१८ जून दिनविशेष - 18 June in History
१८ जून दिनविशेष - 18 June in History

हे पृष्ठ 18 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही 18 जून रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 18th of June. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • राष्ट्र दिन: सेशेल्स.
  • वॉटरलू दिन: युनायटेड किंग्डम.
  • आंतरराष्ट्रीय सुशी दिवस (International Sushi Day)
  • आंतरराष्ट्रीय सहल दिवस (International Picnic Day)
डॉ. राममनोहर लोहिया
डॉ. राममनोहर लोहिया

महत्त्वाच्या घटना:

१५७६: मुघल शासक अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यात हळदी घाटीच्या युद्धाला सुरुवात झाली.

१७७६: महाराणा प्रताप व अकबर यांच्यात ’हळदी घाटा’ ची सुप्रसिध्द घनघोर लढाई झाली.

१८१५: वॉटर्लूच्या लढाईत नेपोलियनचा दारुण पराभव

१८३०: फ्रान्सने अल्जीरिया ताब्यात घेतले.

१९०८: फिलीपाइन्स विश्वविद्यालाची (University of the Philippines) ची स्थापना झाली.

१९३०: चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला.

रँग्लर र. पु. परांजपे
रँग्लर र. पु. परांजपे

१९४६: डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले. या घटनेच्या स्मरणार्थ पणजींतील एका रस्त्याला ’१८ जून रस्ता’ असे नाव देण्यात आले आहे.

१९५६: रँग्लर र. पु. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.

१९८१: जनावरांमधे आढळणार्‍या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली.

१९८३: अंतराळवीर सैली राइड या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला आहेत.

किदम्बी श्रीकांतला
किदम्बी श्रीकांतला

१९८७: एम. एस. स्वामिनाथन यांना प्रथम जागतिक अन्न पुरस्कार (वल्ड फूड) मिळाला.

२००६: कॅझसॅट या कझाकस्तानच्या पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण.

२००९: अमेरिकन अंतराळ संस्था नासाने चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यासाठी विशेष उपग्रह पाठविला.

२०१३: भारताच्या उत्तराखंड राज्यात मुसळधार पाउस पडून मंदाकिनी व अलकनंदा नद्यांना महापूर. शेकडो मृत्युमुखी, हजारो बेघर.

सुनील छेत्री

२०१७: किदम्बी श्रीकांतला (Srikanth Kidambi ) इंडोनेशिया सुपर सीरिजचे जेतेपद – भारतीय बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने इंडोनेशिया सुपर सीरिज प्रिमिअरच्या पुरुष एकेरीत जेतेपद पटकावले. असे करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

सुनील छेत्री

२०१७: भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने (Sunil Chetri) समकालीन खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.

कमला सोहोनी – पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ
कमला सोहोनी – पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८१७: राजपूत नेपाळ शासक तसचं, नेपाळचे पहिले पंतप्रधान व राणा राजवंशाचे संस्थापक जङ्गबहादुर राणा यांचा जन्मदिन.

१८८७: थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, शिक्षक, राजनीतिज्ञ, तसचं, बिहार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री डॉ.अनुग्रह नारायण सिन्हा यांचा जन्मदिन.

१८९९: शंकर त्रिंबक तथा ’दादा’ धर्माधिकारी – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक (मृत्यू: १ डिसेंबर १९८५)

१९११: कमला सोहोनी – पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ (मृत्यू: ८ सप्टेंबर १९९७)

१९३१: के. एस. सुदर्शन – प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५ वे सरसंघचालक (मृत्यू: १५ सप्टेंबर २०१२)

१९३१: ब्राझील देशाचे समाजशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि राजकारणी तसचं, ब्राझील देशाचे माजी राष्ट्रपती फर्नांडो हेन्रिक कार्डोसो(Fernando Henrique Cardoso) यांचा जन्मदिन.

१९३४: भारतीय वंशीय संगणक वैज्ञानिक, बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थान, संगणक विज्ञान विभागाचे माजी प्राध्यापक ई.वी.  कृष्णमूर्ती यांचा जन्मदिन.

पॉल मॅकार्टनी
पॉल मॅकार्टनी

१९४२: पॉल मॅकार्टनी – संगीतकार, संगीतसंयोजक, वादक, गीतलेखक, ’बीटल्स’चा सदस्य

१९४२: थाबो म्बेकी – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष

१९६५: उदय हुसेन – सद्दाम हुसेन यांचा मुलगा (मृत्यू: २२ जुलै २००३)

१९८६: फ्रेंच व्यावसायिक टेनिसपटू रिचर्ड गॅब्रिएल सायर गैस्के यांचा जन्मदिन.

१९८७: इंग्लंड देशाचे महान क्रिकेटपटू मोईन अली यांचा जन्मदिन.

१९९४: युवा भारतीयह टेनिसपटू प्रार्थना गुलाबराव ठोंबरे यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८५८: मणिकर्णिका तांबे ऊर्फ ’राणी लक्ष्मीबाई’ – झाशीची राणी – इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्‍नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या (जन्म: १९ नोव्हेंबर १८२८)

रामचंद्र भिकाजी गुंजीकर
रामचंद्र भिकाजी गुंजीकर

१९०१: रामचंद्र भिकाजी गुंजीकर – ’मोचनगड’ या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि ’विविध ज्ञानविस्तार’ मासिकाचे संपादक (जन्म: १० एप्रिल १८४३)

१९०२: सॅम्युअल बटलर – इंग्लिश लेखक (जन्म: ४ डिसेंबर १८३५)

१९३६: मॅक्झिम गॉर्की – रशियन लेखक (जन्म: २८ मार्च १८६८)

१९५८: डग्लस जार्डिन – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: २३ आक्टोबर १९००)

१९६२: जे. आर. तथा नानासाहेब घारपुरे – पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक आणि प्राचार्य, नामवंत विद्वान (जन्म: ? ? ????)

सेठ गोविंद दास
सेठ गोविंद दास

१९७४: सेठ गोविंद दास – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक (जन्म: १६ आक्टोबर १८९६)

१९९९: श्रीपाद रामकृष्ण काळे – ५२ कादंबर्‍या आणि ११०० हुन अधिक कथा लिहिणारे साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार (जन्म: ? ? ????)

२००३: जानकीदास – हिन्दी चित्रपटातील चरित्र अभिनेते (जन्म: ? ? १९१०)

२००५भारतीय क्रिकेटपटू मुश्ताक अली यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९१४)

२००९: उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब – मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक, पद्‌मविभूषण (१९६९), मॅकआर्थर फेलोशिप, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, नॅशनल हेरिटेज फेलोशिप (जन्म: १४ एप्रिल१९२२ – शिबपूर, कोमिल्ला, बांगला देश)

२०२०: लच्छमानसिंग लेहल – मेजर-जनरल – वीर चक्र, परम विशिष्ठ सेवा (जन्म: ९ जुलै १९२३)

२०२१: मिल्खा सिंग – द फ्लाइंग शीख, धावपटू – पद्मश्री (जन्म: ८ ऑक्टोबर १९३५)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *