स्नायू संस्था
स्नायू संस्था

स्नायू संस्था (Muscular System):

मानवी स्नायू संस्था पुढील तीन स्नायूंपासून बनलेली असते.

  1. अस्थी स्नायू,
  2. मृदू स्नायू आणि
  3. हृदय स्नायू
  • स्नायूंमुळे आपल्या शारीरिक हालचाली घडून येतात.
  • शरीराला मजबुती देऊन आकार नियंत्रित ठेवतात तसेच रक्ताचे वहन संपूर्ण शरीरात करतात.
  • मानवी शरीरात एकूण 400 स्नायू असतात. प्रौढ मनुष्याच्या शरीरात एकूण 639 स्नायू असतात.
  • पुरुषांच्या एकूण वजनाच्या तुलनेत 40% तर स्त्रियांच्या एकूण वजनाच्या तुलनेत 30% स्नायूंचे वजन असते.
  • हे स्नायू हाडांशी किंवा इतर स्नायूंशी जोडलेले असतात. स्नायू संस्थेतील स्नायू स्नायुतंतूच्या लांब पेशींपासून बनलेले असतात.
  • या पेशींमध्ये संकोची प्रथिन (Contractile Protein) असते व त्या प्रथिनांमुळेच स्नायूंचे आकुंचन-प्रसरण घडून येते.
  • हे संकोची प्रथिन अकँटीन आणि मायोसीन या तंतूपासन बनलेले असते.
  • स्नायूंच्या अभ्यासाच्या शास्त्राला Myology असे म्हणतात.

स्नायूंचे तीन प्रकार आहेत.

1) हृदय स्नायू (Cardiac Muscles):

Cardiac Muscles
Cardiac Muscles
  • हृदय स्नायू अनैच्छिक स्नायूंचा (Involuntary Muscles) प्रकार असून त्यांच्या कार्यावर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येत नाही.
  • हृदयाचे कार्य स्वायत्त चेतासंस्थेमार्फत नियंत्रित केले जाते त्या प्रक्रियेला सायन्स मोड असे म्हणतात.
  • आपल्या शरीरातील सर्वात कार्यक्षम स्नायू म्हणून हृदय स्नायूंना ओळखले जाते.
  • हृदयाचे स्नायू हृदयाच्या आकुंचन – प्रसारणाचे कार्य घडवून आणतात.

 

 

 

 

2) मृदू स्नायू (Smooth Muscles):

Smooth Muscles
Smooth Muscles
  • हे स्नायू शरीरात अस्थींना जोडलेले नसतात. म्हणून यांना मृदू स्नायू किंवा अंककाली स्नायू (Nonskeletal Muscle) म्हणतात.
  •  या स्नायूंच्या कार्यावर आपण मनाप्रमाणे नियंत्रण ठेवू शकत नाही. म्हणून त्यांना अनैच्छिक स्नायू म्हणतात.
  • सूक्ष्मदर्शकाखाली या स्नायूंचे निरीक्षण केल्यास त्यांच्या पृष्ठभागावर गडद आणि फिकट पट्टे आढळून येत नाहीत म्हणून त्यांना अपट्टकी स्नायू (Non Straited Muscles) असेही म्हणतात.
  • अनैच्छिक स्नायूंच्या पेशी चकती प्रमाणे तसेच एक केंद्रकीय असतात.
  • मृदू स्नायूंचे कार्य स्वायत्त चेतासंस्थेमार्फत नियंत्रित केले जाते.
  • उदा: अन्ननलिका, स्वास नलिका, डोळ्यातील परीतारिका, मूत्रवाहिनी, रक्तवाहिन्या, आतडे, जठर, फुप्फुसे, श्वासपटलाचे स्नायू इत्यादी

3) अस्थी स्नायू (Skeletal Muscles):

Skeletal Muscles
Skeletal Muscles
  • हे स्नायू शरीरात अस्थींना दोन्ही बाजूंनी जोडलेले असतात म्हणून त्यांना अस्थी स्नायू किंवा कंकांली स्नायू (Skeletal Muscle) म्हणतात.
  • या स्नायूंच्या कार्यावर आपण मनाप्रमाणे नियंत्रण ठेऊ शकतो. म्हणून यांना ऐच्छिक स्नायू (Voluntary Muscles) असे म्हणतात.
  • सूक्ष्मदर्शकाखाली या स्नायूंचे निरीक्षण केल्यास त्यांच्या पृष्ठभागावर गडद आणि फिकट पट्टे आढळून येतात म्हणून यांना पट्टकी स्नायू  (Straited Muscles) म्हणतात.
  • ऐच्छिक स्नायूंच्या पेशी लांबट, दंडाकृती, अशाखीय तसेच बहुकेंद्रकी असतात.
  • उदा. हात, पाय, इत्यादीमधील स्नायू

शरीरातील सर्वात मोठा स्नायू ग्लूटीअस मॅक्सिमस (Gluteus maximus) आहे.

हा मांडीच्या हालचालींसाठी आवश्यक असलेला स्नायू आहे.

पाय पसरणे, पाय फिरवणे, मांडी घालणे अशा प्रकारचे कार्य ग्लूटीएस मॅक्झिमस मुळे शक्य होतात.

शरीरातील सर्वात लहान स्नायू स्टेपीडीएस (Stepedius) आहे. तो कानातील स्टेप्स या हाडांची हालचाल प्रमाणापेक्षा जास्त होऊ देत नाही.

सर्वात जास्त कार्यक्षम असणारे स्नायू हृदयाचे स्नायू होय. अतिशय जास्त व्यायाम केल्यास स्नायूंमध्ये लॅक्टिक ऍसिड तयार होऊन त्याचा साठा वाढतो व त्यामुळे स्नायूंना थकवा जाणवतो.

दुखावलेल्या स्नायूंच्या वेदना शमविण्यासाठी त्यावर अवरक्त किरणे (Infra Red Rays) तसेच, अल्ट्रासॉनिक ध्वनीचा मारा करतात.

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

1 Comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *