Contents
हे पृष्ठ 31 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
On this page, we will list all historical events that have occurred on 31st March. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- मुक्ती दिन – माल्टा.
महत्त्वाच्या घटना:

१८६७ : प्रार्थना समाजाची स्थापना
१९२७ : डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला.
१९४२ : हिन्दी स्वांतत्र्य संघाची स्थापना झाली.
१९६६ : रशियाने पहिला मानवनिर्मित उपग्रह ‘ल्युना १०’ अवकाशात सोडला.
१९९७ : भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान.
२००१ : भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याने एकदिवसीय क्रिकेट प्रकारामध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या.
२००१ : सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या.
१९७० : १२ वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोअरर-१ हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले.
१९६४ : मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या.
१९०१ : पहिली मर्सिडिज कार तयार करण्यात आली. ज्या ऑस्ट्रियन राजकीय अधिकार्यासाठी ती बनवली गेली, त्याच्या मुलीचे नाव या गाडीस देण्यात आले.
१८८९ : आयफेल टॉवरचे उद्घाटन झाले. हा बांधायला २ वर्षे, २ महिने व २ दिवस लागले.
१८६७ : डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.
१६६५ : मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यास सुरूवात केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९०६ : जनरल के. एस. थिमय्या, भारतीय सरसेनापती.
१९३८ : शीला दिक्षीत – दिल्लीच्या मुख्यमंत्री
१८७१ : ’कर्नाटकसिंह’ गंगाधर बाळकृष्ण देशपांडे – स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ३० जुलै १९६०)
१८६५ : आनंदीबाई गोपाळराव जोशी – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर (मृत्यू: २७ फेब्रुवारी १८८७)
१८४३ : बळवंत पांडुरंग तथा ’अण्णासाहेब’ किर्लोस्कर – नाटककार (मृत्यू: २ नोव्हेंबर १८८५)
१५९६ : रेनें देंकार्त – फ्रेन्च तत्त्वज्ञ, गणितज्ञ आणि लेखक (मृत्यू: ११ फेब्रुवारी १६५०)
१५१९ : हेन्री (दुसरा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: १० जुलै १५५९)
१५०४ : गुरू अंगद देव – शिखांचे दुसरे गुरू (मृत्यू: २८ मार्च १५५२)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१७२७ : सर आयझेक न्यूटन, इंग्लिश शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञानी.
१९२६ : दत्तात्रय बळवंत पारसनीस, इतिहास संशोधक.
१९४५ : फ्रेडरिक बर्गियस, जर्मन रसायनशास्त्रज्ञ, नोबेल पुरस्कार विजेता.
१९७२ : मीनाकुमारी, हिंदी चित्रपटअभिनेत्री.
२००० : डॉ. हरदेव बहारी, हिंदी लेखक आणि शब्दकोशकार.
२००४ : गुरुचरणसिंग तोहरा, अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष.
२००४ : गणपतराव वडणगेकर गुरुजी, कोल्हापूरचे चित्रकार,कलादिग्दर्शक.
२००४ : गुरू चरणसिंग तोहरा – अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष (जन्म:२४ सप्टेंबर १९२४)
२००४ : तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर – कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज (जन्म: ८ ऑगस्ट १९१२)
१९७२ : महजबीन बानो ऊर्फ ’मीनाकुमारी’ – अभिनेत्री (जन्म: १ ऑगस्ट १९३२)
१९१३ : जे. पी. मॉर्गन – अमेरिकन सावकार (जन्म: १७ एप्रिल १८३७)
मीनाकुमारीची पुण्यतिथी व फोटो मधुबालाचा.
Thank you. We have updated the photo of Meena Kumari.