हे पृष्ठ 18 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
On this page, we will list all historical events that occurred on 18th March. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
१८५०: हेन्री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी ’अमेरिकन एक्सप्रेस’ची स्थापना केली.
१९१९: रौलेट अॅक्ट पास झाला
१९२२: महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास
१९४४: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या ईशान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.
१९६५: अंतराळवीर अलेक्सी तिओनोवा हा अंतराळात चालला.
१९६९: ‘कॉसमॉस’ हे मानवविरहित अवकाशयान रशियाने याच दिवशी अवकाशात सोडले
२००१: सरोदवादक अमजद अली खान यांना ’गंधर्व पुरस्कार’ तर तर बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना ’अप्सरा पुरस्कार’ जाहीर
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१५९४: शहाजी राजे भोसले (मृत्यू: २३ जानेवारी १६६४)
१८५८: रुडॉल्फ डिझेल – डिझेल इंजिनचा संशोधक (मृत्यू: २९ सप्टेंबर १९१३)
१८६७: महादेव विश्वनाथ धुरंधर – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट, कलेला वाहून घेतलेल्या या चित्रकाराने सुमारे ५,००० हून अधिक चित्रे काढली. (मृत्यू: १ जून १९४४)
१८६९: नेव्हिल चेंबरलेन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९४०)
१८८१: वामन गोपाळ तथा ’वीर वामनराव’ जोशी – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, ’राष्ट्रमत’ आणि ’स्वतंत्र हिन्दुस्तान’चे संपादक, लेखक व नाटककार, त्यांची रणदुंदुंभी व राक्षसी महत्त्वाकांक्षा ही नाटके प्रसिद्ध आहेत. (मृत्यू: ३ जून १९५६)
१९०१: कृष्णाजी भास्कर तथा ’तात्यासाहेब’ वीरकर – शब्दकोशकार, अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक (मृत्यू: ? ? ????)
१९०५: मालती बेडेकर ऊर्फ ’विभावरी शिरुरकर’ – लेखिका (मृत्यू: ७ मे २००१)
१९१४: आझाद हिंद सेनेचे अधिकारी गुरुबख्श सिंह ढिल्लो यांचा जन्मदिन.
१९१९: इंद्रजित गुप्ता – केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते (मृत्यू: २० फेब्रुवारी २००१)
१९२१: एन. के. पी. साळवे – भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष (मृत्यू: १ एप्रिल २०१२)
१९३८: बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा ’शशी कपूर’ – अभिनेता
१९४८: एकनाथ सोलकर – अष्टपैलू क्रिकेटपटू (मृत्यू: २६ जून २००५)
१९८९: भारतीय क्रिकेट खेळाडू श्रीवत्स गोस्वामी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८७१: इंग्लिश गणितज्ज्ञ ऑगस्टस द मॉर्गन.
१९०८: सर जॉन इलियट – भारतातील हवामानशास्त्रविषयक कार्यामुळे प्रसिद्धी पावलेले ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ. १८८७ ते १८९३ या कालावधीत ते भारत सरकारच्या हवामान खात्याचे प्रमुख होते. (जन्म: २५ मे १८३१ – लॅम्सले, डरहॅम, यू. के.)
१९४७: जनरल मोटर्स आणि शेवरलेट कंपनी चे सहसंस्थापक विल्यम सी ड्युरंट यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८६१)
१९५६: प्रसिद्ध मराठी विद्वान नारायण शास्त्री मराठे यांचे निधन.
२०००: हिंदी चित्रपट क्षेत्रांतील प्रसिद्ध गायिका राजकुमारी दुबे यांचे निधन.
२००१: विश्वनाथ नागेशकर, भारतीय,गोवेकर चित्रकार.
२००३: ओस्बोर्न कॉम्पुटर कॉर्पोरेशन चे संस्थापक अॅडम ओस्बोर्न यांचे निधन. (जन्म: ६ मार्च १९३९)