९ ऑक्टोबर दिनविशेष - 9 October in History
९ ऑक्टोबर दिनविशेष - 9 October in History

हे पृष्ठ 9 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 9 October. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • आंतरराष्ट्रीय स्तन कर्करोग निवारण दिन

महत्त्वाच्या घटना:

१४१०: प्राग खगोलशास्त्रीय घडामोडींचा प्रथम उल्लेख करण्यात आला.

१४४६: हंगुल वर्णमाला कोरिया मध्ये प्रकाशित झाली.

१८०६: प्रशियाने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले.

१८७४: संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांसोबत जगभरातील टपाल प्रणाली व्यतिरिक्त टपाल धोरणांचे समन्वय साधण्यासाठी संयुक्त राष्ट्राची एजन्सी असलेल्या युनिव्हर्सल पोस्टल युनियन ची स्थापना करण्यात आली.

विद्याधर गोखले
विद्याधर गोखले

१९४९: सी राजगोपालचारी यांनी टेरीटोरियल आर्मी ची स्थापना केली.

१९६०: विद्याधर गोखले यांच्या ’पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

१९६२: युगांडाला (युनायटेड किंग्डमकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९८१: फ्रान्समधे मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली.

१९९३: पशुवैद्यक डॉ. काजल तांबे यांचा जन्म.

२०१२: पाकिस्तान देशातील शालेय विद्यार्थिनी व मानवाधिकार कार्यकर्ता मलाला युसुफ यांना तालिबान संघटनेच्या आतंकवाद्याने गोळी मारली होती.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१६२४: मुघल बादशहा शाहजहां आणि महारानी मुमताज महल यांचा धाकटा मुलगा मुहम्मद मुराद बख्श यांचा जन्मदिन.

१७५७: चार्ल्स (दहावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: ६ नोव्हेंबर १८३६)

१८२६: प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यकार राजा लक्ष्मण सिंह यांचा जन्मदिन.

१८५०: फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ हेन्‍री लुईस ली चॅटॅलिअर यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १९३६)

१८५२: एमिल फिशर – रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: १५ जुलै १९१९)

पण्डित गोपबंधूदास तथा ’उत्कलमणी’
पण्डित गोपबंधूदास तथा ’उत्कलमणी’

१८७६: पंडित धर्मानंद कोसंबी – बौद्ध धर्माचे अभ्यासक (मृत्यू: ४ जून १९४७)

१८७७: पण्डित गोपबंधूदास तथा ’उत्कलमणी’ – ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक (मृत्यू: १७ जून १९२८)

१८८९: डेल्टा एअर लाईन्स चे सहसंस्थापक कॉलेट ई. वूल्मन यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९६६)

१८९१: उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९७५)

१८९७: साली भारतीय कायदेपंडित, राजकारणी व तामिळनाडू राज्यातील प्रख्यात भारतीय स्वतंत्रता सेनानी व माजी मुख्यमंत्री मिंजूर भक्तवत्सलम यांचा जन्मदिन.

१९२२: संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल २००१ – चेन्नई, तामिळनाडू)

१९२४: भारतीय कवि आणि स्कॉलर थिरूनलूर करुणाकरन यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै २००६)

१९२६: जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार ऊर्फ जानी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १९९६)

१९२८: ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू नील हार्वे यांचा जन्म.

१९३०: भारतीय इंग्रजी दिग्दर्शक आणि निर्माता अलेसदैर मिल्ने यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी २०१३)

१९३५: द फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांचा जन्म.

१९४५: पद्मविभूषण पुरस्कार तसचं, संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांचा जन्मदिन.

१९६६: डेव्हिड कॅमरुन – इंग्लंडचे पंतप्रधान

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ’लोकहितवादी
रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ’लोकहितवादी

१८९२: रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ’लोकहितवादी’ – पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार. १८४८ ते १८५० या काळात ’प्रभाकर’ या साप्ताहिकातून त्यांनी शतपत्रांचे लेखन केले. स्त्रियांचा कोंडमारा करणार्‍या रुढींवर त्यांनी प्रहार केला. त्यांनी ४३ मराठी ग्रंथ लिहिले. ’लक्ष्मीज्ञान’ हा त्यांचा ग्रंथ हा अर्थशास्र्तावरील पहिला मराठी ग्रंथ आहे. (जन्म: १८ फेब्रुवारी १८२३)

१९१४: विनायक कोंडदेव ओक – बालवाङ्‌मयकार. मुलांसाठी ’बालबोध’ हे मासिक काढून त्यांनी चरित्रे, कविता, निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इ. लेखन केले व मराठी बालवाङ्‌मयाचा पाया घातला. त्यांची सुमारे पन्‍नास पुस्तके प्रसिद्ध झाली. सहज व सोपी भाषा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. (जन्म: २५ फेब्रुवारी १८४०)

१९५५: गोविंदराव टेंबे – हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक. ’अयोध्येचा राजा’, ’अग्निकंकण’, ’मायामच्छिंद्र’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. हार्मोनियम या साथीच्या वाद्याला त्यांनी स्वतंत्र वाद्याची प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. (जन्म: ५ जून १८८१)

गुरू गोपीनाथ – कथकली नर्तक
गुरू गोपीनाथ – कथकली नर्तक

१९६३: भारतीय स्वातंत्र्य सेनानी, बॅरिस्टर, राजकारणी आणि पाकिस्तान चळवळीचे समालोचक तसचं,  भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सदस्य व  पंजाब प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रमुख सैफुद्दीन किचलू यांचे निधन.

१९८७: गुरू गोपीनाथ – कथकली नर्तक (जन्म: २४ जून १९०८)

१९९८: जयवंत पाठारे – ‘आह‘, ‘अनाडी‘, ‘अनुराधा‘, ‘छाया‘, ‘सत्यकाम‘, ‘आनंद‘, ‘अभिमान‘, ’गोलमाल’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे छायालेखक (Cinematographer) (जन्म: ? ? ????)

१९९९: मा. अनंत दामले तथा नूतन पेंढारकर – नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या अभिनयावर खूष होऊन त्यांना ’नूतन पेंढारकर’ हे नाव प्रदान केले.

२००६: बहुजनांच्या उत्थान आणि राजकीय जमातीसाठी काम करणारे महान भारतीय राजकारणी आणि समाजसुधारक कांशीराम यांचे निधन.

२०१५: प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट संगीतकार, गीतकार व पार्श्वगायक रवींद्र जैन यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *