हे पृष्ठ 28 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही २८ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 28 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
१८४५: ’सायंटिफिक अमेरिकन’ मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९०४: कलकत्ता ते बैरकपुर शहरादरम्यान पहिल्या कार रॅलीचे आयोजन करण्यात आलं होत.
१९१६: पहिले महायुद्ध – जर्मनीने रोमानियाविरुद्ध युद्ध पुकारले.
१९१६: पहिले महायुद्ध – इटालीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९३१: फ्रान्स आणि सोविएत युनियनने शस्त्रसंधी करार केला.
१९३७: ’टोयोटा मोटर्स’ ही स्वतंत्र कंपनी बनली. जपानची जपानी बहुराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह निर्मिती कंपनी ‘टोयोटा मोटर्स’ ची स्थापना करण्यात आली.
१९८६: भाग्यश्री साठे बुद्धिबळ ग्रँडमॅस्टर बनणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
१९९०: इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.
१९९२: श्रीलंकन क्रिकेटपटू व फिरकी गोलंदाज मुथया मुरलीधरन यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१७४९: योहान वूल्फगाँग गटें – जर्मन महाकवी, लेखक, कलाकार आणि राजकारणी (मृत्यू: २२ मार्च १८३२)
१८९६: रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (मृत्यू: ३ मार्च १९८२)
१९०६: नटवर्य चिंतामणी गोविंद तथा ’मामा’ पेंडसे (मृत्यू: ? ? १९९१)
१९०८: विनायक माधव तथा ’विमादी’ पटवर्धन दीक्षित – विनोदकार (मृत्यू: ? ? ????)
१९१३: भोपाल रियासतेच्या राजकुमारी व भारतातील पहिल्या महिला वैमानिक आबिदा सुल्तान यांचा जन्मदिन.
१९१८: राम कदम – मराठी चित्रपट प्रसिद्ध संगीतकार (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७)
१९२६: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित माजी पोलिस सेवा अधिकारी, गुप्तचर विभाग प्रमुख तसचं, सिक्किम, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल टी. व्ही. राजेश्वर यांचा जन्मदिन.
१९२८: उस्ताद विलायत खाँ – सुप्रसिद्ध सतारवादक (मृत्यू: १३ मार्च २००४)
१९२८: भारतीय पदार्थवैज्ञानिक एम. जी. के. मेनन यांचा जन्म.
१९२९: प्रख्यात भारतीय हिंदी भाषिक लेखक, कथाकार, उपन्यासकार आणि आलोचक राजेंद्र यादव यांचा जन्मदिन.
१९३४: सुजाता मनोहर – सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा
१९३८: कॅनडाचे पंतप्रधान पॉल मार्टिन यांचा जन्म.
१९५४: भारतीय-इंग्लिश अर्थशास्त्री रवी कंबुर यांचा जन्म.
१९६५: पोकेमोन चे निर्माते सातोशी ताजीरी यांचा जन्म.
१९६६: प्रिया दत्त – लोकसभा खासदार?
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१६६७: मिर्झा राजे जयसिंग (जन्म: १५ जुलै १६११) – जयपूर चे राजे
१९६९: भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचे निधन.
१९७२: भारतीय नागरी सेवक आणि प्रशासक तसचं, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य एन. माधवराव यांचे निधन.
१९८०: लोकप्रिय बंगाली लेखक, विनोदी व लघुकथाकार व क्रांतिकारक शिब्राम चक्रवर्ती यांचे निधन.
१९८४: इजिप्तचे पहिले राष्ट्रपती मुहम्मद नागुब यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९०१)
१९९०: भारतीय चित्रपट अभिनेत्री सुमित्रा देवी यांचे निधन.
२००१: व्यंकटेश दिगंबर माडगूळकर – लेखक, चित्रकार, पटकथाकार, शिकारी (जन्म: ६ जुलै १९२७)