history of maharashtra
history of maharashtra

आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास (१८१८ ते १८५७) अभ्यासताना पुढील काही मुद्दय़ांचा समावेश असावा.

राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर -१ मधील इतिहास या विषय घटकाच्या अभ्यासाविषयी या लेखात चर्चा करू.

ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना या मुद्दय़ाच्या अनुषंगाने प्रमुख भारतीय सत्तांच्या विरुद्ध युद्धे, तनाती फौज धोरण, १८५७ पर्यंतची ब्रिटिश राज्याची रचना हा पूर्णपणे तथ्यात्मक भाग असून टेबल स्वरूपात अभ्यास करणे सोयीचे ठरेल.

आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास (१८१८ ते १८५७) अभ्यासताना पुढील काही मुद्दय़ांचा समावेश असावा. आधुनिक शिक्षणाची ओळख, वृत्तपत्रे, रेल्वे, टपाल व तार, उद्योगधंदे, जमीन सुधारणा व सामाजिक धार्मिक सुधारणा यांचा समाजावरील परिणाम हे घटक अभ्यासताना त्यांच्या विकासाचे टप्पे, संबंधित राज्यकत्रे यांचा समावेश असावा. या मुद्दय़ांची भूमिका, त्यांचे १८१८ ते १८५७ व त्यानंतर काँग्रेसच्या कालखंडामध्ये काय महत्त्व होते याचा अभ्यास करावा.

सामाजिक, सांस्कृतिक बदलांचा अभ्यास करताना ख्रिश्चन मिशनबरोबरचे संबंध, इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाचे आगमन, अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय (१८२८ ते १८५७), सामाजिक धार्मिक सुधारणांच्या चळवळी उदा. – ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, शीख तसेच मुस्लीम धर्मीयांतील सुधारणा चळवळी, डिप्रेस्ड क्लासेस मिशन, ब्राह्मणेतर चळवळ व जस्टिस पार्टी यांचा अभ्यास आवश्यक आहे. सत्यशोधक समाज, अस्पृशता निर्मूलनासाठी चळवळी इ. चा अभ्यास करतेवेळी गांधी युगातील त्यांच्या वाटचालींचा अभ्यास जास्त बारकाईने व सविस्तर करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, म.गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षी कर्वे, राजश्री शाहू महाराज, महर्षी विठ्ठल शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, विनोबा भावे, विनायक दामोदर सावरकर, अण्णा भाऊ साठे, क्रांतिवीर नाना पाटील, लहूजी साळवे व कर्मवीर भाऊराव पाटील आदींचे विचार व कार्य याचा अभ्यास करताना थोडे नियोजन आवश्यक आहे. त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, वृत्तपत्र, त्यांचे साहित्य, काय्रे, खास वक्तव्ये, असल्यास वाद आणि इतर माहिती याचा अभ्यास टेबल करून करता येईल.

सामाजिक व आर्थिक जागृती तसेच भारतीय राष्ट्रवादीची निर्मिती व विकासाचा अभ्यास करताना १८५७चा उठाव आणि त्यानंतर असे कालखंड करता येतील. राष्ट्रीय संघटनांची स्थापना व त्यामागची सामाजिक व आर्थिक पाश्र्वभूमी समजून घ्यावी. शेतकऱ्यांचे उठाव, आदिवासींचे बंड, क्रांतिकारी संघटना/घटना, आझाद हिंद सेनेची स्थापना व काय्रे यांची कारणे, स्वरूप / वैशिष्टय़े, प्रमुख नेते, ठळक घडामोडी, यशापयशाची कारणे, त्यांच्याबाबतच्या प्रतिक्रिया यांचा अभ्यास करायला हवा.

इंडियन नॅशनल काँग्रेसचा अभ्यास करताना काँग्रेसची स्थापना, मवाळ व जहाल गटाची वाढ, दोन्हींच्या मागण्या, कार्यपद्धती, यशापयश, महत्त्वाचे नेते, मोर्ल- मिंटो सुधारणा, स्वराज्याची चळवळ, लखनौ करार, मॉट  फोर्ड सुधारणा इ. अभ्यासावे. काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशने, त्यांचे साल, अध्यक्ष, ठराव, ठिकाण पाहायला हवे. गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ अभ्यासताना गांधीजीचे नेतृत्व, त्यांचे प्रतिकाराचे तत्त्व, गांधीजींच्या लोक चळवळी, असहकार, सविनय कायदेभंग, वैयक्तिक सत्याग्रह, चले जाव चळवळ, सत्यशोधक समाज, गांधीजी आणि अस्पृशता निर्मूलन, डॉ. बाबासाहेब आबेडकरांचा अस्पृश्यांच्या समस्येबाबतचा दृष्टिकोन अभ्यासावा. मुस्लीम राजकारण आणि स्वातंत्र चळवळीचा अभ्यास करताना सर सय्यद अहमद खान व अलिगढ चळवळ, मुस्लीम लीग व अली बंधू, मो. इक्बाल, मोहंमद अलि जीना असा फोकस आवश्यक आहे. संयुक्त पक्ष युनियनिस्ट पार्टी व कृषक प्रजा पार्टी, हिंदू महासभेचे राजकारण, साम्यवादी चळवळ, काँग्रेस समाजवादी पार्टी, राष्ट्रीय चळवळीतील महिला सहभाग,

संस्थानातील जनतेची चळवळ, साम्यवादी (डावी) चळवळ, शेतमजुरांची चळवळ, आदिवासींचे बंड, ट्रेड युनियन चळवळ व आदिवासी चळवळ आदी गोष्टी अभ्यासताना कारणे, परिणाम, स्वरूप, यशापयश, स्वातंत्र्य चळवळीतील वाटा इ. मुद्दे पाहावेत. मुस्लीम लीग व हिंदू महासभा यांचे राजकारण हे मुद्दे स्वातंत्र चळवळीतील प्रवाह म्हणून अभ्यासावेत.

फारूक नाईकवाडे

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *