१० नोव्हेंबर दिनविशेष - 10 November in History
१० नोव्हेंबर दिनविशेष - 10 November in History

हे पृष्ठ 10 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १० नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 10 November. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१६५९: शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफझलखानाचा वध केला. त्यावेळी अफझलखान ’दगा ऽऽऽ दगा ऽऽऽ …’ असे ओरडला.

१६९८: ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता बंदर स्थानिक राजाकडून विकत घेतले

१८८५: गोटलिएब डीमेलर ने आजच्याच दिवशी जगातील पहिली मोटर सायकल जगासमोर ठेवली होती.

१९५०: अमेरिकेचे लेखक विलियम फोक्नर यांना साहित्याकरिता नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

१९५८: गुजरातमध्ये बडोद्याजवळ वेदसार येथे प्रायोगिक विहिरीमध्ये तेल सापडले.

१९६०: नागविदर्भ चळवळीच्या आदेशावरून नागपुरात हरताळ, घाऊक व्यापार, दुकाने, हॉटेले बंद.

१९८३: बिल गेट्स यांनी विंडोज १.० प्रकाशित केले.

भारताचे ८ वे पंतप्रधान चंद्रशेखर
भारताचे ८ वे पंतप्रधान चंद्रशेखर

१९८९: जर्मनी या देशात बर्लिन ची भिंत पाडण्याचे कार्य आजच्याच दिवशी सुरु करण्यात आले होते.

१९९०: भारताचे ८ वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली.

१९९५: नायजेरिया या देशात पर्यावरण प्रेमी कार्यकर्ता व नाट्यकार केन सारो विवो यांना आठ लोकां समवेत तेथील सरकारने आजच्याच दिवशी फासीवर चढविले होते.

१९९७: आजच्याच दिवशी चीन व रशिया या दोन देशादरम्यान घोषणा पत्र कराराद्वारे सीमा विवाद संपुष्टात आला होता.

१९९९: शास्त्रीय संगीतातील बहुमोल कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ’तानसेन सन्मान’ गायक पं. सी. आर. व्यास यांना जाहीर

२०००: गंगा – मेकांग संपर्क परियोजनेचे कार्यास सुरुवात आजच्याच दिवशी करण्यात आले होते.

ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि आणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर चिदंबरम
ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि आणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर चिदंबरम

२००१: ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि आणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर चिदंबरम यांची केन्द्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून निवड

२००४: झेंगझोऊ हे चीनचे सर्वात प्राचीन आठवे शहर म्हणून घोषित करण्यात आले होते.

२००६: तामिळ वंशाचे श्रीलंकेतील संसद सदस्य नादराजा रविराज यांची कोलंबो येथे हत्या

२००८: भारतीय क्रिकेट संघाने आजच्याच दिवशी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पराभव करीत बॉर्डर – गावस्कर चषक २-० ने जिंकला होता.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७५०: म्हैसूर राज्याचा शासक टिपू सुलतान याचा जन्म झाला होता.

सुरेंद्रनाथ बॅनर्जी
सुरेंद्रनाथ बॅनर्जी

१८१०: फ्लश शौचालय चे निर्माते जॉर्ज जेनिंग्स यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १८८२)

१८४८: सुरेंद्रनाथ बॅनर्जी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि त्यातील जहाल गटाचे नेते, ’राष्ट्रगुरू’ (मृत्यू: ६ ऑगस्ट १९२५)

१८५१: फ्रान्सिस बाल्फोर – प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ (मृत्यू: १९ जुलै १८८२)

१९०४: कुसुमावती आत्माराम देशपांडे – साहित्यिक व समीक्षक, ग्वाल्हेर येथील ४३ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९६१)

१९०९: अमेरिका येथील गीतकार व संगीतकार जॉनी मार्क्स यांचा जन्म झाला होता.

१९१९: एके ४७ बंदुकीचे निर्माते मिखाईल कलाशनिको यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१३)

१९२५: रिचर्ड बर्टन – अभिनेता (मृत्यू: ५ ऑगस्ट १९८४)

१९४४: किर्गिस्तान देशाचे पहिले अध्यक्ष असगर अकयेव यांचा जन्म.

१९५२: सुनंदा बलरामन ऊर्फ सानिया – लेखिका

१९६४: हिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा यांचा जन्म.

२०१३: भारतीय लेखक विजयदन देठा यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९२६)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१२४०: प्रसिध्द अरबी सुफी कवी इबने अरबी यांचा मृत्यू झाला.

१६५९: अफझल खान – आदिलशहाचा सेनापती (जन्म: ????)

दत्तोपंत ठेंगडी
दत्तोपंत ठेंगडी

१९०८: भारतीय स्वतंत्रता सेनानी कनाईलाल दत्त यांचे निधन झाले.

१९२०: दत्तोपंत ठेंगडी – स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक (जन्म: १४ आक्टोबर २००४)

१९२२: शिवकालीन जंत्रीचे कर्ते, गणितज्ञ व ज्योतिर्विद गणेश सखाराम खरे यांचे पुणे येथे निधन.

१९३१: प्रसिध्द हिंदी साहित्यकार गंगाप्रसाद अग्निहोत्री यांचे निधन झाले.

१९३८: मुस्तफा कमाल अतातुर्क – तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: १९ मे १८८१)

१९४१: लक्ष्मण रामचंद्र पांगारकर – संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार व गाथा संपादक (जन्म: ३१ जुलै १८७२)

१९८२: लिओनिद ब्रेझनेव्ह – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस (जन्म: १९ डिसेंबर १९०६)

१९७०: फ्रांस चे पूर्व राष्ट्रपती चार्ल्स द ग्वाल यांचा मृत्यू झाला.

माणिक वर्मा
माणिक वर्मा

१९९५: प्रसिध्द शायर फजल ताबिश यांचे निधन झाले.

१९९६: माणिक वर्मा – शास्त्रीय संगीत व सुगम संगीत या दोन्ही क्षेत्रांत लोकप्रियता मिळवलेल्या गायिका. ’वंदे मातरम’, ’सीता स्वयंवर’, ’मायाबाजार’, ’गुळाचा गणपती’, ’पुढचं पाऊल’ या चित्रपटांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केले. ’वाजई पावा गोविंद’, ’त्या चित्तचोरट्याला’, ’अमृताहुनी गोड’ इ. त्यांची अनेक गीते लोकप्रिय आहेत. (१६ मे १९२६)

२००३: झिम्बाब्वे देशाचे पहिले अध्यक्ष कन्नान बनान यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १९३६)

२००९: सिंपल कपाडिया – अभिनेत्री आणि वेशभूषाकार (जन्म: १५ ऑगस्ट १९५८)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *