अलेस्सांद्रो स्ट्रिजियो, इटालियन संगीतकार.
१९४०: इंग्लिश लेखक एडवर्ड फ्रेडरिक बेन्सन यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९४७)
१९४४: फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष पेह्र एविंड स्विन्हुफ्वुड यांचे निधन.
१९५६: फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष एल्पिडियो क्विरिनो यांचे निधन.