dinvishesh-mpsc-10-april
dinvishesh-mpsc-10-april

हे पृष्ठ 10 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 10th April. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केली
स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केली

१८७५: स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केली.

१८७५: महर्षी स्वामी दयानंद यांनी आर्य समाजाची स्थापना केली.

१९१२: जगप्रसिद्ध टायटॅनिक बोटीचा पहिला प्रवास सुरु.

१९१२: इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन बंदरातुन ’टायटॅनिक’ जहाजाचे पहिल्या (व शेवटच्या) सफरीवर प्रयाण.

१९५५: योहान साल्क या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम पोलिओ लशीची यशस्वी चाचणी केली.

१९८२: भारताचा पहिला उपग्रह इन्सॅट वन याचे अंतराळात उड्डाण.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

घनश्याम दास बिर्ला, भारतीय उद्योगपती
घनश्याम दास बिर्ला, भारतीय उद्योगपती

१७५५: डॉ. सामुएल हानेमान, होमिओपॅथीचे जनक.

१८४३: रामचंद्र भिकाजी गुंजीकर – ’मोचनगड’ या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि ’विविध ज्ञानविस्तार’ मासिकाचे संपादक (मृत्यू: १८ जून १९०१)

१८४७: जोसेफ पुलित्झर – हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक, वृत्तपत्र क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणार्‍यांना देण्यात येणार्‍या पुलित्झर पुरस्कारांचे प्रवर्तक (मृत्यू: २९ आक्टोबर १९११)

१८८०: सर सी. वाय. चिंतामणी – स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार, पहिल्या गोलमेज परिषदेचे विशेष अतिथी, उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री (मृत्यू: १ जुलै १९४१)

१८९४: घनश्याम दास बिर्ला, भारतीय उद्योगपती.

१८९४: घनश्यामदास बिर्ला – व्यापारी पार्श्वभूमीतून पुढे येऊन पुढे प्रचंड औद्योगिक साम्राज्य उभारलेले उद्योगपती (मृत्यू: ११ जून १९८३)

१९०१: डॉ. धनंजय रामचंद्र तथा द. रा. गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे खंदे समर्थक, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु (मृत्यू: ३ मे १९७१)

१९०७: मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार.

१९०७: मोतीराम गजानन तथा मो. ग. रांगणेकर – नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार (मृत्यू: १ फेब्रुवारी १९९५)

१९२७: मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा – भारतीय खगोलशास्त्रज्ञ. तार्‍यांची प्रत आणि त्यांच्या वर्णपटातील परस्परसंबंधांची उकल केली. (मृत्यू: १० ऑगस्ट १९८२)

१९३१: किशोरी आमोणकर – शास्त्रीय गायिका

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१३१७: संत गोरा कुंभार.

१६७८: थोर विदुषी वेणाबाई, रामदासस्वामींची मानसकन्या, प्रवचनकार .

ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर.

१८१३: जोसेफ लाग्रांगे – इटालियन गणितज्ञ (जन्म: २५ जानेवारी १७३६)

१९३१: खलील जिब्रान – लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार (जन्म: ६ जानेवारी १८८३)

१९३७: डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर – ज्ञानकोशकार. ’महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य होय. (जन्म: २ फेब्रुवारी १८८४ – रायपूर, मध्य प्रदेश)

१९४९: बिरबल सहानी – पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष (जन्म: १४ नोव्हेंबर १८९१ – सहारणपूर, उत्तर प्रदेश)

१९६५: डॉ. पंजाबराव देशमुख – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते. (जन्म: २७ डिसेंबर १८९८)

१९९५: मोरारजी देसाई – भारताचे ४ थे पंतप्रधान, स्वातंत्र्यसेनानी व गांधीवादी नेते, ’भारतरत्‍न’ (जन्म: २९ फेब्रुवारी १८९६)

२०००: डॉ. श्रीधर भास्कर तथा ’दादासाहेब’ वर्णेकर – संस्कृत पंडित (जन्म: ३१ जुलै १९१८)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *