dinvishesh-mpsc-10-march
dinvishesh-mpsc-10-march

हे पृष्ठ 10 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on {21st February}. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१८४९: अब्राहम लिंकन यांचा पेटंट साठी अर्ज; अमेरिकन राष्ट्रपतींचा पहिलाच असा अर्ज.टन

१८७६: पहिला दूरध्वनी संपर्क (अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल ने थॉमस वॅटसन शी संपर्क साधला).

१९२२: प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महात्मा गांधींना ६ वर्षांची शिक्षा झाली.

१९५२: केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अ‍ॅंटिबायोटिक्स या पेनिसिलीन कारखान्याचा पायाभरणी समारंभ झाला.

१९५२: पिंपरी येथे हिंदूस्थान अ‍ॅंटिबायोटिक्स या पेनिसिलिन कारखान्याचे काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते उदघाटन

१९६९: अतिशय हुषार व धाडसी वृत्तीची महिला गोल्डा मायर यांची इस्त्राईलच्या पंतप्रधानपदावर नियुक्ती झाली.

१९७२: वेलकम थिएटर निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित ’सखाराम बाईंडर’ या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.

१९७७: सूर्यमालेतील युरेनस ग्रहाला शनीसारखी कडी असल्याचा शोध लागला.

१९९८: भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला लिनारेस सुपर ग्रँडमास्टर बुद्धीबळ स्पर्धेत विजेतेपद

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१६१५: मोघल साम्राज्याचा कडवा, धर्मवेडा बादशहा बादशहा औरंगजेब याचा जन्म

१६२८: मार्सेलिओ माल्पिघी – इटालियन डॉक्टर (मृत्यू: ३० सप्टेंबर १६९४)

१८१२: विक्टर तेश, बेल्जियन वकील व कायदा मंत्री

१८६३: सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) – बडोद्याचे महाराज, सुधारणावादी संस्थानिक, पडदा पद्धती, बालविवाह, कन्याविक्रय यांना बंदी घालणारे कायदे केले. विधवा विवाहाला संमती दिली. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९३९)

१९१८: ’स्वरराज’ छोटा गंधर्व (मृत्यू: ३१ डिसेंबर १९९७)

१९२९: कविवर्य मंगेश पाडगावकर

१९४५: माधवराव शिवाजीराव शिंदे – केन्द्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री, काँग्रेसचे नेते व ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज (मृत्यू: ३० सप्टेंबर २००१ – मैनपुरी, उत्तर प्रदेश)

१९५७: ओसामा बिन लादेन, अल कायदा नामक इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेचा संस्थापक.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८७२: जोसेफ मॅझिनी – इटालियन स्वातंत्र्यवीर (जन्म: २२ जून १८०५)

१८९७:  सावित्री, क्रांतिज्योति, सावित्रीबाई फ़ुले यांची पुण्यतिथी

बॅ.मुकुंदराव जयकर पुण्यतिथी

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज पुण्यतिथी

१९१३: हॅरियेट टबमन, अमेरिकन क्रांतिकारी

१९५९: बॅ. मुकुंद रामराव जयकर – कायदेपंडित, पं. मोतीलाल नेहरूंचे सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू (जन्म: १३ नोव्हेंबर १८७३)

१९७१: सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन – कोकण गांधी (जन्म: ४ नोव्हेंबर १८९४)

१९९८: लॉईड ब्रिजेस, अमेरिकन अभिनेता.

१९९९: विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ ‘कुसुमाग्रज’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार (जन्म: २७ फेब्रुवारी १९१२) १९८५: कॉन्स्टंटिन चेरेनेन्को – सोविएत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव (जन्म: २४ सप्टेंबर १९११)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *