१९ फेब्रूवारी दिनविशेष - 19 February in History
१९ फेब्रूवारी दिनविशेष - 19 February in History

हे पृष्ठ 19 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १९ फेब्रूवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 19 February. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

थॉमस अल्वा एडिसन
थॉमस अल्वा एडिसन
  • छत्रपती शिवाजी महाराज जयंती.

महत्त्वाच्या घटना:

१६३०: माता जिजाऊ ने शिवनेरी किल्ल्यावर शिवबांना जन्म दिला.

१८७८: थॉमस एडिसनने फोनोग्राफचे पेटंट घेतले.

१८८४: यू. एस. ए. च्या दक्षिण भागाला ६० चक्रीवादळांनी तडाखा दिला.

रुझव्हेल्ट
रुझव्हेल्ट

१९४२: पर्ल हार्बरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझव्हेल्ट यांनी जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात ठेवण्याच्या आदेशावर सह्या केल्या

१९८६: आज पहिल्यांदा संगणकीकृत रेल्वे आरक्षण तिकिटांची सुरुवात झाली.

२००३: तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.

२०१४: आजच्या दिवशी फेसबुक ने व्हॉट्सअ‍ॅप ला १९ बिलियन डॉलर ला विकत घेण्याचे घोषित केले, आणि दुसऱ्या दिवशी व्हॉट्सअ‍ॅप ला विकत सुद्धा घेतले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी
माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी

१४७३: निकोलस कोपर्निकस – सूर्यकेन्द्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ (मृत्यू: २४ मे १५४३)

१६३०: छत्रपती शिवाजी महाराज (मृत्यू: ३ एप्रिल १६८०)

१८५९: स्वांते अर्‍हेनिअस – स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज (मृत्यू: २ आक्टोबर १९२७)

१८९८: भारतीय स्वातंत्र्य सैनिक गोकुलभाई भट्ट यांचा जन्म.

१८९९: गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री बळवंतराय मेहता यांचा जन्म.

१९००: आजच्या दिवशी गुजरात चे माजी मुख्यमंत्री बळवंतराय मेहता यांचा जन्म.

१९०६: माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक (मृत्यू: ५ जून १९७३)

हॅना मंडलिकोव्हा
हॅना मंडलिकोव्हा

१९१९: अरविंद गोखले – मराठी नवकथेचे जनक, ’गंधवार्ता’ या त्यांच्या कथेला आशियाई-अरबी-अफ्रिकी कथा स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. भारतीय उपखंडातील प्रसिद्ध लेखकांच्या लघुकथांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना १९८४ मधे केंद्र सरकारची फेलोशिप मिळाली होती. (मृत्यू: २४ आक्टोबर १९९२)

१९२२: सरदार बियंत सिंग – ‘खलिस्तानी‘ विभाजनवादी चळवळीचा कणा मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री (मृत्यू: ३१ ऑगस्ट १९९५)

१९२५: आजच्या दिवशी प्रसिद्ध कलाकार राम वी. सुतार यांचा जन्म.

१९३०: दक्षिणात्य चित्रपटाचे दिग्दर्शक काशिनाथ विश्वनाथ यांचा जन्म.

१९४३: भारतीय अभिनेत्री बीना बॅनर्जी यांचा जन्म.

१९६२: हॅना मंडलिकोव्हा – झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू

१९७७: प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

नामदार गोपाळ कृष्ण गोखले
नामदार गोपाळ कृष्ण गोखले

१८१८: पेशव्यांचे अखेरचे सरसेनापती सरदार बापू गोखले यांचे आष्टी येथे निधन (जन्म: ? ? ????)

१८९५: देशाचे प्रसिद्ध प्रकाशक मुंशी नवल किशोर यांचे निधन.

१९१५: नामदार गोपाळ कृष्ण गोखले – थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष, संसदपटू, भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) संस्थापक (जन्म: ९ मे १८६६)

राम कदम
राम कदम

१९५६: केशव लक्ष्मण दफ्तरी – ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत, वैदिक वाङ्‍मय, वेदान्त तत्त्वज्ञान आणि होमिओपाथी हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. अकरा उपनिषदांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. (जन्म: २२ नोव्हेंबर १८८०)

१९५६: आचार्य नरेन्द्र देव – प्रजा समाजवादी पक्षाचे नेते, लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू, सत्याग्रहाचे पुरस्कर्ते व उत्तर प्रदेशातील आमदार (जन्म: ? ? १८८९)

१९७८: पंकज मलिक – गायक व संगीतकार (जन्म: १० मे १९०५)

पंकज मलिक
पंकज मलिक

१९९७: डेंग जियाओ पिंग – सुधारणावादी चिनी नेते (जन्म: २२ ऑगस्ट १९०४)

१९९७: राम कदम – संगीतकार (जन्म: २८ ऑगस्ट १९१८)

२००२: प्रसिद्ध मराठी अभिनेते अनंत मराठे यांचे निधन.

२००३: अनंत मराठे – पौराणिक हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते (जन्म: ? ? ????)

२०१७: भारताचे माजी सर न्यायाधीश अल्तमस कबीर यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *