२८ जानेवारी दिनविशेष - 28 January in History
२८ जानेवारी दिनविशेष - 28 January in History

या पृष्ठावर, आम्ही २८ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 28 January. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

शेख मुजीबूर रहमान
शेख मुजीबूर रहमान

१६४६: मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध

१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला.

१९६१: ’एच. एम. टी. वॉच फॅक्टरी’ हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला.

१९७७: मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९८६: चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर ७४ सेकंदांनी स्फोट झाला.

२०१०: १९७५ मधे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करणाऱ्या ५ जणांना फाशी देण्यात आले.

सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर
सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१४५७: हेन्‍री (सातवा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: २१ एप्रिल १५०९)

१८६५: ’पंजाब केसरी’ लाला लजपतराय – स्वातंत्र्यसेनानी (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९२८)

१८९९: फील्डमार्शल के. एम. करिअप्पा – स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख (मृत्यू: १५ मे १९९३)

डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष
डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष

१९२५: डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष (मृत्यू: २३ सप्टेंबर २००४)

१९३०: पं. जसराज – मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक

१९३७: सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर – चित्रपट व भावगीत गायिका. त्यांनी हिन्दी, मराठी, गुजराथी, बंगाली, पंजाबी, उरिया इ. अनेक भाषांत गाणी गायिली आहेत.

१९५५: निकोलस सारकोझी – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

सोहराब मेहेरबानजी मोदी
सोहराब मेहेरबानजी मोदी
डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे
डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे

१५४७: हेन्‍री (आठवा) – इंग्लंडचा राजा (जन्म: २८ जून १४९१)

१६१६: संत दासोपंत समाधिस्थ (जन्म: २४ सप्टेंबर १५५१)

१८५१: बाजीराव पेशवे (दुसरे) यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे निधन झाले. (जन्म: १० जानेवारी १७७५)

१९८४: सोहराब मेहेरबानजी मोदी – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित (१९७९), ’मिनर्व्हा मुव्हीटोन’तर्फे त्यांनी चाळीसहून अधिक चित्रपट निर्माण केले. (जन्म: २ नोव्हेंबर १८९७)

ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर – संगीतकार
ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर – संगीतकार

१९९६: बर्न होगार्थ – जंगलचा सम्राट टारझन याला कार्टुनद्वारे अजरामर करणारे अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ (जन्म: २५ डिसेंबर १९११ – शिकागो, इलिनॉय, यू. एस. ए.)

१९९७: डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां. वा. सुखात्मे – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ, पद्मभूषण (१९७१) (जन्म: २७ जुलै १९११)

२००७: ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर – संगीतकार (जन्म: १६ जानेवारी १९२६)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *