६ ऑगस्ट दिनविशेष - 6 August in History
६ ऑगस्ट दिनविशेष - 6 August in History

हे पृष्ठ 6 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ६ ऑगस्ट  रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 6 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • हिरोशिमा दिवस / Hiroshima Day: दरवर्षी ६ ऑगस्ट रोजी वर महायुद्धाच्या काळात हिरोशिमा वर टाकण्यात आलेले अणु बॉम्ब वर्धापनदिन प्रतीक आहे. ही भयानक घटना ६ ऑगस्ट १९४५ रोजी घडली , जेव्हा अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर “लिटल बॉय” नावाचा अणुबॉम्ब टाकला. दुसरे महायुद्ध , १९३९-१९४६ पर्यंत चालले होते.अमेरिकेने जगातील पहिल्या अणु बॉम्ब जपानच्या हिरोशिमा येथे टाकण्यात आला. जपानच्या एनोला शहरावर टाकण्यात आलेला हा स्फोट इतका जबरदस्त होता की त्याने शहराच्या 90% लोकसंख्येचा नायनाट केला , 70,000 लोकांना त्वरित आणि सुमारे 10,000 नंतर किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे मृत्युमुखी पडले.

महत्त्वाच्या घटना:

१८६२: मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना.

१९१४: पहिले महायुद्ध – सर्बियाने जर्मनीविरुद्ध तर ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.

१९२६: जेरट्रूड एडर्ले ही इंग्लिश खाडी पोहुन जाणारी पहिली महिला बनली.

१९४०: सोविएत युनियनने इस्टोनियाचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला.

डॉ. शिवराम कारंथ
डॉ. शिवराम कारंथ

१९४५: अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावर अणूबॉम्ब टाकला. यात ७०,००० जण तात्काळ मृत्यूमुखी पडले तर पुढील अनेक वर्षे लोकांवर किरणोत्सर्गाचा परिणाम झाला.

१९५२: राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना.

१९६०: अमेरिकेने घातलेल्या व्यापारबंदीला प्रत्युत्तर म्हणून क्युबाने अमेरिकन बँकांसह सर्व परदेशी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले.

१९६२: जमैकाला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९८६: भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म.

१९९०: कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.

सनत जयसूर्या
सनत जयसूर्या

१९९४: डॉ. शिवराम कारंथ यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ’इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार’ प्रदान

१९९६: नासाने मंगळावर जीवसृष्टीची शक्यता प्रकट केली.

१९९७: कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने ६ बाद ९५२ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. त्यात सनत जयसूर्या याने ३४० धावा केल्या.

२०१०: भारतातील जम्मू आणि काश्मीर भागात भयानक पूर आला.

२०११: थायलंडमधील पुईया थाई पार्टीच्या यिंगलुक शिनावात्रा शुक्रवारी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.

२०१२: नासाची क्यूरिओसिटी रोव्हर मंगळावर पोहोचले.

अलेक्झांडर फ्लेमिंग
अलेक्झांडर फ्लेमिंग

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८०९: लॉर्ड टेनिसन – इंग्लिश कवी (मृत्यू: ६ आक्टोबर १८९२)

१८८१: पेनिसिलीन औषधाचे निर्माते नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा पाश्चिम स्कॉटलंड येथील लॉकफील्डफार्म येथे जन्म. (मृत्यू: ११ मार्च १९५५)

योगिनी जोगळेकर – लेखिका
योगिनी जोगळेकर – लेखिका

१९००: टेक्सास इन्स्ट्रूमेंट्स कंपनी चे सहसंस्थापक सीसिल हॉवर्ड ग्रीन यांचा जन्म. (मृत्यू: ११ एप्रिल २००३)

१९१५: प्रसिद्ध भारतीय राष्ट्रवादी कॉंग्रेस चे राजकारणी व भारताचे माजी पाचवे लोकसभा अध्यक्ष डॉ. गुरुद्याल सिंह ढिल्लो यांचा जन्मदिन.

१९२१: प्रसिद्ध भारतीय स्वतंत्रता सेनानी व राजकारणी तसचं, गुजरात, मध्य प्रदेश आणि पॉन्डिचेरी केंद्र शासित प्रदेशाचे माजी राज्यपाल के. एम. चांडी यांचा जन्मदिन.

१९२५: योगिनी जोगळेकर – लेखिका, ४५ कादंबर्‍या, ४ कवितासंग्रह, ४ नाटके, १२ कुमार वाङ्‍मयाची पुस्तके इ. त्यांची साहित्य संपदा आहे. (मृत्यू: १ नोव्हेंबर २००५)

१९३३: माजी भारतीय क्रिकेटपटू जी. कृपाल सिंह यांचा जन्मदिन.

१९५९: रॅमन मॅग्सेसे पुरस्कार सन्मानित “वॉटरमॅन ऑफ इंडिया” म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय जलसंधारण आणि पर्यावरणवादी तसचं ‘तरुण भारत संघ‘ चे संस्थापक राजेंद्र सिंह यांचा जन्मदिन.

एम. नाईट श्यामलन
एम. नाईट श्यामलन

१९६५: भारतीय चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा जन्म.

१९७०: एम. नाईट श्यामलन – पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय वंशाचे अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

कल्पनाथ राय – केन्द्रीय मंत्री
कल्पनाथ राय – केन्द्रीय मंत्री

१९२५: सुरेंद्रनाथ बॅनर्जी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि त्यातील जहाल गटाचे नेते, ’राष्ट्रगुरू’ (जन्म: १० नोव्हेंबर १८४८)

१९६५: वसंत पवार – संगीतकार (सांगत्ये ऐका, पठ्ठे बापूराव, बाळा जो जो रे, चिमणी पाखरे, अवघाची संसार, मानिनी, वैजयंता, पसंत आहे मुलगी, धाकटी जाऊ, सवाल माझा ऐका, मल्हारी मार्तंड इ. अनेक चित्रपट) (जन्म: ? ? ????)

१९८२: भारतीय मल्याळम भाषेचे प्रसिद्ध साहित्यकार एस. के. पोट्टेक्काट्ट यांचे निधन.

१९९१: शापूर बख्तियार – ईराणचे ७४ वे पंतप्रधान (जन्म: २६ जून १९१४)

१९९७: वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक (जन्म: १४ आक्टोबर १९२४)

१९९९: कल्पनाथ राय – केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते (जन्म: ४ जानेवारी १९४१ – सेमरी जमालपूर, माऊ, उत्तर प्रदेश)

२००१: भारतीय नौदल प्रमुख आधार कुमार चॅटर्जी यांचे निधन.

२०१९: २५ व्या वर्षीच हरयाणाच्या कॅबिनेट मंत्री, १९९८ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री, २०००-२००३ माहिती आणि प्रसारण मंत्री, २००३-२००४ आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री, २०१४ मध्ये भाजप सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलं अश्या भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *