२९ जून दिनविशेष - 29 June in History
२९ जून दिनविशेष - 29 June in History

हे पृष्ठ 29 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २९ जून रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 29 June. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१६१३: इंग्लंड देशातील महान नाटककार शेक्सपिअर (William Shakespeare) यांच्या लंडन स्थित ग्लोब नावाच्या थियेटरला आग लागल्याने जमीनदोस्त झाले.

१७५७: बंगालचे नवाब मीर जाफर यांनी बंगाल, बिहार आणि ओडिसा प्रांताचे राज्य सांभाळले.

पण्डित हृदयनाथ मंगेशकर
पण्डित हृदयनाथ मंगेशकर

१८७१: ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला. यापूर्वी कामगार संघटना स्थापन करणार्‍यांना व अशा संघटनांच्या सदस्यांना ब्रिटनमधून तडीपार करुन ऑस्ट्रेलियात पाठवले जात असे.

१९७४: इसाबेल पेरेन यांनी अर्जेंटिनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

१९७५: स्टीव्ह वोजनियाक यांनी ऍपल -१ संगणकाचे पहिले प्रोटोटाइप तपासले.

१९७६: सेशेल्सला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९८६: आर्जेन्टिना ने १९८६ चा फुटबॉल विश्वकप जिंकला.

१९९५: दक्षिण कोरियातील सेऊल येथे ’सँपूंग डिपार्टमेंटल स्टोअर’ची इमारत कोसळून ५०२ जण ठार तर ९३७ जखमी झाले.

१९९६: मेक्सिको देशांत आयोजित फुटबॉल विश्वचषक अर्जेंटिनाने जिंकला.

२००१: ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार जाहीर

२००१: पण्डित हृदयनाथ मंगेशकर यांना ’नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार’ जाहीर

२००७: ऍपल ने आपला पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७९३: प्रोपेलर चे शोधक जोसेफ रोसेल यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १८५७)

१८६४: शिक्षणतज्ज्ञ व वकिल आशुतोष मुखर्जी यांचा जन्म.

१८७१: श्रीपाद कृष्ण कोल्हटकर – नाटककार, वाङ्‌मय समीक्षक व विनोदी लेखक (मृत्यू: १ जून १९३४)

१८९१: डॉ. प. ल. वैद्य – प्राच्यविद्यासंशोधक (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९७८)

१८९३: प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, ’इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट’ चे संस्थापक (मृत्यू: २८ जून १९७२)

१९०१: प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक तसचं, काकोरी व दक्षिणेश्वर बॉम्बहल्ला प्रकरणांचे सुत्रदार राजेंद्र लाहिरी यांचा जन्मदिन.

१९०८: प्रतापसिंग गायकवाड – बडोद्याचे महाराज (मृत्यू: १९ जुलै १९६८)

१९२२: रोमानियन वंशीय सर्बियन कवी वास्को पोपा (Vasko Popa)यांचा जन्मदिन.

१९३४: कमलाकर सारंग – रंगकर्मी, निर्माते, दिग्दर्शक व लेखक (मृत्यू: २५ सप्टेंबर १९९८)

चंद्रिका कुमारतुंगा
चंद्रिका कुमारतुंगा

१९४५: चंद्रिका कुमारतुंगा – श्रीलंकेच्या ५ व्या राष्ट्राध्यक्षा

१९४६: पनामाचे राष्ट्राध्यक्ष अर्नेस्टोपेरेझ बॅलादारेस यांचा जन्म.

१९५६: पोर्तुगालचे पंतप्रधान पेद्रोसंताना लोपेस यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८७३: बंगाली कवी मायकेल मधुसूदन दत्त यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १८२४)

१८९५: थॉमस हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक आणि डार्विनच्या उत्क्रांतिवादाचा खरा समर्थक (जन्म: ४ मे १८२५)

१९६१: भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते आणि भारताचे पहिले संरक्षणमंत्री सरदार बलदेव सिंह यांचे निधन.

प्रा. शिवाजीराव भोसले
प्रा. शिवाजीराव भोसले

१९६६: दामोदर धर्मानंद कोसंबी – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार (जन्म: ३१ जुलै १९०७)

१९८१: दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी – साहित्यिक (जन्म: २७ नोव्हेंबर १९१५)

१९९२: अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष मोहंमद बुदियाफ यांचे निधन.

१९९२: शिवाजीराव भावे – सर्वोदयी कार्यकर्ते (जन्म: ? ? ????)

१९९३: विष्णुपंत जोग – ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ मधील गुंड्याभाऊची भूमिका अमर करणारे गायक अभिनेते (जन्म: ? ? ????)

दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी
दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी

२०००: कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर – ऐतिहासिक कादंबरीकार (जन्म: १८ फेब्रुवारी १९११)

२००३: कॅथरिन हेपबर्न – हॉलिवूड अभिनेत्री (जन्म: १२ मे १९०७)

२०१०: प्रा. शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: १५ जुलै १९२७)

२०१६: प्लास्टिक कलेसाठी प्रसिद्ध भारतीय पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार तसचं, कालिदास सन्मान प्राप्त कलाकार के.जी. सुब्रमण्यम यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *