dinvishesh-mpsc-11-march
dinvishesh-mpsc-11-march

हे पृष्ठ 11 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 11th March. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

आनंदीबाई जोशी
आनंदीबाई जोशी

१८८६: पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर ही पदवी मिळाली

भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांना फ़िलाडेफ़िल्या विद्यापीठाची एस.डी. ही पदवी बहाल करण्यात आली

२००१: बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले. या आधी प्रकाश पदुकोण यांनी ते मिळवले होते.

२००१: कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारा हरभजनसिंग हा पहिला भारतीय गोलंदाज बनला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली. १९९३: उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘सरस्वती सन्मान’ पुरस्कार प्रदान. १८१८: इंग्रज फौजांनी पुरंदरला वेढा घातला.

२०११: जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९१२: शं. गो. साठे – नाटककार

१९१५: विजय हजारे – क्रिकेटपटू (मृत्यू: १८ डिसेंबर २००४)

१९१६: हॅरॉल्ड विल्सन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: २४ मे १९९५)

१९८५: अजंता मेंडिस – श्रीलंकेचा गोलंदाज

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१६८९:  औरंगजेबाच्या कैदेमध्ये असलेल्या संभाजीराजांची अतिशय हालहाल करुन हत्या करण्यात आली पेनिसिलीनचे शोधक सर फ्लेमिंग पुण्यतिथी

१६८९: छत्रपती संभाजी महाराज (जन्म: १४ मे १६५७)

१९५५: अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ (जन्म: ६ ऑगस्ट १८८१)

१९६५: गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. त्यांच्या ७ उत्कृष्ट कथांचा संग्रह ’सप्तपर्ण’ या नावाने प्रकाशित झाला आहे. (जन्म: १२ डिसेंबर १८९२)

१९७०: अर्ल स्टॅनले गार्डनर – अमेरिकन लेखक आणि वकील (जन्म: १७ जुलै १८८९)

१९९३: शाहू मोडक – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते, (संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस, त्यांनी [जन्माने ख्रिश्चन असूनही] २९ चित्रपटांत कृष्णाची भूमिका साकारली) (जन्म: २५ एप्रिल १९१८ – अहमदनगर)

२००६: स्लोबोदान मिलोसोव्हिच – सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष (जन्म: २० ऑगस्ट १९४१)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *