dinvishesh-mpsc-19-march
dinvishesh-mpsc-19-march

हे पृष्ठ 19 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

१९ मार्च दिनविशेष

On this page, we will list all historical events that have occurred on 19th March. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

रावबहादुर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी
रावबहादुर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी

१८४२ : लोकहितवादी यांनी ‘शतपत्र’ या लेखनास प्रारंभ केला.

१९६२ : पुणे येथील राजा केळकर संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले.

१९७२ : भारत-बांगलादेश यांच्यात मैत्री करार झाला.

२००३ : अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले.

२००१ : वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.

१९३२ : ’सिडनी हार्बर ब्रिज’ सुरू झाला.

१९३१ : अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली.

१८४८ : लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या ‘प्रभाकर’ या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.

१६७४ : शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्‍नी काशीबाई यांचे निधन

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

जीन फ्रेडरिक जोलिओट
जीन फ्रेडरिक जोलिओट

१९५४ : इंदू शहानी, भारतीय शिक्षणतज्ञ.

१९३८ : सई परांजपे – बालनाटय लेखिका आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका

१९३६ : ऊर्सुला अँड्रेस – स्विस अभिनेत्री

१९०० : जीन फ्रेडरिक जोलिओट – मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९३५) मिळवणारा फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: १४ ऑगस्ट १९५८)

१८९७ : शंकर विष्णू तथा ’दादा’ चांदेकर – चित्रपट संगीतकार (मृत्यू: ? ? ????)

१८२१ : सर रिचर्ड बर्टन – ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर (मृत्यू: २० आक्टोबर१८९०)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८८४ : केरोपंत छत्रे, गणिततज्ज्ञ.

१७५४ : खंडेराव होळकर, मल्हारराव होळकरांचा एकुलता एक पुत्र व अहिल्यादेवीचे पती.

२००८ : सर आर्थर सी. क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक (जन्म: १६ डिसेंबर १९१७)

२००२ : नरेन ताम्हाणे – यष्टीरक्षक आणि फलंदाज (जन्म: ४ ऑगस्ट १९३१)

१९९८ : इ. एम. एस. नंबूद्रीपाद – केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते (जन्म: १३ जून१९०९)

१९८२ : जीवटराम भगवानदास तथा ’आचार्य’ कॄपलानी – स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)

१८८४ : केरुनाना लक्ष्मण छत्रे – आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य (जन्म: १६ मे १८२५)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.