२७ ऑगस्ट दिनविशेष - 27 August in History
२७ ऑगस्ट दिनविशेष - 27 August in History

हे पृष्ठ 27 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २७ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 27 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

World Rock Paper Scissors Day

महत्त्वाच्या घटना:

१७८१: मैसूर शासक हैदर अली यांनी ब्रिटीश सरकारच्या इस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याशी पोल्लीलूर ची लढाई लढली.

वसंत कानेटकर
वसंत कानेटकर

१९३९: सर फ्रँक व्हीटल आणि हॅन्स ओहायन यांनी शोध लावलेल्या Heinkel He 178 या जगातील पहिल्या टर्बो जेट विमानाचे उड्डाण झाले.

१९५७: मलेशियाची राज्यघटना अमलात आली.

१९६२: अमेरिकन अंतराळ संस्था नासाने शुक्र ग्रहाची तपासणी करण्यासाठी Mariner 2  हे यान प्रक्षेपित केले.

१९६६: वसंत कानेटकर लिखित पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित अश्रूंची झाली फुले या नाटकाचा मुंबईत पहिला प्रयोग.

१९७२: वन्यजीव संरक्षण कायदा संमत.

पुरुषोत्तम दारव्हेकर
पुरुषोत्तम दारव्हेकर

१९९१: मोल्डोव्हाने आपण (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले. १९६६ : नाट्यसंपदा निर्मित, वसंत कानेटकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचा पहिला प्रयोग गिरगाव येथील साहित्य संघ मंदिर येथे झाला.

१९९१: युरोपिअन महासंघाने इस्टोनिया, लाटव्हिया व लिथुआनियाच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.

१९९९: कारगिल संघर्षाच्या वेळी भारताने बंदी घातलेल्या पाकिस्तानी कैद्यांना सोडून दिल.

१९९९: सोनाली बॅनर्जी या आपली चार वर्षांची मेहनत पूर्ण करून देशातील पहिल्या सागरी अभियंता बनल्या.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

सर दोराबजी टाटा
सर दोराबजी टाटा

१८५४: गणेश श्रीकृष्ण तथा ‘दादासाहेब’ खापर्डे – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान आणि राजकीय नेते, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, ’वर्‍हाडचे नबाब’ (मृत्यू: १ जुलै १९३८)

१८५९: सर दोराबजी टाटा – उद्योगपती व लोकहितबुद्धी (मृत्यू: ३ जून १९३२)

१८७७: रॉल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक चार्ल्स रॉल्स यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै १९१०)

सर डोनाल्ड ब्रॅडमन
सर डोनाल्ड ब्रॅडमन

१९०८: सर डोनाल्ड ब्रॅडमन – ऑस्ट्रेलियन फलंदाज, संघनायक व विक्रमवीर. १९४९ मध्ये त्यांना ’सर’ हा किताब देण्यात आला. (मृत्यू: २५ फेब्रुवारी २००१)

१९०८: लिंडन बी. जॉन्सन – अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २२ जानेवारी १९७३)

१९१०: सेतू माधवराव पगडी – इतिहासकार, विचारवंत, संशोधक, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक, ’गॅझेटियर्स’चे संपादक असे विविधांगी पैलू असलेले व्यक्तिमत्त्व. गोंडी व कलामी या आदिवासींच्या बोलिंवर त्यांनी लिखाण केले. ’जीवनसेतू’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (मृत्यू: १४ आक्टोबर १९९४)

१९१६: रेंज रोव्हर चे सहरचनाकार गॉर्डन बाशफोर्ड यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर १९९१)

१९१९: वि. रा. करंदीकर – प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, संतसाहित्याचे अभ्यासक तसचं, राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व मराठी ज्ञानकोशाचे संपादन करणारे (मृत्यू: १५ एप्रिल २०१३)

१९२५: नारायण धारप – भारतीय महाराष्ट्रीयन मराठी रहस्यकथाकार व लेखक आणि नाटककार (मृत्यू: १८ ऑगस्ट २००८)

१९२५: भारतीय कवीजसवंत सिंग नेकी यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर २०१५)

१९३१: भारतीय अध्यात्मिक गुरु चिन्मोय कुमार घोस उर्फ श्री चिन्मोय यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर २००७)

१९७२: मल्ल दिलीपसिंग राणा ऊर्फ ग्रेट खली यांचा जन्म. – भारतीय व्यावसायिक कुस्तीपटू(रेसलर) द ग्रेट खली या रिंग नावाने परिचित

१९८०: भारतीय अभिनेत्री नेहा धुपिया यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८७५: बॅंक ऑफ कॅलिफोर्निया चे संस्थापक विलियम चॅपमन राल्स्टन यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८२६)

मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश
मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश

१९५५: जगन्नाथ रघुनाथ आजगावकर – संतचरित्रकार, १९०७ ते १९३५ या काळात त्यांच्या ’महाराष्ट्र कविचरित्र’ या ग्रंथाचे नऊ खंड प्रकाशित झाले होते. (जन्म: १६ ऑगस्ट १८७९)

१९७६: मुकेश चंद माथूर तथा ‘मुकेश‘ – पार्श्वगायक. तीस वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी १०,००० हून अधिक गीतांना आवाज दिला. ऊर्दू, पंजाबी, तमिळ, बंगाली, मराठी, गुजराथी या भाषांतही त्यांनी गाणी गायली. अनुनासिक स्वर आणि गायकीत ओतप्रोत भरलेलाअ ’दर्द’ ही त्यांच्या गायनशैलीची वैशिष्ट्ये होती. (जन्म: २२ जुलै १९२३)

१९७९: लॉर्ड लुई माउंटबॅटन – भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल (जन्म: २५ जून १९००). ब्रिटीश कालीन भारतातील शेवटचे व्हॉईसरॉय व स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल तसचं, भारत देशाची फाळणी करून नवीन पाकिस्तान देशाची निर्मिती करणारे ब्रिटीश अधिकारी

हृषिकेश मुकर्जी
हृषिकेश मुकर्जी

१९९५: मधू मेहता – हिन्दुस्तान आंदोलनाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते (जन्म: ? ? ????)

२०००: मनोरमा वागळे – रंगभूमी, चित्रपट व मालिकांमध्ये विविध भूमिका केलेक्या अभिनेत्री (जन्म: ? ? १९२८)

२००६: हृषिकेश मुकर्जी – चित्रपट दिग्दर्शक (जन्म: ३० सप्टेंबर १९२२)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *