४ सप्टेंबर दिनविशेष - 4 September in History
४ सप्टेंबर दिनविशेष - 4 September in History

हे पृष्ठ 4 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ४ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 4 September. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

व्हेनिसमधील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘प्रभात’च्या ‘संत तुकाराम’
व्हेनिसमधील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘प्रभात’च्या ‘संत तुकाराम’

महत्त्वाच्या घटना:

१८८२: थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.

१८८८: जॉर्ज इस्टमन याने ’कोडॅक’ हा ट्रेडमार्क नोंदवला व फिल्म कॅमेर्‍याचे पेटंट घेतले.

१९०९: लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काऊटचा पहिला मेळावा झाला.

१९३७: व्हेनिसमधील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ’प्रभात’च्या ’संत तुकाराम’ या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली. इतर दोन चित्रपट होते ऑस्ट्रेलियाचा ’फ्लाइंग डॉक्टर’ आणि हंगेरीचा ’मारिया नोव्हेर’.

लॅरी पेज
लॅरी पेज
सर्गेइ ब्रिन
सर्गेइ ब्रिन

१९०९: बालवीर (Scout) चळवळीचा पहिला मेळावा झाला. लॉर्ड बेडन पॉवेल यांनी सुरू केलेली ही चळवळ थोड्याच काळात जगभर पसरुन लोकप्रिय झाली.

१९९८: स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी ’गुगल’ची स्थापना केली.

१९७२: मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला.

१९९८: स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.

२००१: Hewlett Packard या कंपनीने संगणक क्षेत्रातील Compaq Corporation ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली.

२०१२: लंडनमध्ये मध्ये झालेल्या पॅरालंपिक स्पर्धेत भारतीय पॅरालंपिक खेळाडू गिरीशने उंच उडी क्रीडा प्रकारात भारताला पहिले पदक मिळवून दिले.

२०१३: रघुराम राजन यांनी ’रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’चे २३ वे गव्हर्नर म्हणुन पदभार हाती घेतला.

२०१८: युवा भारतीय बॅडमिंटनपटू अनुष्का पारीख आणि सौरभ शर्मा यांनी युक्रेनच्या खारकिव्ह येथे खारकिव्ह आंतरराष्ट्रीय चॅलेंजच्या मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

पितामह दादाभाई नौरोजी
पितामह दादाभाई नौरोजी

१२२१: श्री चक्रधर स्वामी – महानुभाव पंथाचे संस्थापक (मृत्यू: ७ फेब्रुवारी १२७४)

१८२५: पितामह दादाभाई नौरोजी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि राजकीय व सामाजिक नेते, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय (मृत्यू: ३० जून १९१७)

१८८०: भारतीय स्वातंत्र संग्रामातील प्रसिद्ध क्रांतिकारक तसचं, प्रख्यात समाजशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ भूपेंद्रनाथ दत्त यांचा जन्मदिन.

१८९५: प्रसिद्ध भारतीय हिंदी लेखक व राष्ट्रकवि मैथिलीशरण गुप्त यांचे छोटे भाऊ सियाराम शरण गुप्त यांचा जन्मदिन.

१९०१: जॅग्वोर कार चे सहसंस्थापक विल्यम लियन्स जॅग्वोर यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९८५)

१९०५: मिनॉक्स चे शोधक वॉल्टर झाप यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै २००३)

१९१३: परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर – प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९९८)

परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर
परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर

१९२३: भारतीय वकील आणि राजकारणी राम किशोर शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००३)

१९३७: शंकर सारडा – साहित्यिक व समीक्षक. सारडा यांनी ६० हून अधिक पुस्तकं लिहिली असून, दोन हजांराहून अधिक पुस्तकांचं समीक्षण केलं आहे. (मृत्यू: २८ जानेवारी २०२१)

१९४१: सुशीलकुमार शिंदे – प्रसिद्ध भारतीय राजकारणी व भारतीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसचं, माजी केंद्रीय गृहमंत्री

ऋषी कपूर
ऋषी कपूर
सुशीलकुमार शिंदे
सुशीलकुमार शिंदे

१९५२: ऋषी कपूर – सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते

१९६२: किरण मोरे – भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू आणि यष्टीरक्षक तसचं, बीसीसीआय निवड समितीचे माजी अध्यक्ष

१९६४: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर २०१५)

१९७१: लान्स क्लूसनर – दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९१२: भारतेंदु कालीन अग्रगण्य साहित्यिकांपैकी एक सुप्रसिद्ध साहित्यकार मोहनलाल विष्णू पंड्या यांचे निधन.

१९९७: डॉ. धर्मवीर भारती – हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व ’धर्मयुग’ साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक, ’अभ्युदय’ व ’संगम’ या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले. (जन्म: २५ डिसेंबर १९२६)

मोहम्मद उमर
मोहम्मद उमर

२०००: मोहम्मद उमर ’मुक्री’ – आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते (जन्म: ५ जानेवारी १९२२)

२०१२: भारतीय लेखक सय्यद मुस्तफा सिराज यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९३०)

२०१२: भारतीय गायक-गीतकार हांक सूफी यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९५२)

२०१५: भारतीय सर्जन आणि राजकारणी विल्फ्रेड डी डिसोझा यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १९२७)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *