प्रा. केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे
प्रा. केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे

हे पृष्ठ 3 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ३ जानेवारी  रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 3 January. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • जागतिक अ‍ॅक्युप्रेशर थेरपी दिन
  • मूलभूत कर्तव्यपालन दिन

महत्त्वाच्या घटना:

सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले
पंडित जवाहरलाल नेहरु
पंडित जवाहरलाल नेहरु

२००४: नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राष्ट्रीय स्मारक घोषित करुन राष्ट्राला अर्पण करण्यात आले.

१९५७: हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.

१९५०: पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्‍घाटन झाले.

१९४७: अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.

१९२५: बेनिटो मुसोलिनी इटलीचा हुकूमशहा बनला.

१४९६: लिओनार्डो डा व्हिन्सीने उडणाऱ्या यंत्राची अयशस्वी चाचणी केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

चेतन आनंद
चेतन आनंद

१९३१: य. दि. फडके – लेखक, विचारवंत व इतिहाससंशोधक (मृत्यू: ११ जानेवारी २००८)

१९२१: चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक (मृत्यू: ६ जुलै १९९७)

१८८३: क्लेमंट अ‍ॅटली – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: ८ आक्टोबर १९६७)

१८३१: सावित्रीबाई फुले – समाजसेविका (मृत्यू: १० मार्च १८९७)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष
सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष

२००२: सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष (जन्म: २५ सप्टेंबर १९२०)

२०००: डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे. (जन्म: २६ डिसेंबर १९१४)

डॉ. सुशीला नायर
डॉ. सुशीला नायर

१९९८: प्रा. केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (जन्म: ८ फेब्रुवारी १९०९)

१९९४: अमरेन्द्र गाडगीळ – मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक (जन्म:

१९७५: बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकावरील बॉम्बहल्यात जखमी झालेले रेल्वेमंत्री ललितनारायण मिश्रा यांचे निधन. त्यांच्या हत्येचे गूढ अजुनही उलगडलेले नाही. (जन्म: २ फेब्रुवारी १९२३)

१९०३: अ‍ॅलॉइस हिटलर – अ‍ॅडॉल्फ हिटलरचे वडील (जन्म: ७ जून १८३७)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.