रजनीकांत
रजनीकांत

हे पृष्ठ 12 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

१२ डिसेंबर दिनविशेष – 12th December in History

या पृष्ठावर, आम्ही १२ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 12th December. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

2021: हरनाज कौर संधूने मिस युनिव्हर्स 2021 जिंकली

जी. मार्कोनी
जी. मार्कोनी
आशा भोसले
आशा भोसले

२००१ : आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

१९११ : दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.

१९०१ : जी. मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.

१७५५ : डच इस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

युवराजसिंग
युवराजसिंग

१९८१ : युवराजसिंग – भारतीय क्रिकेटपटू

१९५० : रजनीकांत – प्रसिद्ध तामिळ अभिनेते

१९४० : शरद पवार – केंद्रीय कृषी मंत्री, संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

१९१५ : फ्रँक सिनात्रा – हॉलिवूड मधील अभिनेते व गायक (मृत्यू: १४ मे १९९८)

शरद पवार
शरद पवार

१९०७ : खेमचंद प्रकाश – संगीतकार (मृत्यू: १० ऑगस्ट १९५०)

१९०५ : डॉ. मुल्कराज आनंद – लेखक (मृत्यू: २८ सप्टेंबर २००४)

१८९२ : गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. त्यांच्या ७ उत्कृष्ट कथांचा संग्रह ’सप्तपर्ण’ या नावाने प्रकाशित झाला आहे. (मृत्यू: ११ मार्च १९६५)

१८७२ : डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे – राजकीय नेते, हिन्दू महासभेचे संस्थापक, अध्यक्ष आणि सरचिटणीस, लष्करीकरणाचे प्रवर्तक आणि नाशिक येथील ’भोंसला मिलिटरी स्कूल’चे संस्थापक (मृत्यू: ३ मार्च १९४८)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

पण्डित रवी शंकर
पण्डित रवी शंकर

२०१२ : पण्डित रवी शंकर – सतार वादक, ’भारतरत्‍न’ (जन्म: ७ एप्रिल १९२०)

२००५ : रामानंद सागर – हिन्दी चित्रपट निर्माते (जन्म: २९ डिसेंबर १९१७)

२००० : जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल – कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (३१ मे १९९६ – ७ आक्टोबर १९९९) (जन्म: १ आक्टोबर १९३०)

१९९२ : पं. महादेवशास्त्री जोशी – साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक (जन्म: १२ जानेवारी १९०६ – आंबेडे, सातेरी, गोवा)

१९९१ : दत्तात्रय गणेश तथा अप्पासाहेब शेंबेकर – शेतीतज्ञ व बागाईतदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे संस्थापक अध्यक्ष (१९६३ – १९६६) (जन्म: ? ? ????)

१९६४ : मैथिलिशरण गुप्त – हिन्दी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली. (जन्म: ३ ऑगस्ट १८८६)

१९३० : परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू याचा मोटारीखाली चिरडून मृत्यू (जन्म: ? ? १९०८)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.