१९ नोव्हेंबर दिनविशेष - 19 November in History
१९ नोव्हेंबर दिनविशेष - 19 November in History

हे पृष्ठ 19 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 19 November. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • आंतरराष्ट्रीय पुरुष दिन
  • World Toilet Day

महत्त्वाच्या घटना:

फूटबॉलपटू पेले
फूटबॉलपटू पेले

१८२४: तत्कालीन रशिया मध्ये आलेल्या भीषण पुरात जवळपास दहा हजार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

१९४६: अफगणिस्तान, आइसलँड आणि स्वीडनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९५२: स्पेन ह्या देशाला युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सदस्यत्व देण्यात आले होते.

१९६०: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना

१९६९: फूटबॉलपटू पेलेने आपला १,००० वा गोल केला.

डॉ. मोहम्मद युनूस
डॉ. मोहम्मद युनूस

१९६९: ’अपोलो-१२’ या अमेरिकन अंतराळयानातुन चार्ल्स कॉनराड आणि अ‍ॅलन बिल हे चंद्रावर उतरले.

१९८२: आजच्याच दिवशी नवव्या आशियाई खेळांची भारतात दिल्ली येथे सुरुवात झाली होती.

१९८६: पर्यावरण संबधी सुरक्षा कायदा आजच्याच दिवशी लागू करण्यात आला होता.

१९९४: ऐश्वर्या रॉयला आजच्याच दिवशी जागतिक सुंदरी म्हणून निवडण्यात आले होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन

१९९५: कर्नम्मा मल्लेश्वरी ने आजच्याच दिवशी भारोत्त लन स्पर्धेत विश्वकिर्तीमान स्थापित केला होता.

१९९७: आजच्याच दिवशी कल्पना चावला अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला बनली होती.

१९९८: व्हिन्सेंट व्हॅन गॉगचे ’द पोर्ट्रेट ऑफ अ‍ॅन आर्टिस्ट विदाऊट अ बेअर्ड’ हे चित्र ७.१५ कोटी डॉलर्सना विकले गेले.

१९९८: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग चालू.

डॉ. एम. एस. स्वामीनाथन
डॉ. एम. एस. स्वामीनाथन

१९९९: शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते ढाक्क्याचे डॉ. मोहम्मद युनूस यांना देण्यात आला.

२०००: शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना प्रदान

२००६: आजच्याच दिवशी भारताने ऑस्ट्रेलिया या देशाला परमाणु उर्जा व युरेनियम पुरवण्या संबधी समर्थन मागितले होते.

२०१३: राष्ट्रीय एकत्मता दिन.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता
दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता

१८२८: मणिकर्णिका तांबे ऊर्फ ’राणी लक्ष्मीबाई’ – झाशीची राणी (मृत्यू: १८ जून १८५८)

१८३१: जेम्स गारफील्ड – अमेरिकेचे २० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १९ सप्टेंबर १८८१)

१८३८: केशव चंद्र सेन – ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक (मृत्यू: ८ जानेवारी १८८४)

१८७५: देवदत्त रामकृष्ण भांडारकर – प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरातत्त्वज्ञ (मृत्यू: १३ मे १९५०)

झीनत अमान
झीनत अमान

१८८८: जोस रॉल कॅपाब्लांका – क्यूबाचा बुद्धीबळपटू (मृत्यू: ८ मार्च १९४२)

१८९७: स. आ. जोगळेकर – चतुरस्त्र साहित्यिक (मृत्यू: ? ? ????)

१९०९: पीटर ड्रकर – ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००५)

१९१४: एकनाथजी रामकृष्ण रानडे – क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार. अधिकाधिक लोकांचा सहभाग असावा म्हणून मोठमोठ्या देणग्या जमा न करता एक एक रुपया जमा करुन त्यांनी विवेकानंद शिला स्मारकाचे प्रचंड काम उभे केले आहे. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८२)

इंदिरा गांधी – भारताच्या ३ र्‍या पंतप्रधान
इंदिरा गांधी – भारताच्या ३ र्‍या पंतप्रधान

१९१७: इंदिरा गांधी – भारताच्या ३ र्‍या पंतप्रधान (मृत्यू: ३१ आक्टोबर १९८४)

१९२२: सलील चौधरी – हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील संगीतकार (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९५ – मुंबई)

१९२३: हिंदी चित्रपट सृष्टीचे प्रसिध्द संगीतकार सलील चौधरी यांचा जन्म झाला होता.

१९२४: हिंदी व भोजपुरी भाषेचे प्रसिध्द साहित्यकार विवेकी राय यांचा जन्म झाला होता.

सुश्मिता सेन
सुश्मिता सेन

१९२८: दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता (मृत्यू: १२ जुलै २०१२)

१९५१: झीनत अमान – अभिनेत्री, मिस एशिया-पॅसिफिक-१९७०

१९७५: सुश्मिता सेन – अभिनेत्री व मॉडेल, मिस युनिव्हर्स-१९९४

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८८३: सर कार्ल विल्हेम सिमेन्स – जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता, अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणारी ’सिमेन्स’ ही बलाढ्य कंपनी त्याच्याच भावाने स्थापन केली आहे. (जन्म: ४ एप्रिल १८२३)

१९७१: कॅप्टन गो. गं. लिमये – मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक, मुंबईत आरोग्याधिकारी असताना हिवतापाला कारणीभूत होणार्‍या डासांवर अभ्यास करुन त्यांनी ’डास तो काय?’ अशा पुस्तकांची मालिका लिहिली होती. (जन्म: ? ? ????)

१९७६: कोव्हेन्ट्री कॅथेड्रल चे रचनाकार बॅसिल स्पेन्स यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९०७)

१९८०: प्रसिध्द उपन्यासकार वाचस्पती पाठक यांचा आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता.

१९९९: रामदास कृष्ण धोंगडे – कीर्तनकार व प्रवचनकार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक (जन्म: ????)

२००८: समाजसुधारक व सर्वोदय आश्रम या संस्थेचे संस्थापक रमेशभाई यांचे निधन झाले होते.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *