१५ मे दिनविशेष - 15 May in History
१५ मे दिनविशेष - 15 May in History

हे पृष्ठ 15 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 15th May. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

विश्व कुटुंबसंस्था दिन.

विश्व कुटुंबसंस्था दिन.

स्वातंत्र्य दिन : पेराग्वे.

सेना दिन : स्लोव्हेकिया.

शिक्षक दिन : मेक्सिको, दक्षिण कोरिया.

महत्त्वाच्या घटना:

१७१८: जगातल्या पहिल्या मशीन गन बंदूकेचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले.

१७३०: रॉबर्ट वॉल्पोल युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान झाले.

१८११: पॅराग्वेला (स्पेनकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१८३६: सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी दिसणार्‍या ’बेलीज बीड्‌स’चे शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केले.

१९०५: अमेरिकेतील नेवाडा राज्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या वेगास शहराची स्थापना करण्यात आली.

१९२८: मिकी माऊस कार्टून प्लेन क्रेजी या शो मधून पहिल्यांदा प्रसारित केले गेले.

१९३५: मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.

१९४०: सॅन बर्नाडिनो, कॅलिफोर्निया येथे ’मॅक्डोनाल्डस’ (McDonald’s) चे पहिले उपहारगृह सुरू झाले.

१९४०: दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९५८: सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ३ चे प्रक्षेपण केले.

१९६०: सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ४ चे प्रक्षेपण केले.

१९६१: पुण्याच्या चतु:शृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ जणांचा मृत्यू

१९८०: संपूर्ण भारतीय बनावटीच्या गोदावरी या पाणबुडीचे माझगाव गोदीमध्ये जलावतरण.

१९९३: संयुक्त राष्ट्राच्या सदस्य राष्ट्रांनी १५ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय परिवार दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

२०००: दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू – काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह ५ जण ठार

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

देवेंद्रनाथ टागोर, बंगाली समाजसुधारक.
देवेंद्रनाथ टागोर, बंगाली समाजसुधारक.

१८१७: देवेंद्रनाथ टागोर, बंगाली समाजसुधारक.

१८५९: पिएर क्युरी, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.

१८९२: भारतीय वकील व पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि राजकारणी तसचं, भारतीय लोकसभा मतदार संघाचे सदस्य आणि मध्य प्रदेशचे माजी राज्यपाल हरि विनायक पाटसकर यांचा जन्मदिन.

१९०३: रा. श्री. जोग – साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७७)

१९०७: ’सुखदेव’ थापर – क्रांतिकारक (मृत्यू: २३ मार्च १९३१)

१९१४: तेनसिंग नोर्गे, एव्हरेस्ट वर प्रथम चढाई करणार्‍या एडमंड हिलरी यांचे सहकारी.

१९२६: माजी भारतीय नौदल अधिकारी महेंद्रनाथ मुल्ला यांचा जन्मदिन.

१९६७: माधुरी दिक्षीत-नेने – अभिनेत्री 

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

फिल्डमार्शल के. एम. करिअप्पा
फिल्डमार्शल के. एम. करिअप्पा

१३५०: संत जनाबाई.

१७२९: वैशाख व. १४, शके १६५१ मराठेशाहीच्या आपत्‌प्रसंगी पराक्रम गाजवणारे खंडेराव दाभाडे यांचे निधन.

१९५८: मुगल राजघराण्यातील प्रमुख भारतीय इतिहासकार यदुनाथ सरकार यांचे निधन.

१९९३: फील्डमार्शल के. एम. करिअप्पा – स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख (जन्म: २८ जानेवारी १८९९)

१९९४: पी. सरदार, चित्रकार व दिनदर्शिका चित्र निर्माता.

१९९४: ओम अग्रवाल – जागतिक हौशी स्‍नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता

२०००: सज्जन – जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते. तलाक (१९५८), बीस साल बाद (१९६२)

२००३: अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका जून कार्टर यांचे निधन

२००७: लिबर्टी विद्यापीठाचे स्थापक जेरी फेलवेल यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९३३)

२०१०: भारताचे ११ वे उपराष्ट्रपती व राजस्थान राज्याचे माजी मुख्यमंत्री भैरोसिंह शेखावत यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

2 Comments

  1. खंडेराव दाभाडे यांचे निधन २७ सप्टेंबर १७२९ ला झालय

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *