५ जानेवारी दिनविशेष - 5 January in History
५ जानेवारी दिनविशेष - 5 January in History

हे पृष्ठ 5 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ५ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 5 January. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१६५९: मुघल सम्राट औरंगजेब ने शाह शुजा ला युद्धात हरविले.

१६६४: छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर पोहोचले. त्यांनी सुरतेचा सुभेदार इनायत खान याला खंडणी देण्यासाठी निरोप पाठविला.

१६७१: मराठ्यांनी मुघलांबरोबर साल्हेरची लढाई जिंकली.

१८३२: दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित.

१९१९: द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले.

१९२४: महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य लोकांसाठी खुले केले.

१९३३: सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट ब्रिजच्या बांधकामाला सुरूवात झाली.

१९४८: ’रोझ बाऊल फुटबॉल’ स्पर्धेचा जगातील पहिला रंगीत माहितीपट (News Reel) ’वॉर्नर ब्रदर्स’ तर्फे जगांतील चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला.

१९४९: पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.

१९५७: विक्रीकर कायदा सुरू झाला.

१९७१: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या मध्ये पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना मेलबर्न येथे खेळल्या गेला.

गेरहार्ड फिशर
गेरहार्ड फिशर

१९७४: अंटार्क्टिकामधील सर्वोच्‍च तापमानाची (१५º सेल्सिअस) नोंद

१९९७: रशियाने चेचेन्यातुन सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.

१९९८: ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते ’महात्मा गांधी शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

१९९९: द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले.

२००४: ’संभाजी ब्रिगेड’ या जातीयवादी संघटनेने केलेल्या समाजकंटकांच्या हल्ल्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटचे अतोनात नुकसान. अनेक अमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले.

२००६: भारत आणि नेपाळ ने पारगमन करार ६ महिन्यांनी वाढविला.

२०१४: ला भारतीय संचार उपग्रह जीसॅट -१४ चे यशस्वी प्रक्षेपण. तेही भारतीय क्रायोजेनिक इंजिन चा वापर करून.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१५९२: शहाजहान – ५ वा मुघल सम्राट (मृत्यू: २२ जानेवारी १६६६)

१६६६: ला शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंह यांचा जन्म.

१८५५: किंग कँप जिलेट – अमेरिकन संशोधक व उद्योजक (मृत्यू: ९ जुलै १९३२)

१८६८: मराठी संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू यांचा जन्म.

१८६९: कन्नड साहित्यिक व्यंकटेश तिरको कुलकर्णी यांचा जन्म.

१८८०: ला भारताचे स्वातंत्र्य सैनिक बारीन्द्र कुमार घोष यांचा जन्म.

१८९२: कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी – लेखक व मराठी भाषातज्ञ (मृत्यू: १२ जून १९६४ – मुंबई)

१९१३: मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २००७)

१९२२: मोहम्मद उमर ’मुक्री’ – आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते (मृत्यू: ४ सप्टेंबर २०००)

ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी

१९२५: मराठी साहित्यिक रमेश मंत्री यांचा जन्म.

१९२८: झुल्फिकार अली भुट्टो – पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान (मृत्यू: ४ एप्रिल १९७९)

१९३४: भारतीय राजनीती तज्ञ मुरली मनोहर जोशी यांचा जन्म.

१९४१: मन्सूर अली खान पतौडी – भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९ वे व शेवटचे नबाब (मृत्यू: २२ सप्टेंबर २०११)

१९४८: पार्थसारथी शर्मा – क्रिकेटपटू (मृत्यू: २० आक्टोबर २०१०)

दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोण

१९४८: फैय्याज – अभिनेत्री व गायिका

१९५२: ला भारतीय संसदेचे सदस्य शुशील कुमार मोदी यांचा जन्म.

१९५५: ममता बॅनर्जी – केंद्रीय मंत्री, पश्चिम बंगालच्या ८ व्या व पहिल्याच महिला मुख्यमंत्री

१९७३: ला भारतीय चित्रपटाचे अभिनेते तसेच निर्माता उदय चोप्रा यांचा जन्म.

१९८६: दीपिका पदुकोण – कन्नड, हिन्दी आणि तामिळ चित्रपट कलाकार

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

श्रीपाद नारायण पेंडसे
श्रीपाद नारायण पेंडसे

१८४७: कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ आणि गायक त्यागराज यांचे निधन.

१९३३: काल्व्हिन कूलिज – अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ४ जुलै १८७२)

१९४३: जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ (जन्म: १ फेब्रुवारी १८६४)

रमेश बहल
रमेश बहल

१९५९: ला मैसूर चे महाराजा मिर्ज़ा इस्माइल यांचे निधन.

१९७१: भारतीय जादुगार पी. सी. सरकार यांचे निधन.

१९८२: सी. रामचंद्र – संगीतकार (जन्म: १२ जानेवारी १९१८)

१९९०: रमेश बहल – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म: ? ? ????)

गोपालदास पानसे
गोपालदास पानसे

१९९२: दत्तात्रय गणेश गोडसे – इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार (जन्म: ३ जुलै १९१४)

२००३: गोपालदास पानसे – पखवाजवादक (जन्म: ? ? ????)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *