२४ सप्टेंबर दिनविशेष - 24 September in History
२४ सप्टेंबर दिनविशेष - 24 September in History

हे पृष्ठ 24 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २४ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 24 September. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१६६४: नेदरलँड्सने न्यू ऍम्स्टरडॅम इंग्लंडच्या हवाली केले.

१८७३: महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

१९३२: दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी सर्व प्रांतांमधे सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात असा प्रमुख राजकीय नेत्यांमधे करार झाला. त्यावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या आहेत. हा करार ’पुणे करार’ या नावाने ओळखला जातो.

१९४६: हाँगकाँग येथे ’कॅथे पॅसिफिक एअरवेज’ची स्थापना झाली.

१९४८: होन्डा मोटर कंपनीची (Honda Motor Company) स्थापना.

१९६०: अणूशक्तीवर चालणार्‍या ’यू. एस. एस. एंटरप्राइझ’ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण

१९७३: गिनी-बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.

१९९०: साली शनि ग्रहावर पांढऱ्या रंगाचा डाग पाहण्यास मिळाला.

१९९४: ’सॅटॅनिक व्हर्सेस’ या कादंबरीमुळे गाजलेले वादग्रस्त लेखक डॉ. सलमान रश्दी यांच्यावरील मृत्यूदंडाचा फतवा मागे घेतल्याचे इराण सरकारने जाहीर केले.

१९९५: गेली अनेक वर्षे वाचकप्रिय ठरलेल्या ’मृत्यूंजय’ या कादंबरीसाठी लेखक शिवाजी सावंत यांना ’भारतीय ज्ञानपीठ’ या संस्थेतर्फे ’मूर्तिदेवी पुरस्कार’ जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.

महेन्द्रसिंग
महेन्द्रसिंग 

१९९९: कैगा अणूशक्ती प्रकल्पातील २२० मेगावॉट क्षमतेचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले.

२००७: भारताने महेन्द्रसिंग धोनीच्या नेतृवाखाली ‘टी २० विश्वकरंडक’ जिंकला.

२००९: साली भारतीय अंतराळ संस्था इस्रो ने जाहीर केलं की, स्वदेशी निर्मित चंद्रयान १ ने चंद्रावर पाणी असल्याचे नमूद केलं.

२०१४: मार्स ऑर्बिटरी मिशन (एमओएम) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इसरो) प्रक्षेपण केलेल्या मार्स ऑर्बिटर ने मार्स ची कक्षा ओलांडली.

२०१५: मक्का शहरात हज चालू असताना चेंगराचेंगरीत ७१७ लोक ठार.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

गुरू राम दास – शिखांचे ४ थे गुरू
गुरू राम दास – शिखांचे ४ थे गुरू

१५३४: गुरू राम दास – शिखांचे ४ थे गुरू (मृत्यू: १ सप्टेंबर १५८१)

१५५१: दासो दिगंबर देशपांडे ऊर्फ दासोपंत – प्रचंड कवी (मृत्यू: २८ जानेवारी १६१६)

१८५६: साली प्रख्यात भारतीय हिंदी निबंध लेखक व नाटककार प्रताप नारायण मिश्र यांचा जन्मदिन.

१८६१: मॅडम भिकाजी रुस्तुम कामा – या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. १९०७ मधे जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत ब्रिटिशांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासंबंधी प्रस्ताव मांडला. त्याच वेळी भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून ’वंदे मातरम’ हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकावला. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९३६)

मॅडम भिकाजी रुस्तुम कामा
मॅडम भिकाजी रुस्तुम कामा

१८७०: नीऑन लाईट चे संशोधक जॉर्जेस क्लॉड यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९६०)

१८८९: केशवराव त्र्यंबक दाते – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, नाट्यशिक्षक. महाराष्ट्र नाटक मंडळी या संस्थेच्या नाटकांमधून त्यांनी काही स्त्री नायिकांच्या भूमिका केल्या. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९७१ – मुंबई)

१८९८: अनंत सदाशिव अळतेकर – प्राच्यविद्यापंडित (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६०)

१९०२: इराणी धर्मगुरु आणि राजकारणी रुहोलह खोमेनी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९८९)

१९११: कॉन्स्टंटिन चेरेनेन्को – सोविएत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव (मृत्यू: १० मार्च १९८५)

१९१५: प्रभाकर शंकर मुजूमदार – चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत, ’भारतवर्ष’, ’भगवानतिलक’, ’मृच्छकटिक’, ’वळवाचा पाऊस’, ’शारदा’ इ. अनेक नाटकांमधे त्यांनी भूमिका केल्या. (मृत्यू: ? ? ????)

१९२१: डॉ. सखाराम गंगाधर मालशे – लेखक, समीक्षक व संपादक. त्यांनी एकोणिसाव्या शतकावर लिहिलेली ’गत शतक शोधताना’ आणि ’तारतम्य’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. डॉ. धनंजय कीर यांच्या साहाय्याने त्यांनी ’महात्मा फुले समग्र वाङ्‍मय’ संपादित केले आहे. (मृत्यू: ७ जून १९९२)

१९२२: गजानन वासुदेव तथा ’ग. वा.’ बेहेरे – ‘सोबत’ साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक (मृत्यू: ३० मार्च १९८९)

१९२४: गुरू चरणसिंग तोहरा – अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष (मृत्यू: ३१ मार्च २००४)

१९२५: भारतीय विज्ञान आणि शैक्षणिक लेखक ऑटो सिंग पेंटल यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर २००४)

आरती साहा
आरती साहा

१९३६: भारतीय उद्योजिक शिवती आदितन यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २०१३)

१९४०: आरती साहा – इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू (मृत्यू: २३ ऑगस्ट १९९४)

१९५०: मोहिंदर अमरनाथ – क्रिकेटपटू आणि समालोचक

१९६३: साली भारतीय दूरदर्शन समालोचक आणि पत्रकार तसचं,  गो न्यूज चॅनेलचे संस्थापक आणि मुख्य संस्थापक पंकज पचौरी यांचा जन्मदिन.

२००२: साली गुजरात येथील अक्षर धाम मंदिरात आतंकवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात सुमारे ३३ लोक ठार तर ८० पेक्षा जास्त नागरिक जख्मी झाले होते.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८९६: स्वीडन देशाचे पहिले पंतप्रधान लुईस गेरहार्ड डी गेर यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १८१८)

१९३९: युनिव्हर्सल स्टुडियो चे संस्थापक कार्ल लामेल्स् यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १८६७)

१९७५: साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय बहुभाषिक लेखक, व चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक अलूरी चक्रपाणी यांचे निधन.

१९९२: सर्व मित्र सिकरी – भारताचे १३ वे सरन्यायाधीश (जन्म: २६ एप्रिल १९०८)

१९९८: वासूदेव पाळंदे – बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक व कुशल संघटक. पुण्यातील ’प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’, ’महाराष्ट्रीय कलोपासक’, ’जागर’ इ. नाट्यसंस्थांच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. (जन्म: ? ? ????)

श्रीपाद रघुनाथ जोशी
श्रीपाद रघुनाथ जोशी

२००२: साली प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ तसचं, भारतातील रिमोट सेन्सिंगचे जनक पी. आर. पिशरोटी यांचे निधन.

२००२: श्रीपाद रघुनाथ जोशी – लेखक, शब्दकोशकार व अनुवादक (जन्म: ? ? ????)

२०१२: साली केरळ राज्य पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध ज्येष्ठ भारतीय मल्याळम भाषिक चित्रपट व रंगमंच अभिनेते के. सुरेंद्रनाथ थिलकन यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *