हे पृष्ठ 17 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही १७ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 17 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
१६६६: आग्र्याहून सुटका – शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतुन पसार झाले.
१८३६: जन्मलेल्या प्रत्येक बालकाचा जन्म नोंदवला गेलाच पाहिजे, अशी सक्ती करणारा ‘रजिस्ट्रेशन ऑफ बर्थस अॅंक्ट’ ब्रिटिश संसदेने मान्यता दिल्याने अमलात आला. पुढे हा सर्व ब्रिटिश वसाहतींना लागू करण्यात आला आणि १८३७ पासुन त्याची अंमलबजावणी सुरू झाली.
१९४५: ईंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.
१९५३: नार्कोटिक्स अॅनॉनिमस या संस्थेची पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियात झाली.
१९८२: पहिली सी. डी. (Compact Disk) जर्मनीमधे विकण्यात आली.
१९८८: पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक आणि अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नॉल्ड रॅफेल विमान अपघातात ठार झाले.
१९९७: उस्ताद अली अकबर खाँ यांना अमेरिकेचा ’नॅशनल हेरिटेज’ पुरस्कार जाहीर
२००८: एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१७६१: पं. विल्यम केरी – अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक (मृत्यू: ९ जून १८३४)
१८४४: इथियोपियाचा सम्राट मेनेलेक (दुसरा) यांचा जन्म.
१८६६: मीर महबूब अली खान – हैदराबादचा सहावा निजाम (मृत्यू: २९ ऑगस्ट १९११)
१८८८: गुरुवर्य बाबूराव गणपतराव जगताप – बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी झटणारे कार्यकर्ते, श्री शिवाजी मराठा हायस्कूलचे संस्थापक (१९१८), पुण्याचे महापौर (१९६२) (मृत्यू: ? ? ????)
१८९३: मे वेस्ट – हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९८०)
१९०५: शंकर गणेश दाते – ग्रंथसूचीकार (मृत्यू: १० डिसेंबर १९६४)
१९१६: डॉ. विनायक विश्वनाथ तथा ’अप्पासाहेब’ पेंडसे – शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ’ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक (मृत्यू: १९ ऑगस्ट १९७५)
१९१६: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक लेखक व साहित्य क्षेत्रांतील उत्कृष्ट कादंबरीकार अमृतलाल नागर यांचा जन्मदिन.
१९२६: जिआंग झिमिन – चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना चे मुख्य सचिव
१९३२: व्ही. एस. नायपॉल – नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक
१९४१: भारतीय राजकारणी भीम सिंग यांचा जन्म
१९४१: भारतीय रिजर्व बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांचा जन्मदिन.
१९४४: ओरॅकल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक लैरी एलिसन यांचा जन्म.
१९४९: निनाद गंगाधर बेडेकर – महाराष्ट्रीयन मराठी भारतीय इतिहासकार, लेखक आणि वक्ते
१९७०: जिम कुरिअर – जगातील पहिल्या क्रमांकाचे माजी अमेरिकन व्यावसायिक टेनिसपटू
१९७२: हबीब उल बशर – माजी बांगलादेश क्रिकेटपटू व कर्णधार काझी
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१३०४: जपानी सम्राट गोफुकाकुसा यांचे निधन.
१८५०: पेरू देशाचे पहिले अध्यक्ष जोस डे सान मार्टिन यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १७७८)
१९०९: भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची हत्या करणारे क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांना फाशी देण्यात आली. (जन्म: १८ फेब्रुवारी १८८३)
१९२४: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू टॉम केन्डॉल यांचे निधन.
१९४९: महान भारतीय क्रांतिकारक व स्वतंत्रता सेनानी तसचं, ढाका अनुशिलन समितीचे संस्थापक अध्यक्ष पुलिन बिहारी दास यांचे निधन.
१९८२: “भारतातील सर्वात प्रसिद्ध ख्रिश्चन हिंदी विद्वान” म्हणून लोकप्रिय असलेले भारतातील बेल्जियन जेसुइट मिशनरीचे धर्मगुरू व प्रसिद्ध साहित्यकार फादर कामिल बुल्के यांचे निधन.
१९८८: मुहम्मद झिया उल हक – पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १२ ऑगस्ट १९२४)
२००५: जॉन एन. बाहॅकल – हबल स्पेस टेलिस्कोपचे सहनिर्माते (जन्म: ३० डिसेंबर १९३४)