२६ जून दिनविशेष - 26 June in History
२६ जून दिनविशेष - 26 June in History

हे पृष्ठ 26 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २६ जून रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 26 June. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • मादागास्करचा स्वातंत्र्य दिन
  • सोमालियाचा स्वातंत्र्य दिन

महत्त्वाच्या घटना:

पी. बंदोपाध्याय
पी. बंदोपाध्याय

१७२३: रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली.

१८१९: सायकलचे पेटंट देण्यात आले.

१९०६: पहिली ग्रांड प्रिक्स मोटर रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली.

१९४९: बेल्जियम देशांतील महिलांना प्रथमच संसदीय निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा हक्क मिळाला.

१९५९: स्वीडिश बॉक्सर इंगेमेर जोहान्सन हे हेव्ही वेट बॉक्सिंगचे जागतिक विजेते झाले.

१९६०: सोमालियाला (इंग्लंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९६०: मादागास्करला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९६८: पुणे महापालिकेने उभारलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे उद्‍घाटन झाले.

१९७४: ओहायो (अमेरिका) येथील एका सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड लावण्यास सुरूवात झाली.

१९७४: नागपुरजवळील कोराडी येथील (त्याकाळच्या) सर्वात मोठया वीजनिर्मितीकेंद्रातून वीजनिर्मितीला प्रारंभ

अटलबिहारी बाजपेयी – भारताचे १० वे पंतप्रधान
अटलबिहारी बाजपेयी – भारताचे १० वे पंतप्रधान

१९७५: पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशावरुन राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणीचा वटहुकूम जारी केला.

१९७७: एल्व्हिस प्रेस्लीचा शेवटचा जाहीर कार्यक्रम झाला.

१९७९: मुष्टियोद्धा मुहम्मद अली यांनी निवृत्ती घेतली.

१९९९: नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन करुन माहूर हा नवा तालुका निर्माण करण्यात आला.

१९९९: पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या हस्ते शिवाजीराजांची मुद्रा असलेले २ रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा समारंभ पुणे येथे झाला.

२०००: पी. बंदोपाध्याय या भारतीय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१६९४: स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ जॉर्ज ब्रांड यांचा जन्म.

गॅरी गिल्मोर
गॅरी गिल्मोर

१७३०: चार्ल्स मेसिअर – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: १२ एप्रिल १८१७)

१८२४: लॉर्ड केल्व्हिन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ (मृत्यू: १७ डिसेंबर १९०७)

१८३८: वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममिमांसक व सुधारक बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांचा कंतलपाडा परगणा बंगाल येथे जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८९४)

१८७३: अँजेलिना येओवार्ड ऊर्फ ’गौहर जान’ – गायिका व नर्तिका (मृत्यू: १७ जानेवारी १९३०)

१८७४: छत्रपती शाहू महाराज – सामाजिक सुधारणांचे कृतीशील पुरस्कर्ते, कला, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक (मृत्यू: ६ मे १९२२)

नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ 'बालगंधर्व
नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ ‘बालगंधर्व

१८८८: नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ ‘बालगंधर्व’ – गायक व अभिनेते (मृत्यू: १५ जुलै १९६७)

१८९२: पर्ल एस. बक – नोबेल पारितोषिक विजेत्या (१९३८) अमेरिकन लेखिका (मृत्यू: ६ मार्च १९७३)

१९१४: शापूर बख्तियार – ईराणचे ७४ वे पंतप्रधान (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९१)

१९१६: मराठ्यांच्या ग्वाल्हेर राज्यातील सिंधिया घराण्याचे शेवटचे शासक महाराजा जिवाजीराव सिंधिया यांचा जन्मदिन.

१९१८: परमवीर चक्र सन्मानित माजी भारतीय सैन्य अधिकारी मेजर रामा राघोबा राणे यांचा जन्मदिन.

१९५१: गॅरी गिल्मोर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९९२: अर्जुन पुरस्कार प्राप्त भारतीय हॉकी खेळाडू मनप्रीत सिंह यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

एकनाथ सोलकर
एकनाथ सोलकर

३६३: रोमन सम्राट ज्यूलियनची हत्या (जन्म: ? ? ३३२)

१८१०: हॉट एअर बलून चे सहसंशोधक जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र यांचे निधन.

१९४३: कार्ल लॅन्ड्स्टायनर – नोबेल पारितोषिकविजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ (जन्म: १४ जून १८६८)

१९६१: प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यकार गोविंद शास्त्री दुगवेकर यांचे निधन.

१९८०: पत्रकार गोविंद मोरेश्वर तथा आप्पा पेंडसे यांचे निधन.

यश जोहर
यश जोहर

१९९४: प्रसिद्ध बांगलादेशी राजकारणी व लेखिका जहनारा इमाम यांचे निधन.

२००१: वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे – लेखक व कथाकथनकार (जन्म: २५ मार्च १९३२)

२००४: यश जोहर – हिन्दी चित्रपट निर्माता (जन्म: ६ सप्टेंबर १९२९)

२००५: एकनाथ सोलकर – अष्टपैलू क्रिकेटपटू (जन्म: १८ मार्च १९४८)

२००८: जनरल माणेकशाॅ यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *