२८ मार्च दिनविशेष - 28 March in History
२८ मार्च दिनविशेष - 28 March in History

हे पृष्ठ 28 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

२८ मार्च दिनविशेष

On this page, we will list all historical events that occurred on 28th March. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • शिक्षक दिन : चेक प्रजासत्ताक, स्लोव्हेकिया.

महत्त्वाच्या घटना:

१७३६: बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.

१७३७: थोरले बाजीराव पेशवे यांनी दिल्लीवर चाल करुन मोगलांचा पराभव करुन दिल्लीत मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले.

मुंबईतील सहार विमानतळाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले

१८५४: क्रिमियन युद्ध – फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले.

१९१०: हेन्री फाब्रे यांनी फाब्रे हायड्राविओन हे पहिले सागरी विमान उडविले.

१९३०: तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि अंगोरा शहरांची नावे बदलुन अनुक्रमे इस्तंबुल आणि अंकारा अशी करण्यात आली.

१९४१: नेताजी सुभाष चंद्रबोस इंग्रज शासनाच्या नजर कैदी पासून स्वत:चा बचाव करून बर्लिन येथे पोहचले.

१९४२: रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे ’इंडियन इंडिपेन्डन्स लीग’ची स्थापना केली.

१९७९: अमेरिकेतील ’थ्री माईल आयलंड’ या बेटावर असलेल्या अणूभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली.

१९८८: ६१ वि घटना दुरुस्ती करून मतदाराचे किमान वय २१ वर्षांवरून वरून १८ वर्षांवर वर आणण्यात आले

१९९२: भारतीय उद्योगाचे अध्वर्यू जे. आर. डी. टाटा यांना भारतरत्न हा सर्वोच्च भारतीय सन्मान तत्कालीन राष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

१९९८: सी-डॅक ने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.

१९९८: ’सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्‌ड कॉम्प्युटिंग’ (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला ’परम-१००००’ हा महासंगणक विधिपूर्वक देशाला अर्पण करण्यात आला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८६८: मॅक्झिम गॉर्की – रशियन लेखक (मृत्यू: १८ जून १९३६)

१८९६: भारतीय गणितज्ञ, हिंदी विश्वकोशाचे संपादक तसचं, हिंदी भाषेतील वैज्ञानिक साहित्याचे प्रख्यात लेखक गोरख प्रसाद यांचा जन्मदिन.

१९२५: राजा गोसावी – अभिनेता (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९९८)

१९२७: भारतीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्त्या विना मझुमदार यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २०१३)

१९२८: भारतीय कवी आणि मल्याळम भाषेचे गीतकार वायलर रामवर्म यांचा जन्मदिन.

१९५४: भारतीय कम्युनिस्ट, लेखक आणि क्रांतिकारक नेत्या तसचं, बंदी घालण्यात आलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्रातील संस्थापक सदस्या अनुराधा घंडी यांचा जन्मदिन.

१९५६: भारतीय वैज्ञानिक व उद्योगपती तसचं, पिरामल एंटरप्रायजेस लिमिटेडच्या उपाध्यक्ष स्वाती पिरमल यांचा जन्मदिन.

१९६८: नासिर हुसैन – इंग्लिश क्रिकेटपटू

१९८६: अमेरिकन गायिका, गीतकार आणि अभिनेत्री लेडी गागा यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१५५२: गुरू अंगद देव – शिखांचे दुसरे गुरू (जन्म: ३१ मार्च १५०४)

१९४१: व्हर्जिनिया वूल्फ – ब्रिटिश लेखिका (जन्म: २५ जानेवारी १८८२)

१९४३: भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ता आणि राजकारणी एस सत्यमूर्ती यांचे निधन.

१९५९: भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ता व राजकारणी तसचं, आंध्रप्रदेश राज्याचे माजी महसूलमंत्री व अर्थमंत्री कला वेंकट राव यांचे निधन.

१९६९: ड्वाईट आयसेनहॉवर – अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक (जन्म: १४ आक्टोबर १८९०)

१९८४: स्वातंत्र्यसंग्रामातील थोर पुढारी भाऊसाहेब रानडे.

१९९२: आचार्य आनंद ऋषीजी, स्थानकवासी जैन धर्मगुरू.

१९९७: श्रीमती पुपुल जयकर, सामाजिक कार्यकर्ता, भारतीय कला आणि संस्कृतीच्या पुरस्कर्त्या

२०००: शांताराम द्वारकानाथ देशमुख उर्फ राम द्वारकानाथ देशमुख, नामवंत अर्थतज्ञ आणि लेखक.

२००६: भारतीय आध्यात्मिक नेते, जागतिक शांतता कार्यकर्ते, वैज्ञानिक, तत्वज्ञ, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीक अभ्यासक तसचं, चेन्नई मधील जागतिक समुदाय सेवा केंद्राचे संस्थापक योगीराज श्री वेठाथीरी महर्षी यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *