हे पृष्ठ 25 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
On this page, we will list all historical events that occurred on 25th February. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
१५१०: पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला.
१५६८- सम्राट अकबर बादशहाने रजपुतांचा प्रचंड पराभव करुन चित्तोडगड आपल्या ताब्यात घेतला.
१८१८: ले. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला. दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली.
१८६३: आजच्या दिवशी अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहमन लिंकन यांनी अमेरिकेतील चलन कायद्यावर सही केली.
१९३५: ’फॉक्स मॉथ’ विमानाद्वारे मुंबई – नागपूर – जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.
१९४५: दुसरे महायुद्ध – तुर्कस्तानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन विमानवाहू नौकांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला.
१९५२: नार्वे ची राजधानी ओस्लो मध्ये आजच्या दिवशी हिवाळी ऑलिम्पिक समारोह पार पडला.
१९६२: कॉंग्रेस सार्वत्रिक निवडणूक जिंकली.
१९६८: मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९८६: जनआंदोलनाच्या रेट्यामुळे २० वर्षे राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सत्ता सोडुन देशातुन पलायन केले.
१९८८- संपुर्ण भारतीय बनावटीच्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोट्टा या केंद्रावर यशस्वी चाचणी
१९९६: ’स्वर्गदारा’तील तार्याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले. स्वित्झर्लंडमधील ’इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने हा गौरव केला. मिथुन तारकासमुहातील कॅस्टर (पुनर्वसू) व पोलक्स जवळच्या तार्याचे ’कुसुमाग्रज तारा’ असे नामकरण केले.
२००८: ‘नो कंट्री फ़ॉर ओल्ड मॅन” या चित्रपटाला ८० व्या ऑस्कर अकादमी पुरस्कारासाठी निवडल्या गेले.
२००९: आजच्या दिवशी माजी सैन्य अधिकारी धीरज मल्होत्रा यांना इंडियन प्रीमियर लीग चे
२०१३: रशियन सरकार ने रस्त्यांवर आणि शाळेच्या जवळपास धूम्रपान न करण्याचा नवीन कायदा बनवला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८४०: विनायक कोंडदेव ओक – बालवाङ्मयकार. मुलांसाठी ’बालबोध’ हे मासिक काढून त्यांनी चरित्रे, कविता, निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इ. लेखन केले व मराठी बालवाङ्मयाचा पाया घातला. त्यांची सुमारे पन्नास पुस्तके प्रसिद्ध झाली. सहज व सोपी भाषा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. (मृत्यू:९ आक्टोबर १९१४)
१८९४: अवतार मेहेरबाबा – आध्यात्मिक गुरू, मौनव्रती संत, त्यांनी सलग ४४ वर्षे मौनव्रत पाळले होते. (मृत्यू: ३१ जानेवारी १९६९ – मेहराझाद, पिंपळगाव, अहमदनगर, महाराष्ट्र)
१८९९: पंजाब चे माजी मुख्यमंत्री गुरनाम सिंह यांचा जन्म.
१९३८: भारतीय क्रिकेट खेळाडू आणि पंच फारूक इंजिनिअर यांचा जन्म.
१९४०: बालवाङ्मयकार विनायक कोंडदेव ओक यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९१४)
१९४३: जॉर्ज हॅरिसन– ’बीटल्स’चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक (मृत्यू: २९ नोव्हेंबर २००१)
१९४८: डॅनी डेंग्झोप्पा – चित्रपट अभिनेते
१९७४: दिव्या भारती – हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री (मृत्यू: ५ एप्रिल १९९३)
१९८१: भारतीय अभिनेता अनुज साहनी यांचा जन्म.
१९८१: भारतीय अभिनेता शहीद कपूर यांचा जन्म.
१९९२: हिंदी चित्रपट अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांचा जन्म.
१९९४: हिंदी चित्रपट अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा जन्म.
–
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१५९९: संत एकनाथ (जन्म: ? ? १५३३)
भगवंत भक्त संत एकनाथानी पैठण येथे आजच्या दिवशी समाधी
१८८६- गुजराथी कवी नर्मदाशंकर दवे यांचे निधन हुतात्मा किसन आहिर व नानकसिंग पुण्यतिथी
१९२४: जमखिंडीचे संस्थानिक सर परशुरामभाऊ पटवर्धन यांना त्यांच्याच मस्तवाल हत्तीने चिरडून ठार केले. त्यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीनंतर पुण्यातील न्यू पूना कॉलेजचे नाव ’एस. पी. कॉलेज’ असे करण्यात आले. (जन्म: ? ? ????)
१९६४: शांता आपटे – चित्रपट अभिनेत्री (कुंकू, दुनिया ना माने, अमृत मंथन इ.) (जन्म: ? ? १९१६)
१९७८: डॉ. प. ल. वैद्य – प्राच्यविद्यासंशोधक (जन्म: २९ जून १८९१)
१९८०: गिरजाबाई महादेव केळकर – लेखिका व नाटककार (जन्म: ? ? ????)
१९९९: ग्लेन सीबोर्ग – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १९ एप्रिल १९१२)
२००१: सर डोनाल्ड ब्रॅडमन – ऑस्ट्रेलियन फलंदाज, संघनायक व विक्रमवीर. १९४९ मध्ये त्यांना ’सर’ हा किताब देण्यात आला. (जन्म: २७ ऑगस्ट १९०८)
२००७: मल्याळम कवी पी भास्करन यांचे निधन.
२०१६: भारतीय उद्योगपती आणि समाजसेवक भवरलाल जैन यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९३७)
–