Contents
हे पृष्ठ 22 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that have occurred on 22 October. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- International Stuttering Awareness Day
महत्त्वाच्या घटना:

२००८ : भारताने आपल्या पहिल्या मानवविरहित चांद्रयानाचे (चांद्रयान-१) प्रक्षेपण केले.
१९९४ : भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ’कोट ऑफ आर्म्स’ पुरस्कार जाहीर
१९६४ : फ्रेन्च लेखक, कवी आणि तत्त्वज्ञ जेआँ-पॉल सार्त्र यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला.
१९६३ : पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
१९३८ : चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले.
१७९७ : बलूनमधून १००० मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या साहाय्याने आंद्रे जॅक्कस गार्नेरिन जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१९४८ : माईक हेंड्रिक – इंग्लंडचा गोलंदाज
१९४७ : दीपक चोप्रा – भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर व लेखक
१९४२ : रघूवीर सिंह – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार (मृत्यू: १८ एप्रिल १९९९ – न्यूयॉर्क)
१८७३ : तीर्थराम हिरानंद गोसावी ऊर्फ ’स्वामी रामतीर्थ’ – गोस्वामी तुलसीदासांचे वंशज असणारे अमृतानुभवी संत (मृत्यू: १७ आक्टोबर १९०६)
१६९८ : नादिर शहा – पर्शियाचा सम्राट (मृत्यू: १९ जून १७४७)
१६८९ : जॉन (पाचवा) – पोर्तुगालचा राजा (मृत्यू: ३१ जुलै १७५०)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००० : अशोक मोतीलाल फिरोदिया – अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह, सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती (जन्म: ? ? ????)
१९९१ : ग. म. सोहोनी – देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक (जन्म: ? ? ????)
१९९८ : अजित खान ऊर्फ ’अजित’ – हिन्दी चित्रपटांतील खलनायक (जन्म: २७ जानेवारी १९२२)
१९७८ : नारायण सीताराम तथा ना. सी. फडके – साहित्यिक व वक्ते (जन्म: ४ ऑगस्ट १८९४)
१९३३ : बॅ. विठ्ठलभाई पटेल – थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष, सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले बंधू (जन्म: १८ फेब्रुवारी १८७१)