१९ ऑगस्ट दिनविशेष - 19 August in History
१९ ऑगस्ट दिनविशेष - 19 August in History

हे पृष्ठ 19 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १९ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 19 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • विमान दिन
  • जागतिक छायाचित्र दिन (World Photography Day)

महत्त्वाच्या घटना:

२९५: २९५ ई.पूर्व: प्रेम, सौंदर्य आणि प्रजनन यांची रोमन देवी व्हीनस चे पहिले मंदिर पूर्ण झाले.

१८५६: गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट मिळाले.

१९०९: इंडियानापॉलिस मोटर स्पीडवे येथे मोटारींची पहिली शर्यत झाली.

१९१९: अफगाणिस्तानला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९४५: हो ची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.

१९६४: केप कॅनॅवरल येथून डेल्टा डी # 25 या प्रक्षेपण वाहनाने सिंकॉम3 हा पहिला जिओस्टेशनरी कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.

१९७३: फ्रांस देशाने आण्विक चाचणी केली.

१९९१: सोविएत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुटीवर असताना नजरकैदेत घातले गेले.

१९९९: बेलग्रेड, युगोस्लाव्हिया येथे हजारो सर्बियन लोकांनी राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८७१: ऑर्व्हिल राईट – आपला भाऊ विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते (मृत्यू: ३० जानेवारी १९४८)

१८७८: फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष मनुएल क्वेझोन यांचा जन्म.

१८८३: पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष जोसेमेंडेस काबेसादास यांचा जन्म.

१८८३: चॅनेल कंपनी चे संस्थापिका कोको चॅनेल यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १९७१)

१८८६: मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील (मृत्यू: २ जानेवारी १९३५)

सरदार स्वर्ण सिंग
सरदार स्वर्ण सिंग

१८८७: भारतीय वकील आणि राजकारणी एस. सत्यमूर्ति यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च १९४३)

१९०३: गंगाधर देवराव खानोलकर – लेखक व चरित्रकार, ‘अर्वाचीन मराठी वाड़्‍मय सेवक’ या कोशाचे सात खंड त्यांनी प्रकाशित केले. (मृत्यू: ३० सप्टेंबर १९९२)

१९०७: सरदार स्वर्ण सिंग – केन्द्रीय मंत्री (मृत्यू: ३० आक्टोबर १९९४)

शंकरदयाळ शर्मा
शंकरदयाळ शर्मा

१९०७: भारतीय इतिहासकार, लेखक, आणि विद्वान हजारी प्रसाद द्विवेदी यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९७९)

१९०८: पद्मभूषण पुरस्कार तसचं, संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय ठुमरी गायक उस्ताद अब्दुल रशीद खान यांचा जन्मदिन.

१९११: प्रसिद्ध भारतीय कवी, कथाकार, आणि एकांकीकार आरसी प्रसाद सिंह यांचा जन्मदिन.

१९१३: भारतीय-इंग्लिश सैनिक व लेखक पीटर केम्प यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९३)

१९१८: शंकरदयाळ शर्मा – भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती (मृत्यू: २६ डिसेंबर १९९९)

१९२१: स्टार ट्रेक कथानकाचे निर्माते जीन रॉडेनबेरी यांचा जन्म.

१९२२: मराठी गायक बबनराव नावडीकर यांचा जन्म.

१९२८: प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक लेखक,कादंबरीकार, लघुकथा लेखक, व टीकाकार प्राध्यापक शिवप्रसाद सिंह यांचा जन्मदिन.

१९४६: बिल क्लिंटन – अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष

१९५०: पद्मश्री पुरस्कार सन्मानित इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष, व्यावसायिक भारतीय अभियांत्रिकी शिक्षिका, आणि कन्नड व इंग्रजी भाषिक लेखक सुधा मूर्ती यांचा जन्मदिन.

१९६७: भारतीय आध्यात्मिक नेते खांड्रो रिनपोछे यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१४: १४ई.पुर्व : रोमन सम्राट ऑगस्टस सीझर यांचे निधन.

१४९३: पवित्र रोमन सम्राट फ्रेडरिक (तिसरा) यांचे निधन.

१६६२: ब्लेझ पास्कल – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (जन्म: १९ जून १६२३)

१७५७: ब्रिटीश कालीन भारतात इंग्रज सरकारच्या इस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता येथे एक रुपयाची नाणी तयार केली.

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे तिसरे अध्यक्ष व पहिले मुस्लीम अध्यक्ष बद्रुद्दीन तैबजी
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे तिसरे अध्यक्ष व पहिले मुस्लीम अध्यक्ष बद्रुद्दीन तैबजी

१९०६: ब्रिटीश कालीन भारतातील बॉम्बे हायकोर्टाचे बॅरिस्टर म्हणून सराव करणारे पहिले भारतीय व्यक्ती तसचं, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे तिसरे अध्यक्ष व पहिले मुस्लीम अध्यक्ष बद्रुद्दीन तैबजी यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १९०६)

१९४७: विनायक दामोदर कर्नाटकी ऊर्फ ’मास्टर विनायक’ – अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते. त्यांनी २२ चित्रपटातून भूमिका केल्या तर २९ चित्रपट दिग्दर्शित केले. (जन्म: १९ जानेवारी १९०६)

१९५४: इटलीचे पंतप्रधान ऍल्सिदेदि गॅस्पेरी यांचे निधन.

१९४७: अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मास्टर विनायक यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १९०६)

१९७५: डॉ. विनायक विश्वनाथ तथा ’अप्पासाहेब’ पेंडसे – शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ’ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक (जन्म: १७ ऑगस्ट १९१६)

१९८३: भारतीय शिक्षणतज्ञ, देशभक्त, कुशल संघटक, लेखक, पत्रकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य डॉ. विनायक विश्वनाथ उर्फ ‘अप्पासाहेब’ पेंडसे यांचे

उत्पल दत्त
उत्पल दत्त

१९९०: रा. के. लेले – पत्रकार, संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक (जन्म: ????)

१९९३: उत्पल दत्त – रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात आपला ठसा उमटवणारे कलाकार (जन्म: २९ मार्च १९२९)

१९९३: य. द. लोकुरकर – निर्भिड पत्रकार (जन्म: ? ? ????)

१९९४: लिनस कार्ल पॉलिंग – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, नोबेल पारितोषिकाचे दोनदा विजेते [१९५४ – रसायनशास्त्र, १९६२ – शांतता] (जन्म: २८ फेब्रुवारी १९०१)

२०००: भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक बिनेंश्वर ब्रह्मा यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४८)

२०१३: न्युझीलंड येथील प्रसिद्ध हिंदी साहित्यकार, भाषा विज्ञानी, व्याकरणकार तसचं, ऑक्सफोर्ड या हिंदी-इंग्रजी शब्दकोशाचे संपादक रोनाल्ड स्टुअर्ट मेक्ग्रेगॉर यांचे निधन.

२०१५: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सनत मेहता यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *