विषाणूजन्य रोग:

  • विषाणू हे नाव पॅस्टिअर (Pasteur) या शास्त्रज्ञाने दिले.
  • विषाणूंचा incubation period पेक्षा खूप जास्त असतो.
  • विषाणूंना ठराविक पेशीरचना नसल्यामुळे त्यांना अपेशीय (Non Cellular)  म्हणतात.
  • विषाणूंमध्ये फक्त प्राथमिक आवरण असते ज्यामध्ये DNA किंवा RNA असतात.
  • विषाणूंमध्ये पेशीरस, पेशीभित्तिका नसतात.
  • सर्वच विषाणू घातक असतात.
  • विषाणूंचा आकार अतिशय सूक्ष्म असल्याने त्यांना इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ने बघावे लागते.
  • टिबायोटिक्स विषाणूंच्या रोगांवर उपयोगी ठरत नाहीत.

1) देवी (Small Pox): 

हा रोग variola व्हायरस या विषाणूंमुळे होतो.

या रोगामुळे मज्जासंस्थेला प्रादुर्भाव होतो.

या रोगाचा प्रसार खोकल्यापासून उडणाऱ्या दूषित थेंबांमुळे होतो.

लक्षणे: ताप, संसर्गानंतर ३/४ दिवशी अंगावर पुळ्या, पुढील टप्प्यात आंधळेपणा

लस: देवीची लस

1975 पासून भारतात देवीची लास देण्यात येत आहे.

2) कांजण्या (Chicken Pox):

हा रोग Vericella -zoster या विषाणूमुळे होतो.

हा रोग मुख्यतः लहान मुलांचा आहे. मात्र, तो तरुणांना सुद्धा होऊ शकतो.

हा रोग धोकादायक नाही.

लक्षणे: ताप, डोकेदुखी, संसर्गाच्या पहिल्या दिवशीच पुरळ

लस: उपलब्ध नाही. मात्र, एकदा होऊन गेल्यावर आयुष्यभर संरक्षण

3) गोवर (Measles):

हा रोग Myxovirus या विषाणूंमुळे होतो.

हा रोग खूप संसर्गजन्य असून मुख्यतः पाच वर्षाखालील मुलांना होतो व या रोगामध्ये दुय्यम संसर्गाची भीती खूप असते.

लक्षणे: ताप, कोरडा घसा, तिसऱ्या दिवशी तोंडांत पांढरा ठिपका, चौथ्या दिवशी पुरळ

लस: गोवर विरोधी लस – आयुष्यभर संरक्षण

भारतात गोवर हे बालमृत्यूचे प्रमुख कारण आहे.

4) रुबेला (Rubella किंवा Gernman measles):

हा रोग Myxovirus या विषाणूमुळे होतो.

हा रोग खूप संसर्गजन्य असून मुख्यतः पाच वर्षाखालील मुलांना होतो व या रोगामध्ये दुय्यम संसर्गाची भीती खूप असते.

या रोगांमुळे मानेतील ग्रंथींना प्रादुर्भाव होतो.

लक्षणे: ताप, मानेतील ग्रंथींचा दाह, संसर्गाच्या पहिल्या दिवशी पुरळ,

गर्भारपणाच्या पहिल्या चार महिन्यात आईला झाल्यास मूल मतिमंद तसेच बहिरे होण्याची शक्यता असते.

लस: रुबेला -विरोधी लस. जीवनभर संरक्षण

5) गालफुगी (Mums):

हा रोग Paramyxo Virus या विषाणूंमुळे होतो.

या रोगाचा प्रादुर्भाव लाळेच्या ग्रंथींना होतो. लाळेच्या ग्रंथींना सूज आल्याने गाळ फुगल्यासारखा दिसतो.

लक्षणे: ताप, लाळेच्या ग्रंथींना सूज, अन्न-पाणी गिळण्यास त्रास.

हा मुख्यतः लहान मुलांना होतो, मात्र तरुण माणसास झाल्यास तो वांझ होऊ शकतो.

लस: गालफुगीविरोधी लस

6) पोलिओ (Poliomycetis):

हा रोग Entero virus या विषाणूमुळे होतो.

या रोगाचा प्रादुर्भाव मध्यवर्ती मज्जासंस्थेला होतो.

या रोगामुळे हात – पाय लुळें होऊ शकतात व असा प्रादुर्भाव मुख्यतः लहानपणीच होत असतो.

लस: पोलिओच्या विरोधी दोन लसींचा वापर केला जातो.

१) Salf  V – शरीरात इंजेकशनद्वारे दिली जाते.

२) सेबीने – तोंडाद्वारे दिली जाते.

WHO ने भारतासाठी Sebine या लसीची शिफारस केली आहे.

November 1995 पासून भारताने प्लस पोलिओ इम्युनायझेशन कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत पाच वर्षाखालील मुलांना OPV (Oral Polio Vaccine) दिले जाते.

7) इन्फ्लुएन्झा (Influenza):

हा रोग Orthomyxo Virus या विषाणूंमुळे होतो.

हा रोग हवेतून पसरणारा आहे.

या रोगाचा प्रादुर्भाव श्वसनसंस्था, मज्जा संस्था आणि यकृत आतडे संस्था यावर होतो

लस: फ्लूविरोधी लस

8) रॅबीज (Rabbis/Hydrophobia):

हा रोग Rhabdo Virus या विषाणूमुळे होतो. हा विषाणू ओल्या जखमेतून प्रवेश करतो.

या रोगाचा प्रादुर्भाव पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे होतो.

या रोगाचा प्रादुर्भाव मध्यवर्ती मज्जासंस्थेला होतो.

लक्षणे: ताप, दातखिळी, डिहायड्रेशन इत्यादी. लक्षणे दिसायला सुरु झाल्यापासून पाच दिवसांनी मनुष्य मरतो.

लस: रॅबीज विरोधी लस. मात्र त्यामुळे पॅरालिसिस सारखा सहदुष्परिणाम होऊ शकतो.

9) हेपॅटिटिस (Hepatitis):

हेपॅटिटिस हि यकृताची रोगग्रस्त स्थिती आहे.

लक्षणे: हा रोग चार प्रकारच्या विषाणूंमुळे होतो.

1)  हेपॅटिटिस A विषाणू (HAV)

2)  हेपॅटिटिस B विषाणू (HAB)

3)  नॉन A विषाणू  आणि

4)  नॉन B विषाणू

10) एड्स (AIDS):

  • एड्स म्हणजे Acquired Immuno Deficiency Syndrome होय.
  • प्रतिकारशक्तीच्या अभावाने प्राप्त झालेल्या अनेक रोगलाक्षणांच्या एकत्रित समूह म्हणजेच ‘एड्स’ होय.
  • एड्स हा H.I.V. विषाणूमुळे होणारा आजार आहे. (Human Immuno dfficiency Virus)
  • हा मानवाची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू होय.
  • एड्सच्या H.I.V. विषणूचा शोध
  • एड्सच्या H.I.V. विषणूचा शोध 1983 साली डॉ. ल्यूक मोण्टिग्रेयर (फ्रेंच) व डॉ. रॉबर्ट गॅलो (अमेरिकन) या शास्त्रज्ञांनी लावला.
  • जगामध्ये 1981 साली अमेरिकेत एड्सचा पहिला रुग्ण आढळला.
  • भारतामध्ये 1986 साली मद्रासमध्ये पहिला H.I.V. पॉझिटिव्ह रुग्ण आढळला.
  • भारतामध्ये मे 1986 साली मुंबई शहरात पहिला एड्सचा रुग्ण आढळला.
  • जगात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण – भारत देशात.
  • भारतात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण – महाराष्ट्र राज्यात.
  • महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुंग – सांगली जिल्ह्यात.
  • महाराष्ट्रात शहरांपैकी सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण – मुंबई शहरात.
  • जागतिक एड्स दिन – 1 डिसेंबर
  • NARI (नारी) National AIDS Research Institute (भोसरी) पुणे.
  • NACO (नौको) National AIDS Control Organization दिल्ली.
  • MSACS – Maharashtra state AIDS Control Society (वडाळा) मुंबई.
  • HIV हा एक वैशिष्टयपूर्ण विषाणू असून त्याच्या जनुकीय घटक DNA च्या ऐवजी RNA असतो.
  • प्रत्येक विषाणूचा कण  हा १०० नॅनोमीटर व्यासाचा असतो.
  • हा विषाणू पांढऱ्या रक्तपेशींपैकी T-4 Lymphocytes प्रकारच्या रक्तपेशींवर हल्ला करत असतात.
  • त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्याने इतर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असतो.

रोगाचे प्रमुख मार्ग:

  • H.I.V. बाधित व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध.
  • H.I.V. बाधित व्यक्तीचे रक्त किंवा रक्तघटक निरोगी व्यक्तीस दिल्यास. (रक्त संक्रमण).
  • H.I.V. बाधित रुग्णास वापरलेल्या सुया/सिरिंजेस निर्जतुक न करता परत वापरल्यास.
  • H.I.V. बाधित गरोदर मातेपासून तिच्या होणार्‍या बाळाला (नाळेमार्फत) (H.I.V. बाधित व्यक्तीशी हस्तांदोलन केल्याने, चुंबन घेतल्याने, एकत्र बसण्याने, एकत्र जेवल्याने, एकत्र राहण्याने एड्स या रोगाचा प्रसार होत नाही).

लक्षणे:

 सर्वसामान्य लक्षणे :

  • अकारण वजनात 10% पेक्षा जास्त घट होणे.
  • सतत बारीक ताप, रात्रीचा घाम येणे. (1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी)
  • सतत जुलाब होणे व कोणत्याही औषधाने ते बरे न होणे.
  • तोंडात, अन्ननलिकेत चट्टे उठणे.
  • 3 महिन्यापेक्षा जास्त काळ राहणारी ‘लसिका ग्रंथाची’ (लिम्फ ग्लॅंड) सूज, गंभीर

 इतर लक्षणे :

  1. नुमोनिया
  2. मेंदूज्वर
  3. हरपीस
  4. विविध प्रकारचे कर्करोग
  5. क्षयरोग

आधिशयन काळ – 5 ते 8 वर्षे/सर्वसाधारण: (कधी-कधी 8 ते 10 वर्षे)

 एड्स निदानाच्या चाचण्या :

1) ELISA – Enzyme Linked Immuno Sorbent Assay

2) Western Blot Technique

3) HIV Dipstick Test

4) EIA Test: Enzymo Immuno Assay : वरील तीन चाचण्यांपैकी कोणत्याही चाचणीचा निष्कर्ष धन निघाला तर HIV चे अस्तित्व शोधण्यासाठी हि प्रत्यक्ष चाचणी केली जाते.

उपचार:

एड्सच्या विरुद्ध केमोथेरपीचाच वापर केला जातो.  यामध्ये ATZ – Azido Thymidine आणि DDC Dideoxycytidine वापरले जातात.

लस:

एड्स प्रतिबंधाकत्मक लस अध्याप उपलब्ध नाही.

जिवाणूजन्य रोग:

1) विषमज्वर (Typhoid):

रोगकारक: हा रोग Salmonella Typhi या जिवाणूमुळे होतो.

परिणाम: या रोगात आतडे व प्लीहा यांना प्रादुर्भाव  होतो.

प्रसार: हा रोग पाण्यातून पसरणारा रोग असल्याने मुख्यतः पावसाळ्यात होतो.

लक्षणे: ताप, खूप डोकेदुखी, प्लिहाचा आकार खूप मोठा होतो, तोंडात चट्टे, मळमळ

लस: या रोगावर TAB (Typhoid Type A And B) ही लास वापरली जाते.

2) पटकी (Cholera):

रोगकारक: हा रोग (Vibrio Cholerae) या जिवाणूमुळे होतो.

परिणाम:  अन्ननलिका व पचन संस्थेवर

‘प्रसार: या रोगाचा प्रसार पाण्याद्वारे होतो.

लक्षणे: प्रचंड मळमळ, डायरिया, डिहायड्रेशन

लस: हाफकीनची लस

3) डिफथेरीया (Dyptheria):

रोगकारक: हा रोग कॉर्निएबॅक्टरीअम डीपथेरी (Corynebacterium Diphtheriae) या जिवाणूमुळे होतो.

परिणाम: श्वसननलिकेवर परिणाम होतो.

प्रसार: हवेतून प्रसार होतो.

लक्षणे: हा रोग पाच वर्षाखालील मुलांना होतो. ह्या रोगामध्ये घशात करडया रंगाचा पडदा तयार होतो. व वेळीच उपचार न केल्यास श्वसनास अडथळा निर्माण होऊन मुलाचा मृत्यू होऊ शकतो.

लस: डिप्थीरिया व इतर दोन रोगांविरुद्ध एकत्रित अशी DPT (Dyphtheria, Pertusis, Tetanus) नावाची लस दिली जाते.

4) धनुर्वात (Tetanus):

रोगकारक: हा रोग Clostridium Tetani या जिवाणूमुळे होतो.

परिणाम: या रोगाचा प्रादुर्भाव मध्यवर्ती चेतासंस्थेवर होतो.

प्रसार: हा जिवाणू फक्त ओल्या जखमेतूनच प्रवेश करू शकतो.

लक्षणे: ताप, दातखीळी, डिहायड्रेशन, चीडचीड इत्यादी

लस: DPT

5) डांग्या खोकला (Pertussis/ Whopping Cough):

रोगकारक: हा रोग Hemophilus pertussis या जिवाणूमुळे होतो.

परिणाम: या रोगामुळे श्वसन नलिकेस प्रादुर्भाव होतो.

प्रसार: हवेतून प्रसार होतो.

लक्षणे: दीर्घकाळ खोकला आणि श्वसनाचा दाह

लस: DPT

6) क्षय रोग(Tuberculosis):

रोगकारक: हा रोग Mycobacterium Tuberculosis या जिवाणूमुळे होतो. संसर्गजन्य रोगांपैकी हा सर्वाधिक संसर्गजन्य रोग आहे.

परिणाम: या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः फुप्फुसांना होतो. नखे व केस सोडून इतर सर्व अवयवांना त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

प्रसार: जिवाणूंचा प्रसार हवेतून होतो.

लक्षणे: खोकला, संध्याकाळी ताप, वजन कमी इत्यादी

औषध: Streptomycin

लस:  क्षयरोगावर BCG (Baccilus Calmeti Guerine) ही लस वापरली जाते.

7) कुष्ठरोग (Leprosy/Hanson’s Disease):

रोगकारक: हा रोग Mycobacterium Leprae या दंडाकृती दिवाणुमुळे होतो. Incubation Periood मोठा असलेला हा रोग आहे.

परिणाम: या रोगाचा प्रादुर्भाव परिघीत मज्जासंस्थेवर होतो.  त्यामुळे त्वचा, स्नायू, डोळे, अस्थी, वृषण आणि अंतर्गत अवयवांवरसुद्धा होतो.

प्रसार:  हवेतून व दूषित वस्तूमधून प्रसार होतो.

कुष्ठरोग दोन प्रमुख प्रकारांत आढळतो.

1) नॉन-लेप्रोमॅटस किंवा असंक्रामी कुष्ठरोग, आणि

2)लेप्रोमॅटस किंवा संक्रमी कुष्ठरोग- यामध्ये रोग्याचे नाक, गळा आणि त्वचा यांच्यातून लेप्रा जिवाणू असलेले द्रव्य एकसारखे बाहेर पडते.

कुष्ठरोगाच्या तीन अवस्था असतात. त्यांपैकी दुसऱ्या अवस्थेत रोग्याच्या शरीरात सर्वाधिक लेप्रा जिवाणू असल्याने तो सर्वाधिक संक्रामक असतो. तिसऱ्या अवस्थेत मात्र जिवाणूंची संख्या फारच कमी राहिल्याने रोगी कमी धोकादायक असतो.

मात्र हातापायाची बोटे पूर्णपणे झडलेली असतात. या रोगाचे जिवाणू नाकातून निघालेल्या आणि कोरडया झालेल्या स्रावामध्ये कमीत कमी 9 दिवस तर ओलसर मातीत 46 दिवस
जिवंत राहू शकतात.

लक्षणे: त्वचेवर चट्टे, त्वचा कोरडी, त्वचा संवेदनाहीन, त्वचेवर छोटया गाठी.  शेवटच्या टप्प्यात हातापायांची बोटे गाळून पडतात.

लस: कुष्ठरोगावर सध्या MDT (Multi Drug Therapy) ही उपचार पद्धती वापरली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने Dapsone Diamino-Diphenyle Sulphone (DDS) आणि इतर रसायने एकत्रित असतात.

8) न्यूमोनिया (Pneumonia):

रोगकारक: हा रोग Diplococcus Pneumoniae या जिवाणूमुळे होतो.

परिणाम: या रोगांमध्ये फुप्फुसांना प्रादुर्भाव होऊन त्यांचा दाह होत असतो.

प्रसार: हो रोग जिवाणूमुळे  होतो मात्र तो विषाणूमुळे सुद्धा होऊ शकतो.

लक्षणे: ताप, श्वासासाठी त्रास, छातीत दुखणे

लस: उपलब्ध नाही

9) प्लेग (Plague):

रोगकारक: हा रोग Yersinia Pestis या जिवाणूमुळे होतो.

परिणाम: लसिका पेशी, फुप्फुसे तसेच रक्त

प्रसार: हा रोग मुख्यतः उंदरांचा आहे. उंदरांना तो पिसवांमुळे होतो. उंदरांच्या शरीरावरील पिसू माणसाला चावल्यास तो माणसांना होतो. त्यानंतर तो एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे त्याचे वहन होऊ शकते.

लक्षणे: लसीका ग्रंथींचा दाह (Bubonic State), फुप्फुसांचा दाह होणे. (Pnuemonic Stage), रक्तामध्ये संसर्ग होणे (Septicaemic Stage)

लस: प्लेग विरोधी लस – मात्र या लसीमुळे सहा ते बारा महिन्याचे अल्पकालीन संरक्षणच प्राप्त होते. मात्र, एकदा प्लेग झाल्यास आयुष्यभर संरक्षण प्राप्त होते.

एकपेशीय आदिजीवांमुळे होणारे रोग (Protozoal Disease):

1) हिवता/ मलेरिया (Malaria):

रोगकारक: हा रोग प्लाझमोडियम व्हायरस नावाच्या आदिजीवांमुळे होतो.

परिणाम:रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम होतो.

प्रसार: हिवतापाचा प्रसार ऍनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे होतो.

लक्षणे: ठराविक कालखंडाने येणारा ताप, थंडी वाजणे, यकृत व प्लिहा मोठ्या होणे, ऍनिमियाची कमी अधिक तीव्रता इत्यादी

हिवतापाच्या अवस्था (Stages Of Malaria):

1) शीत अवस्था (Cold Stage): या अवस्थेत थंडी वाजते आणि शरीराचे तापमान वाढतेल. ही  अवस्था 2-4 तास आढळते.

2) उष्ण अवस्था (Hot Stage): या अवस्थेत शरीराचे तापमान 41 अंश पर्यंत वाढते तसेच प्रचंड डोकेदुखी आढळते. ही अवस्था 2-6 तास आढळते.

3) घाम अवस्था (Sweat Stage): या अवस्थेत ताप कमी होऊन प्रचंड घाम येतो. ही  अवस्था 15-20 मिनिट आढळते.

लस: अर्टिमिसिलीन – कॉम्बिनेशन थेरपी (ACT), क्लोरोक्वाईन, मेफ्लोक्वाईन, डॉक्झीसायक्लिन, प्रायमाक्विन

जागतिक आरोग्य संघटनेने गरोदर स्त्रियांसाठी क्विनाईन आणि क्लिंडामायसिन ही  औषधे सुचविली आहे.

2) अमिबिऑसिस (Amoebiasis):

रोगकारक: हा रोग अमिबा या आदिजीवांमुळे होतो.

परिणाम: मोठया आतडयांना संसर्ग होऊ शकतो.

प्रसार: प्रसार पाण्यामार्फत होतो.

लक्षणे: डायरिया, पोटदुखी

3) स्लिपींग सिकनेस (Sleeping Sickness):

रोगकारक: हा रोग Trypanosoma ह्या आदिजीवामुळे होतो.

प्रसार: त्सेत्से नावाची माशी चावल्यामुळे हा रोग होतो.

संसर्ग: लाल रक्तपेशींना, कालांतराने रक्तातून मेंदूला

लक्षणे: यकृत व प्लिहा मोठी होणे, पुढच्या टप्प्यामध्ये व्यक्तीला दिवसभर झोपवासे वाटते, त्यापुढील टप्य्यात तो कोमात जाऊ शकत.

4) काला आजार (Kala -Azar/Dum Dum Fever):

रोगकारक: Leishmania Donovani ह्या आदिजीवांमुळे हा रोग होतो.

परिणाम: त्वचेवर परिणाम होतो.

प्रसार: सांडफ्लाय नावाची माशी चावल्याने

लक्षणे: नाकातून व हिरड्यांमधून रक्तस्त्राव, सांध्यांमधून, त्वचेवर अल्सर/व्रण, ताप, प्लीहा आणि यकृतावर परिणाम होणे तसेच रक्तक्षय

लस: उपचारासाठी पेंटाव्हॅलेट अँटिमोनियल्स हे औषध वापरतात.

कवकांमुळे होणारे रोग (Fungal Diseases):

1) गजकर्ण/ नायटा (Ringworm): 

हा रोग Microsporum Trichophyton या कवकामुळे होतो.

प्रसार: ह्या रोगाचा प्रसार अस्वच्छ कुत्रे व मांजरी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क तसेच प्रादुर्भाव झालेल्या माणसांच्या वस्तू वापरल्यास

लक्षणे: त्वचा व कवटीवर लालसर चट्टे

2) Athlete’s Foot

3) Dhobi-Itch (चिखल्या)

कृमींमुळे होणारे रोग (Diseases due to Worms):

1)  एस्कारियासिस (Ascariasis):

रोगकारक: हा रोग एस्कीरीस लुब्रीकॉयड्स या आंत्रकृमी परजीवी मुळे होतो. यालाच जंत असे म्हणतात. या कृमींच्या अळ्या तसेच प्रौढ या दोहोंमुळे शरीरावर परिणाम होतो.

परिणाम: पचनसंस्था व आतडे

प्रसार: दूषित पाणी व दूषित अन्न

लक्षणे: अळ्यांमुळे यकृत, हृदय, फुप्फुसे यांमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव (Internal Bleeding) होतो.स्नायूंचे अचानक आकुंचन, ताप, ऍनिमिया इत्यादी.  प्रौढ जंतांमुळे आंत्रांचा क्षोभ, मोठ्या आतड्यांमध्ये वेदना, ताप, जठर व्रण, वांत्या इत्यादी होतात, त्याचबरोबर अपचन, पोट फुगणे यांसारखा त्रास होऊन या जीवनसत्वाचा नाश होतो.

उपचार: ऍस्कारिओसिसच्या उपचारांसाठी सँटोनीन, हॅट्राझॉन, टेट्रिमिसॉल, अलबेंडाझॉल, मेंबेन्डाझोल, लेव्हामिसॉल, पायरन्टल पॅमॉट यांसारख्या कृमिनाशक औषधांचा वापर केला जातो.

2) हत्तीपाय रोग (Filariasis/Elephantiasis):

रोगकारक: हा रोग व्युचेरेरिया (Wuchereria) या कृमींमुळे होतो.  या कृमींचे दोन प्रकार आढळून येतात.

W.Branrofti आणि

W. Malayi

प्रसार: या कृमींचा प्रसार क्युलेक्स (Culex) डासाची मादी चावल्यामुळे होतो.

हे कृमी साधारणतः शरीराच्या पायातील लसीका वाहिन्यांमध्ये (Lymphatic Vesseles) राहून त्यांचा दाह घडवून आणतात त्यामुळे शरीराच्या खालच्या भागाचे पूर्ण विरूपण घडवून आणतात. पाय अवाढव्य झाल्याने त्यास हत्तीपाय म्हणतात.

लक्षणे: प्रामुख्याने पायांवर परिणाम होतो. कृमींमुळे पाय प्रचंड सुजतात म्हणून यास हत्तीपायरोग म्हणतात. याचा परिणाम कानांवर, हातांवर व इतर अवयवांवर होतो.

उपचार: उपचारासाठी अलबेंडाझोल आणि इव्हरमेक्टीन या औषधांचा उपयोग होतो.

लैंगिकदृष्टया पारेषित रोग (Sexually Transmittes Diseases: STDs):

  • हा एक सांसर्गिक रोगाचा असा गट आहे, ज्यांचे पारेषण लैंगिक सबंधांमुळे होते.
  • हे रोग जिवाणू, विषाणू, प्रोटोझोआ आणि कवक ही कारके आणि बाह्य परजीवींमुळे होतात.
  • या रोगांना व्हेनेरिअल रोग (Venereal Diseases) असेही म्हणतात.

या रोगांमध्ये पुढील रोग येतात.

१) एड्स

२) सिफिलिस

३) गोनोऱ्हिआ

४) क्रांक्राईड

५) डॉनावव्हॅनसिस

६) चॉज

७) लिम्फोग्रॅन्युलोमा व्हेनेरियाम (LGV) इत्यादी

 

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *