३१ ऑक्टोबर दिनविशेष - 31 October in History
३१ ऑक्टोबर दिनविशेष - 31 October in History

हे पृष्ठ 31 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या  सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 31 October. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • संकल्प दिन

महत्त्वाच्या घटना:

१८६४: नेवाडा हे अमेरिकेचे ३६ वे राज्य बनले.

१८७६: भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार

१८८०: धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) च्या दिवशी पुण्यातील आनंदोद्‍भव थिएटरमधे किर्लोस्करांच्या ’संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१९२०: नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.

१९४१: ’माऊंट रशमोअर’ या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.

इंदिरा गांधी
इंदिरा गांधी

१९६६: दिल्ली उच्‍च न्यायालयाची स्थापना

१९६६: प्रसिद्ध भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी पनामा कालवा पोहून पार केला.

१९८४: पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या

राजीव गांधी
राजीव गांधी

१९८४: भारताचे ६ वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.

२०११: जागतिक लोकसंख्या सात अब्जांपर्यंत पोचली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१३९१: एडवर्ड – पोर्तुगालचा राजा (मृत्यू: ९ सप्टेंबर १४३८)

१८९७: चीन गणराज्य (तैवान) चे पहिले पंतप्रधान चियांग काई-शेक यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९७५)

सरदार वल्लभभाई पटेल
सरदार वल्लभभाई पटेल

१८९५: सी. के. नायडू – क्रिकेटपटू (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९६७)

१८७५: सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्‍न (मरणोत्तर – १९९१) (मृत्यू: १५ डिसेंबर १९५०)

१९६१: प्रसिद्ध भारतीय राजकारणी व माजी केंद्रीय क्रीडा व युवा कार्यमंत्री तसचं, आसाम राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सेर्बानंद सोनोवाल यांचा जन्मदिन.

१९२२: कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान नॉरदॉम सिहानोक यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर २०१२)

१९४६: रामनाथ पारकर – क्रिकेटपटू (मृत्यू: ११ ऑगस्ट १९९९)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८८३: मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक (जन्म: १२ फेब्रुवारी १८२४ – तनकारा, मोर्वी, राजकोट, गुजरात)

सचिन देव बर्मन – संगीतकार व गायक
सचिन देव बर्मन – संगीतकार व गायक

१९२९: भारतीय-इंग्लिश अभिनेते नॉर्मन प्रिचर्ड यांचे निधन. (जन्म: २३ जून १८७७)

१९७५: सचिन देव बर्मन – संगीतकार व गायक (जन्म: १ आक्टोबर १९०६)

१९८४: भारताच्या ३ र्‍या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडुन हत्या केली. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१७)

१९८६: आनंदीबाई शिर्के – लेखिका, बालसाहित्यिका (जन्म: ३ जून १८९२)

२००१: प्रसिद्ध भारतीय मुत्सद्दी आणि भारताचे अमेरिकेतील राजदूत तसचं, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे पुतणे ब्रज कुमार नेहरू यांचे निधन.

२००५: अमृता प्रीतम – पंजाबी भाषेतील प्रतिथयश लेखिका आणि कवयित्री. त्यांच्या ’कागज ते कॅनव्हास’ या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८१) देण्यात आला. ’रसीदी टिकट’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (जन्म: ३१ ऑगस्ट १९१९)

२००९: सुमती गुप्ते – मराठीत तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असताना पडद्यावर केवळ सोज्ज्वळ नायिका रंगवून आपल्या सहजसुंदर अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

2 Comments

  1. जागतिक बचत दिन ३०ऑक्टोबर ला असतो तुम्ही चुकून ३१ऑक्टोबर ला लिहिलंय

    1. आम्हाला कळवल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आवश्यक ते बदल केले आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *