३ जून दिनविशेष - 3 June in History
३ जून दिनविशेष - 3 June in History

हे पृष्ठ 3 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 3rd June. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

विश्व सायकल दिवस.

महत्त्वाच्या घटना:

३५०: नेपोटियानसने रोममध्ये घुसून स्वतःला सम्राट घोषित केले.

१०९८: पहिली क्रुसेड – आठ महिने चाललेल्या वेढ्यानंतर क्रुसेडरांनी अँटियोक शहर जिंकले.

१५३९: एर्नान्दो दि सोतोने फ्लोरिडा स्पेनचा भाग असल्याचे जाहीर केले.

१६६५: जेम्स स्टुअर्टने नेदरलँड्सच्या आरमाराला हरवले.

१८१८: मराठेशाहीचा अस्त – शेवटचे पेशवे बाजीराव हे मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाले आणि त्यांनी मराठी राज्य इंग्रजांच्या कडे सोपवले . नंतर इंग्रजानी शनिवार वाड्या वर कब्जा केला आणि तिथे युनियन जॅक फडकला

१८३१: ‘भारतीय महिला विद्यापीठ’ या संस्थेची स्थापना. १९२० मध्ये ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ’ (एस.एन.डी.टी.) असे नामांतर.

१८६४: अमेरिकन यादवी युद्ध – कोल्ड हार्बरची लढाई.

१८८९: कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेने कॅनडाचे दोन्ही तीर जोडले.

१९१५: इंग्रज सरकारने रवींद्रनाथ टागोर यांना नाईटहुड ही पदवी बहाल केली.

१९१६: महर्षी कर्वें यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.

१९३७: ड्युक ऑफ विन्डसर व वॉली सिम्पसनचे लग्न.

१९४०: डंकर्कची लढाई – जर्मनीचा विजय. दोस्त सैन्याने पळ काढला.

१९४०: दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने पॅरिसवर बॉम्बवर्षाव केला.

१९४३: झूट सुट दंगे – लॉस एंजेल्स नेव्हल रिझर्व आर्मरीतील ६० लोकांच्या टोळक्याने हिस्पॅनिक दिसणार्‍या लोकांना बडवून काढले.

१९४७: हिन्दूस्तानच्या फाळणीची मांउंटबॅटन योजना जाहीर झाली.

१९५०: मॉरिस हेर्झॉग आणि लुईस लॅचेनल यांनी अन्‍नपूर्णा या ८,०९१ मीटर उंच असलेल्या शिखरावर प्रथमच यशस्वी चढाई केली.

१९६२: एर फ्रांसचे बोईंग ७०७ प्रकारचे विमान पॅरिसहून निघताना कोसळले. १३० ठार.

१९६३: नॉर्थवेस्ट एरलाइन्सचे डी.सी. ७ प्रकारचे विमान ब्रिटिश कोलंबियाच्या किनाऱ्याजवळ कोसळले. १०१ ठार.

१९६८: अँडी वॉरहोल वर खूनी हल्ला.

१९६९: व्हियेतनामजवळ ऑस्ट्रेलियाची विमानवाहू नौका एच.एम.ए.एस. मेलबॉर्न व अमेरिकेची विनाशिका यु.एस.एस. फ्रँक ई. एव्हान्सची टक्कर. एव्हान्सचे दोन तुकडे झाले.

१९७३: सोवियेत संघाचेचे टी.यु. १४४ प्रकारचे विमान फ्रांसमध्ये गुसेनव्हिल जवळ कोसळले. १४ ठार.

१९७९: मेक्सिकोच्या अखातात इहटॉक १ या खनिज तेलाच्या विहिरीला आग लागली. ६,००,००० टन तेल समुद्रात पसरले.

१९८४: ऑपरेशन ब्ल्यु स्टार – भारतीय सैन्याने आत घुसलेल्या अतिरक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्यासुवर्णमंदिरावर हल्ला चढवला.

१९८५: भारत सरकारने पाच दिवसांच्या कार्यदिवस आठवड्याला सुरुवात केली.

१९८९: थ्येनआनमन चौकात सात आठवडे तळ ठोकलेल्या प्रदर्शकांना घालवण्यासाठी चीनने लश्कर पाठवले.

१९९१: जपानमधील माउंट उंझेन ज्वालामुखीचा उद्रेक. ४३ पत्रकार व संशोधकांचा मृत्यू.

१९९८: जर्मनीमध्ये आय.सी.ई रेल्वेगाडी रुळांवरुन घसरली. १०१ ठार.

१९९८: जमिनीवरील हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱ‍या त्रिशूल क्षेपणास्त्राची द्रोणाचार्य या युद्धनौकेवरून कोचीजवळ यशस्वी चाचणी झाली.

२००६: सर्बिया आणि माँटेनिग्रोचे विघटन. माँटेनिग्रोला स्वातंत्र्य.

बाबुराव पेंटर, महान चित्रकार व शिल्पकार.
बाबुराव पेंटर, महान चित्रकार व शिल्पकार.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८४४: प्रसिद्ध भारतीय पत्रकार, कादंबरीकार, नाटककार आणि निबंधकार व साहित्यिक बाळकृष्ण भट्ट यांचा जन्मदिन.

१८६५: इंग्लंडचा राजा जॉर्ज (पाचवा) यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी १९३६)

१८६७: भारतात बालविवाह नियंत्रण कायदा लागू करणारे प्रख्यात भारतीय शैक्षणिक, न्यायाधीश, आणि राजकारणी बिलास सारडा यांचा जन्मदिन.

१८९०: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक बाबूराव पेंटर यांचा जन्म (मूत्यू: १६ जानेवारी १९५४)

१८९०: खान अब्दुल गफारखान, सरहद्ध गांधी. (मृत्यू: २० जानेवारी १९८८)

१८९२: लेखिका तसेच बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९८६)

१८९५: चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत के.एम. पण्णीक्कर यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९६३)

खान अब्दुल गफारखान, सरहद्ध गांधी.
खान अब्दुल गफारखान, सरहद्ध गांधी.

१९२४: तामिळनाडूचे १५ वे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचा जन्म.

१९३०: भारतीय पत्रकार आणि राजकारणी जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म.

१९४१: भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाद्धीश न्यायमूर्ती रुमा पाल यांचा जन्मदिन.

१९६६: पाकिस्तानी क्रिकेट कप्तान जलदगती गोलंदाज वासिम अक्रम यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१६५७: मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वी यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १५७८)

१९३२: उद्योगपती सर दोराबजी टाटा यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १८५९)

१९५६: स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तानचे संपादक, लेखक व नाटककार वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८८१)

आर्चिबाल्ड विवियन हिल, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ.
आर्चिबाल्ड विवियन हिल, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ.

१९७७: आर्चिबाल्ड विवियन हिल, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ.

१९८९: इराणी धर्मगुरू आणि राजकारणी रुहोलह खोमेनी यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९०२)

१९९०: इंटेल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक रॉबर्ट नोयिस यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९२७)

१९९७: चित्रपट व नाट्य अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९१६)

२०००: डॉ. आर.एस. अय्यंगार, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक.

२०१०: अजय सरपोतदार, मराठी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक.

२०१३: जर्मन-भारतीय तंत्रज्ञ आणि पत्रकार अतुल चिटणीस यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १९६२)

२०१४: भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर

१९४९)

२०१६: अमेरिकन बॉक्सर मुहम्मद अली यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९४२)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *