२१ ऑक्टोबर दिनविशेष - 21 October in History
२१ ऑक्टोबर दिनविशेष - 21 October in History

हे पृष्ठ 21 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 21 October. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१२९६: अल्लाउद्दिन खिलजी हे दिल्ली येथील शासक बनले.

१८५४: फ्लोरेन्स नायटिंगेल आणि इतर ३८ नर्सेसना क्रिमीयन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले.

१८७९: थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.

१८८८: स्वीस सोशल डेमोक्रेटिक पार्टी सुरु झाली.

बी. आर. चोप्रा
बी. आर. चोप्रा

१९३४: जयप्रकाश नारायण यांनी ’काँग्रेस सोशालिस्ट पार्टी’ची स्थापना केली.

१९४३: सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना

१९४५: फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.

१९५१: डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे ’भारतीय जनसंघ’ या पक्षाची स्थापना केली.

१९८३: प्रकाशाने निर्वातात १/२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.

१९८७: भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले. यात रुग्ण, डॉक्टर व नर्सेसचा समावेश होता.

१९८९: जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

१९९२: अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना ‘महापृथ्वी‘ या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

१९९९: चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार‘ जाहीर

२००२: मुंबई पोलिसांनी सलमान खान विरुद्ध वांद्रे दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल केले.

२०१८: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतील आपत्ती प्रतिसाद कार्यात सहभागी पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांचा सन्मान करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने पुरस्कार जाहीर केला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

अल्फ्रेड नोबेल
अल्फ्रेड नोबेल

१८३०: हिमालय भागाचा शोध लावणारे पहिले भारतीय व्यक्ती नैन सिंह रावत यांचा जन्मदिन.

१८३३: अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (मृत्यू: १० डिसेंबर १८९६)

१८८७: भारतीय वकील आणि राजकारणी कृष्णा सिंह यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी १९६१)

शम्मी कपूर – हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता
शम्मी कपूर – हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता

१९१७: राम फाटक – गायक व संगीतकार (मृत्यू: २६ सप्टेंबर २००२)

१९२०: धर्मभास्कर गं. ना. कोपरकर – वैदिक धर्म, संस्कृती, तत्त्वज्ञान यांचा विज्ञानाधारित अभ्यास करुन त्या संदर्भाचे लेखन, प्रकाशन, प्रचार व संशोधन त्यांनी केले. चार वेद, सहा शास्त्रे, मनुस्मृती, याज्ञवल्कस्मृती व इतर अनेक असे धर्म या विषयावर १९७ ग्रंथ त्यांनी लिहीले. त्यांना द्वारकापीठाच्या शंकराचार्यांकडून ’धर्मभास्कर’ तर करवीरपीठाच्या शंकराचार्यांकडून ’धर्मऋषी’ या पदव्या मिळाल्या होत्या.

१९३१: शम्मी कपूर – हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू: १४ ऑगस्ट २०११)

बेंजामिन नेत्यान्याहू
बेंजामिन नेत्यान्याहू

१९३८: प्रख्यात भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री आणि नर्तक हेलन यांचा जन्मदिन.

१९४०: एडसन अरांतेस डो नासिमेंटो उर्फ पेले – ब्राझीलचा फुटबॉलपटू

१९४९: बेंजामिन नेत्यान्याहू – इस्त्रायलचे ९वे पंतप्रधान

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१४२२: चार्ल्स (सहावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: १६ सप्टेंबर १३८०)

१८३५: मुथुस्वामी दीक्षीतार – तामिळ कवी व संगीतकार (जन्म: २४ मार्च १७७५)

१९८१: दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी (जन्म: ३१ जानेवारी १८९६ – धारवाड, कर्नाटक)

१९९०: भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक प्रभात रंजन सरकार यांचे निधन. (जन्म: २१ मे १९२१)

यश चोप्रा
यश चोप्रा

१९९५: लिंडा गुडमन – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका (जन्म: ९ एप्रिल १९२५)

२०१०: भारतीय कवी आणि अनुवादक अ. अय्यप्पन यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९४९)

२०१२: यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते (जन्म: २७ सप्टेंबर १९३२)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *