१६ मे दिनविशेष - 16 May in History
१६ मे दिनविशेष - 16 May in History

हे पृष्ठ 16 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 16th May. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • शिक्षक दिन- मलेशिया.

महत्त्वाच्या घटना:

१८६६: अमेरिकेत पाच सेन्ट किंवा निकेल हे नाणे व्यवहारात आणले.

१८९९: क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी.

अटलबिहारी वाजपेयी भारताच्या पंतप्रधानपदी
अटलबिहारी वाजपेयी भारताच्या पंतप्रधानपदी

१२०४:  बाल्डविन नववा पहिला लॅटिन सम्राट झाला.

१६०५:  पॉल पाचवा पोपपदी.

१९१८:  अमेरिकेत सरकारवर टीका करणे हा तुरुंगवासास पात्र गुन्हा ठरवण्यात आला.

१९२०: पोप बेनेडिक्ट पंधराव्याने जोन ऑफ आर्कला संत ठरवले.

१९२९हॉलिवूडच्या अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर, आर्ट्‌स अँड सायन्सेस या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ऑस्कर असे नाव पडले.

१९६९:  सोवियेत संघाचे अंतराळयान व्हेनेरा ५ शुक्रावर उतरले.

१९७५: सिक्कीममधील जनतेने कौल दिल्यावर भारताने सिक्कीमला देशाचा भाग करून घेतले.

१९७५:  जुन्को ताबेई एव्हरेस्टवर चढणारी प्रथम स्त्री ठरली.

१९९३: बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला व नवा जागतिक विक्रम नोंदविला.

१९९२: स्पेस शटल एन्डेव्हरची प्रथम अंतराळयात्रा सफल.

१९९६भारताचे १० वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली. मात्र आवश्यक पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांचे सरकार केवळ १३ दिवस टिकले.

२०००: बॅडमिंटन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी तसेच खेळांचे दूरचित्रवाणी प्रसारण सुलभ करण्यासाठी या खेळातील गेम १५ ऐवजी ७ गुणांचा करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाच्या क्‍वालालंपूर येथील बैठकीत घेण्यात आला. मात्र २००६ मधे हा नियम परत बदलला गेला.

२००५: कुवेतमधे स्त्रियांना प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झाला.

२००५: अमेरिकन वैज्ञानिकांनी क्लोन केलेल्या मानवी भ्रूणाच्या शरीरातून स्टेम पेशी काढण्यात पहिल्यांदा यशस्वी झाले.

२००७: निकोलाय सारकॉझी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८२५: आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च १८८४)

१८३१: मायक्रोफोन चे सहसंशोधक डेव्हिड एडवर्ड ह्यूजेस यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९००)

१८२४: महान गणितज्ज्ञ केरो लक्ष्मण छत्रे यांचा जन्म

१८५७: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पटना येथील २७ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष रघुनाथ मुधोळकर यांचा जन्मदिन.

१९०५: अमेरिकन अभिनेते हेन्‍री फोंडा यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑगस्ट १९८२)

के. नटवर सिंग
के. नटवर सिंग

१९२६: माणिक वर्मा, शास्त्रीय व सुगम संगीत गायिका.

१९३१: के. नटवर सिंग, भारतीय परराष्ट्र मंत्री.

१९४१: संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय टक्करवादक बनामाली महाराणा यांचा जन्मदिन.

१९४४: महाराष्त्रातील एक प्रसिध्द लोकनेते अभयसिंह राजे भोसले यांचा जन्म

१९५३: पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय बायोफिजिकल वैज्ञानिक प्राचार्य रामकृष्ण विजयाचार्य होसूर यांचा जन्मदिन.

१९५५: पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय हातमाग उद्योजक गजम अंजैया यांचा जन्मदिन.

१९७०: गॅब्रियेला सॅबाटिनी, आर्जेन्टिनाची टेनिस खेळाडू.

१९७५: निरोशन बंदरतिलके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

माधव मनोहर
माधव मनोहर

१६६५: पुरंदर किल्ला लडविताना मराठेशाहीतील स्वामीनिष्ठ सरदार मुरारबाजी देशपांडे यांचे प्राणार्पण

१८३०: फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १७६८)

१९२६: महमद सहावा, शेवटचा ओस्मानी सम्राट.

१९५०: कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १८७८)

१९७७: माली देशाचे पहिले अध्यक्ष मादीबो केएटा यांचे निधन. (जन्म: ४ जुन १९१५)

१९९०: द मपेट्स चे जनक जिम हेनसन यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९३६)

१९९४: माधव मनोहर, लेखक, समीक्षक.

१९९४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक फणी मुजुमदार यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९११ – फरिदपूर, बांगला देश)

२०००: माधव गोविंद काटकर, मराठी कवी.

२००८: ओपस वन व्हाइनरी चे सहसंस्थापक रॉबर्ट मोन्डवी यांचे निधन. (जन्म: १८ जुन १९१३)

२०१४: टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रुसी मोदी यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९१८)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *