क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा
क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा

हे पृष्ठ 18 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 18 February. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • ’गांबिया’चा स्वातंत्र्यदिन

महत्त्वाच्या घटना:

भूपेन हजारिका
भूपेन हजारिका
सी. सुब्रमण्यन
सी. सुब्रमण्यन

२००१: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्यप्रदेश सरकारचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान

१९९८: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना ‘भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर

१९७९: सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.

१९६५: ’गांबिया’ला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

नवाब बानू ऊर्फ ’निम्मी’ – अभिनेत्री
नवाब बानू ऊर्फ ’निम्मी’ – अभिनेत्री

१९३३: नवाब बानू ऊर्फ ’निम्मी’ – अभिनेत्री

१९२७: मोहम्मद झहूर खय्याम हाश्मी ऊर्फ ’खय्याम’ – संगीतकार

१९२६: नलिनी जयवंत – अभिनेत्री (मृत्यू: २० डिसेंबर २०१०)

१९११: कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर – ऐतिहासिक कादंबरीकार (मृत्यू: २९ जून २०००)

१८९८: एन्झो फेरारी – रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर (मृत्यू: १४ ऑगस्ट १९८८)

खय्याम’ – संगीतकार
खय्याम’ – संगीतकार

१८८३: क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा (मृत्यू: १७ ऑगस्ट १९०९)

१८७१: बॅ. विठ्ठलभाई पटेल – थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष, सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले बंधू (मृत्यू: २२ आक्टोबर १९३३)

रामकृष्ण खुदिराम परमहंस
रामकृष्ण खुदिराम परमहंस

१८३६: रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय – स्वामी विवेकानंदांचे गुरू (मृत्यू: १६ ऑगस्ट १८८६ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)

रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ’लोकहितवादी
रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ’लोकहितवादी

१८२३: रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ’लोकहितवादी’ – पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार. १८४८ ते १८५० या काळात ’प्रभाकर’ या साप्ताहिकातून त्यांनी शतपत्रांचे लेखन केले. स्त्रियांचा कोंडमारा करणार्‍या रुढींवर त्यांनी प्रहार केला. त्यांनी ४३ मराठी ग्रंथ लिहिले. ’लक्ष्मीज्ञान’ हा त्यांचा ग्रंथ हा अर्थशास्र्तावरील पहिला मराठी ग्रंथ आहे. (मृत्यू: ९ आक्टोबर १८९२)

१७४५: अलासांड्रो व्होल्टा – इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ५ मार्च १८२७)

१४८६: योगी चैतन्य महाप्रभू (मृत्यू: १५ जून १५३४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

पंडित गोपीकृष्ण
पंडित गोपीकृष्ण

१९९४: पंडित गोपीकृष्ण – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते. भरतनाट्यम, कथकली, मणिपुरी आदी नृत्यप्रकारांतही त्यांनी नैपुण्य मिळवले होते. १९५७ मध्ये त्यांनी ८२ दिवसांत ८७ कार्यक्रम करुन विक्रम केला. (जन्म: २२ ऑगस्ट १९३५)

१९९२: नारायण श्रीधर बेन्द्रे – आदिम कलेपासून चिनी चित्रकलेपर्यंत अनेक शैलीविशेष आत्मसात केलेले चित्रकार (जन्म: २१ ऑगस्ट १९१०)

१९६७: जे. रॉबर्ट ओपेनहायमर – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक (जन्म: २२ एप्रिल १९०४)

१५६४: मायकेल अँजेलो – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार (जन्म: ६ मार्च १४७५)

१४०५: तैमूरलंग – मंगोल सरदार (जन्म: ९ एप्रिल १३३६)

१२९४: कुबलाई खान – मंगोल सम्राट (जन्म: २३ सप्टेंबर १२१५)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.