अशोक कुमार गांगूली ऊर्फ 'दादामुनी
अशोक कुमार गांगूली ऊर्फ 'दादामुनी

हे पृष्ठ 10 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १० डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 10th December. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • अल्फ्रेड नोबेल दिवस

महत्त्वाच्या घटना:

कैलाश सत्यर्थी
कैलाश सत्यर्थी

२०१४ : भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.

२००८ : प्रा. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले.

१९७८ : ईस्त्रायलचे अध्यक्ष मेनाकेम बेगिन आणि सीरीयाचे अध्यक्ष अन्वर सादात यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९१६ : ’संगीत स्वयंवर’ या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१९०६ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.

१९०१ : नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.

१८६८ : पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन येथे पहिले वाहतुक नियंत्रक दिवे (traffic signals) बसवण्यात आले. सुरुवातीला हे रेल्वेच्या सिग्नल्स (semaphore) सारखे होते आणि रात्री प्रकाशित करण्यासाठी लाल व हिरव्या रंगाच्या गॅसच्या दिव्यांचा वापर करण्यात येत असे.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर
व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर

१८९२ : व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर – रंगभूमीवरील अभिनेते व गायक (मृत्यू: १५ मार्च १९३७)

१८८० : डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर – प्राच्यविद्यातज्ञ, संस्कृत पंडित. अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. (मृत्यू: ८ जानेवारी १९६७ – पुणे)

१८७८ : चक्रवर्ती राजगोपालाचारी – भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक (मृत्यू: २५ डिसेंबर १९७२)

१८७० : सर यदुनाथ सरकार – औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार (मृत्यू: १९ मे १९५८)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

दिलीप पुरुषोत्तम चित्रे
दिलीप पुरुषोत्तम चित्रे vg`

२००९ : दिलीप पुरुषोत्तम चित्रे – लेखक, कवी आणि टीकाकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३८)

२००३ : श्रीकांत ठाकरे – संगीतकार (जन्म: ? ? ????)

२००१ : अशोक कुमार गांगूली ऊर्फ ‘दादामुनी’ – चित्रपट अभिनेते, पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९), ५३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे ४०० चित्रपटांत भूमिका केल्या (जन्म: १३ आक्टॊबर १९११)

१९६४ : शंकर गणेश दाते – ग्रंथसूचीकार (जन्म: १७ ऑगस्ट १९०५)

१९६३ : सरदार कोवालम माधव तथा के. एम. पणीक्‍कर – भारताचे चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत, इतिहासपंडित (जन्म: ३ जून १८९५)

१९५५ : आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर – लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक (जन्म: २६ सप्टेंबर १८९४)

१९२० : होरॅस डॉज – ’डॉज मोटर कंपनी’चे एक संस्थापक (जन्म: १७ मे १८६८)

१८९६ : अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (जन्म: २१ आक्टॊबर १८३३)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.