कल्पना चावला
कल्पना चावला

हे पृष्ठ 1 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 1 February. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

वॉरेन अ‍ॅंडरसन
वॉरेन अ‍ॅंडरसन

२००४: मक्‍का येथे चालू असलेल्या हज यात्रेत चेंगराचेंगरी होऊन २५१ यात्रेकरू ठार तर २४४ लोक जखमी झाले.

१९९२: भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अ‍ॅंडरसन याला फरारी घोषित केले.

१९८१: ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यूझीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाऊ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म बॉल टाकण्यास सांगितले. ट्रेव्हरने चॅपलने तसा चेंडू टाकला व ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर अंडरआर्म गोलंदाजी बेकायदा ठरवण्यात आली.

१९७९: १५ वर्षे विजनवासात काढल्यानंतर ईराणचे आयातुल्ला खोमेनी तेहरानला परतले.

१९६६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्नपाणी व औषधे वर्ज्य करुन प्रायोपवेशनास प्रारंभ केला.

१९६४: प्र. बा. गजेन्द्रगडकर यांनी भारताचे ७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

सुधी रंजन दास
सुधी रंजन दास

१९५६: सुधी रंजन दास यांनी भारताचे ५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९४६: नऊ शतकांची राजसत्ता बरखास्त करुन प्रजासत्ताक बनण्यास हंगेरीच्या संसदेने मान्यता दिली.

१९४१: डॉ. के. बी. लेले यांनी ’गुरुकिल्ली’ हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले.

१८९३: थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली.

१८८४: ’ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.

१८३५: मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत

१६८९: गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

अजय जडेजा
अजय जडेजा

१९७१: अजय जडेजा – क्रिकेटपटू

१९६०: जॅकी श्रॉफ – अभिनेता

१९३१: बोरिस येलत्सिन – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष (मृत्यू: २३ एप्रिल २००७)

१९२९: जयंत साळगावकर – ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक (मृत्यू: २० ऑगस्ट २०१३)

१९२७: मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली (२००८) येथील ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू: २६ जानेवारी २०१५ – सांगली)

ए. के. हनगल
ए. के. हनगल

१९१७: ए. के. हनगल – चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: २६ ऑगस्ट २०१२)

१९१२: राजा बढे – संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक, कवी आणि गीतकार (मृत्यू: ७ एप्रिल १९७७)

१९०१: क्लार्क गेबल – अमेरिकन अभिनेता (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६०)

१८८४: ’विद्यानिधी’ सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार (मृत्यू: ६ जानेवारी १९८४)

१८६४: जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ (मृत्यू: ५ जानेवारी १९४३)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

अनिल मोहिले
अनिल मोहिले

२०१२: अनिल मोहिले – संगीतकार व संगीत संयोजक (जन्म: ? ? ????)

२००३: कल्पना चावला – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (जन्म: १ जुलै १९६१)

१९९५: मोतीराम गजानन तथा मो. ग. रांगणेकर – नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार (मृत्यू: १० एप्रिल १९०७)

१९७६: वेर्नर हायसेनबर्ग – ’क्‍वांटम मॅकॅनिक्स’मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९३२) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ५ डिसेंबर १९०१)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.