३१ ऑगस्ट दिनविशेष - 31 August in History
३१ ऑगस्ट दिनविशेष - 31 August in History

हे पृष्ठ 31 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 31 August. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१८९७: थॉमस अल्वा एडिसनने कायनेटोस्कोपचा पेटंट घेतला.

१९२०: खिलाफत चळवळीची सुरूवात

१९२०: डेट्रोइट मध्ये ८ एमके द्वारे पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित झाला.

१९४७: भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.

१९५७: मलेशियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९६२: त्रिनिदाद व टोबॅगोला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९६८: सर गारफील्ड सोबर्सने (२०१२ मधील छायाचित्र) प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये एका षटकात ६ षटकार फटकावले.

१९७०: राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.

व्ही. व्ही. गिरी
व्ही. व्ही. गिरी

१९७१: अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट हा चंद्रावर मोटारगाडी चालवणारा पहिला मानव बनला. चंद्रावर पाऊल ठेवणारा तो सातवा मानव आहे.

१९९१: किरगिझिस्तानने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.

१९९६: पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९९७: प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना आणि तिचा मित्र डोडी अल फायेद हे पॅरिसमधे एका कार अपघातात ठार झाले.

२००५: बगदादच्या अल-आइम्माह पूलावर झालेल्या चेंगराचेंगरीत १,१९९ ठार.

दामू धोत्रे
दामू धोत्रे

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१२: कालिगुला, रोमन सम्राट.

१५६९: ४ था मुघल सम्राट जहांगीर यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर १६२७)

१८७०: मारिया माँटेसरी – इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ञ. पूर्वप्राथमिक शिक्षणाविषयीच्या त्यांच्या उपक्रमामुळे तशा शाळा ’माँटेसरी’ या नावाने ओळखल्या जातात. (मृत्यू: ६ मे १९५२)

मारिया टेकला आर्टेमिसिया माँटेसरी
मारिया टेकला आर्टेमिसिया माँटेसरी

१८९३: नारायण धोंडोपंत तथा ना. धों. ताम्हनकर – लेखक (मृत्यू: ५ जानेवारी १९६१)

१९०२: दामू धोत्रे – रिंगमास्टर, कसरतपटू व सर्कस मालक. ‘वाघ, सिंह माझे सखे सोबती’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (मृत्यू: ? ? १९७२)

१९०७: रॅमन मॅगसेसे – फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १७ मार्च १९५७)

१९१९: अमृता प्रीतम – पंजाबी भाषेतील प्रतिथयश लेखिका आणि कवयित्री. त्यांच्या ’कागज ते कॅनव्हास’ या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८१) देण्यात आला. ’रसीदी टिकट’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (मृत्यू: ३१ आक्टोबर २००५)

जवगल श्रीनाथ
जवगल श्रीनाथ

१९३१: जयवंत कुलकर्णी – पार्श्वगायक (मृत्यू: १० जुलै २००५)

१९४०: शिवाजी सावंत – साहित्यिक. त्यांची ’मृत्यूंजय’ ही कादंबरी इंग्रजी, कन्नड, गुजराती, मल्याळी इ. भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीला महाराष्ट्र, गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यशासनांचे पुरस्कार तसेच भारतीय विद्यापीठ या संस्थेचा ’मूर्तीदेवी पुरस्कार’ मिळाला आहे. (मृत्यू: १८ सप्टेंबर २००२)

रॅमन मॅगसेसे
रॅमन मॅगसेसे

१९४४: क्लाईव्ह लॉईड – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू

१९६३: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक ऋतुपर्णा घोष यांचा जन्म.

१९६९: जवगल श्रीनाथ – जलदगती गोलंदाज

१९७९: भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते युवन शंकर राजा यांचा जन्म.

काशीराम राणा
काशीराम राणा

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१४२२: हेन्‍री (पाचवा) – इंग्लंडचा राजा (जन्म: १६ सप्टेंबर १३८६)

१९५०: भारतीय गणितज्ञ सुब्बया शिवशंकरनारायण पिल्लई यांचे निधन.

१९७३: ताराबाई मोडक – शिक्षणतज्ञ. कोसबाड येथील आदिवासींच्या जीवनात बालशिक्षण व सुधारणांचे नंदनवन त्यांनी फुलवले. गुजरातेतील बार्टन फिमेल ट्रेनिंग कॉलेजच्या त्या पहिल्या भारतीय प्राचार्या होत्या. बालमंदिरांची निर्मिती हे ताराबाईंचे प्रमुख कार्य आहे. (जन्म: १९ एप्रिल १८९२)

ताराबाई मोडक – शिक्षणतज्ञ
ताराबाई मोडक – शिक्षणतज्ञ

१९९५: ‘खलिस्तानी‘ विभाजनवादी चळवळीचा कणा मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांची चंडीगढ येथील सचिवालयाबाहेर शक्तिशाली बोम्बस्फोटाद्वारे हत्या (जन्म: १९ फेब्रुवारी १९२२)

१९९७: प्रिन्सेस डायना, ब्रिटीश राजकुमारी.

१९९७: डोडी फयेद, ब्रिटीश उद्योगपती.

२०१२: काशीराम राणा – भाजपाचे लोकसभा सदस्य (जन्म: ७ एप्रिल १९३८)

२०१६: भारतीय उर्दू कवी, कादंबरीकार, नाटककार आणि साहित्याचे लघुकथा लेखक कश्मीरी लाल जाकिर यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *