थॉमस वॉटसन
थॉमस वॉटसन

हे पृष्ठ 17 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १७ फेब्रूवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 17 February. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

थॉमस जेफरसन

२००८ : कोसोव्होने स्वातंत्र्य जाहीर केले.

१९६४ : अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.

१९३३ : अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली. १९२० साली ही दारुबंदी लागू झाली होतॊ.

१९२७ : ’रणदुंदुभि’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१८०१ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

पुरुषोत्तम शिवराम रेगे

१८७४ : थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष (मृत्यू: १९ जून १९५६)

१८५४ : फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९०२)

जे. कृष्णमूर्ती – भारतीय तत्त्वज्ञ

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९८६ : जे. कृष्णमूर्ती – भारतीय तत्त्वज्ञ (जन्म: १२ मे १८९५)

१९७८ : पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक (जन्म: २ ऑगस्ट १९१०)

१८८३ : राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन (जन्म: ४ नोव्हेंबर १८४५)

जिओर्डानो ब्रुनो

१८८१ : लहुजी राघोजी साळवे ऊर्फ ’लहुजी वस्ताद’ – क्रांतीवीर, समाजसेवक (जन्म: ? ? १८११)

१६०० : सूर्याभोवती पृथ्वी फिरते. सूर्यासारखे अनेक तारे आहेत. त्यांच्याभोवती पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत आणि त्यांच्यावर सजीवसृष्टी असू शकते, असे मत मांडणार्‍या जिओर्डानो ब्रुनो याला बायबलविरोधी मत मांडल्याबद्दल क्रूसावर बांधून जाळण्यात आले. (जन्म: ? ? १५४८)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *