३० सप्टेंबर दिनविशेष - 30 September in History
३० सप्टेंबर दिनविशेष - 30 September in History

हे पृष्ठ 30 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ३० सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 30 September. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  1. आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन

महत्त्वाच्या घटना:

१३९९: हेन्‍री (चौथा) इंग्लंडचा राजा बनला.

१८६०: ब्रिटनची पहिली ट्राम सेवा सुरु झाली.

१८८२: थॉमस एडिसन यांचे पहिले व्यावसायिक हायड्रोएलेक्ट्रिक पॉवर प्लांट अमेरिकेतील विसकॉन्सिन, ऍप्लेटॉन येथील फॉक्स नदीवर सुरु झाले.

१८९५: फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले.

१९३५: हूव्हर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.

१९४७: पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश

१९५४: यू.एस. एस. नॉटिलस या अणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.

१९६१: दुलीप करंडकाचा पहिला सामना मद्रास (चेन्‍नई) येथे खेळला गेला.

गीतकार मजरुह सुलतानपुरी
गीतकार मजरुह सुलतानपुरी

१९६६: बोत्सवानाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.

१९९३: लातूर येथे झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० लोक ठार तर हजारो लोक बेघर झाले.

१९९४: गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ’दादासाहेबफाळके पुरस्कार’ प्रदान

डॉ. के. एन. गणेश
डॉ. के. एन. गणेश

१९९८: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) सेंद्रीय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांना ‘शांतिस्वरुप भटनागर’ पुरस्कार जाहीर

२०००: देशातील रासायनिक उद्योगाची वाढ आणि प्रगतीसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाऊंडेशनतर्फे ’हॉल ऑफ फेम’ हा विशेष पुरस्कार जाहीर

२०१९: साली बिहार राज्यात झालेल्या पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.

२०१९: साली एअर चीफ मार्शल आर. के. एस भदोरिया यांनी वायुसेना दलाचे प्रमुख पद सांभाळले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१२०७: फारसी मिस्टीक आणि कवी रूमी यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १२७३)

१८३२: मातृदिन (मदर्स डे) च्या सहसंस्थापिका ऍन जार्विस यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९०५)

१८३७: साली भारतीय हिंदी आणि पंजाबी भाषिक साहित्याचे लेखक व समाजसुधारक तसचं, “आधुनिक पंजाबी गद्याचे जनक” पंडित श्रद्धाराम शर्मा यांचा जन्मदिन.

हृषिकेश मुकर्जी
हृषिकेश मुकर्जी

१९२२: हृषिकेश मुकर्जी – चित्रपट दिग्दर्शक (मृत्यू: २७ ऑगस्ट २००६)

१९३३: प्रभाकर पंडित – संगीतकार व व्हायोलिनवादक (मृत्यू: २८ डिसेंबर २००६)

१९३४: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री ऍन्ना काश्फी जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट २०१५)

१९३९: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ ज्याँ-मरी लेह्न यांचा जन्म.

१९४१: ५वे राष्ट्रकुल सचिव सरचिटणीस कमलेश शर्मा यांचा जन्म.

१९४३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ जोहान डायझेनहॉफर यांचा जन्म.

१९४५: इस्रायलचे १२वे पंतप्रधान एहूद ओल्मर्ट यांचा जन्म.

१९५५: सन मायक्रोसिस्टिम्स चे सहसंस्थापक अँनी बेचोलॉल्म्स यांचा जन्म.

मार्टिना हिंगीस – स्विस लॉनटेनिस खेळाडू
मार्टिना हिंगीस – स्विस लॉनटेनिस खेळाडू

१९६१: चंद्रकांत पंडित – क्रिकेटपटू

१९७२: शंतनु मुकर्जी ऊर्फ ’शान’ – पार्श्वगायक

१९८०: मार्टिना हिंगीस – स्विस लॉनटेनिस खेळाडू

१९००: एम. सी. छागला – न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८१)

१९९७: डच फॉर्मुला १ ड्रायव्हर मॅक्स वर्स्टॅपन यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१२४६: रशियाचे झार यारोस्लाव्ह (दुसरा) यांचे निधन.

१६९४: मार्सेलिओ माल्पिघी – इटालियन डॉक्टर (जन्म: १० मार्च १६२८)

१९१४: साली प्रख्यात भारतीय उर्दू कवी आणि लेखक अल्ताफ हुसैन हाली यांचे निधन.

चार्लस रिच्टर
चार्लस रिच्टर

१९४३: साली कलकत्ता शहरावर आधारित मासिक मॉडर्न रिव्ह्यूचे संस्थापक, संपादक आणि मालक तसचं, हिंदू महासभेचे नेता आणि भारतीय पत्रकारितेचे जनक रामानंद चटर्जी यांचे निधन.

१९८५: चार्लस रिच्टर – अमेरिकन भूवैज्ञानिक (जन्म: २६ एप्रिल १९००)

१९९२: गंगाधर देवराव खानोलकर – लेखक व चरित्रकार, ‘अर्वाचीन मराठी वाड़्‍मय सेवक’ या कोशाचे सात खंड त्यांनी प्रकाशित केले. (जन्म: १९ ऑगस्ट १९०३)

१९९८: चंद्राताई किर्लोस्कर – ’भूदान’ चळवळीतील कार्यकर्त्या

२००१: केन्द्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री, काँग्रेसचे नेते व ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज माधवराव शिवाजीराव शिंदे यांचे उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात विमान अपघातात निधन (जन्म: १० मार्च १९४५ – मुंबई)

२०१४: भारतीय पाद्री आणि राजकारणी मोलिवि इफ्तिकार हुसैन अन्सारी यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९४३)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *